Skip to main content

विचार

वाचलेली पुस्तकं आणि त्यावरची माझी मतं....कोसला!...

लेखक सविता यांनी रविवार, 12/09/2010 14:20 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्क्लेमरः कोणे एके काळी मी डायरी लिहायचे, सुमारे १० वर्षांपुर्वी..म्हणजे मी कॉलेजला असतानाच्या काळात, आणि मग ती अधून मधून चाळायचे पण! हा उतारा त्यातून घेतालाय्...अगदी तारखेसकट. ही माझी तेव्हाचीमते आहेत, आत्ता वाचले तर कदाचित वेगळे पण मत बनू शकेल. माहीत नाही. मी पहिल्यांदा जेव्हा ही एन्ट्री ब्लॉगवर टाकली, तेव्हा मला ब-याच लोकांनी "नेमाडे हे फार मोठे लेखक आहेत..तुला त्यांचे लेखन झेपत नाहीये म्हणजे तुझा प्रॉब्लेम आहे", "तुझी बौद्धिक पातळी कशी टिपिकल मध्यमवर्गीय आहे, मग तुला व्.पु., अवचट असे टिपिकल लोकांचे लेखनच आवडत असेल" इ. इ.

खोटे सर्व,खरे तुझे रुप!

लेखक शानबा५१२ यांनी रविवार, 12/09/2010 00:17 या दिवशी प्रकाशित केले.
लेख नकळत थोडा लांबला आहे,पण कोणी वाचलात तर संपुर्ण वाचावा,अस मनापासुन वाटत. नकस्कार,नमस्कार......... न समजणारे मराठी शब्द मी ह्यापुढे कधीच वापरणार नाही.मी सर्व मिपाकरांची माफी मागतो,पण मला वेगळ्या,चांगल्या शब्दात सांगता आले असते,असो. आपण जीवनात विनोदी असाल तर त्याचे कारण कदाचित तुम्हाला विनोद करायची संधी मिळत असेल कींवा वातावरण तसे असेल.पण माझ्याबाबतीत बोलाल तर मी रीयल लाईफमधे विनोदी तर सोडा एकदम अबोल आहे,मग "जामच भाव खातोय","स्वःताला हुशार समजतो वाटत" वगैरे बोलणा-या नजरांना सामोरे जावे लगते. माझ्या कामाच्या ठीकाणावरुन स्टेशनला कार येत असताना मी त्या ४५-६० मिनिटांच्या प्रवासात एक शब

आले गणराज आले हो...

लेखक मदनबाण यांनी शनिवार, 11/09/2010 13:12 या दिवशी प्रकाशित केले.
ढोल- ताशे वाजु लागले आणि फोटो काढत असताना देखील माझे पाय ताल धरु लागले... गाडीत विराजमान होउन आलेले बाप्पा...

अंडा बिरयाणी,हॉटेलचा शेट व टीव्हीवरची मालिका.

लेखक शानबा५१२ यांनी शनिवार, 11/09/2010 09:54 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार्,नमस्कार....... मिपाला तीन वर्षे झाली.खुप फास्ट प्रगती चाललेय.होउ दे,आपल्याला काय त्याचा फायदा होणार नाही.पण शुभेच्छा द्यायला पैसे लागत नाहीत,म्हणुन शुभेच्छा(कोरड्या) देतो. आता सुरु करतो. त्यादीवशी सकाळी खजुर जरा जास्त खाल्ले,म्हणुन जरा जास्त excite झालो होतो.डोळ्यांना फील्टर लावल्याप्रमाणे सगळीकडे स्त्रीयाच दीसत होत्या.एक जुन्या ओळखीची दीसली.मी "गुड मॉर्निग" म्हणालो.तिनेही काही न म्हणता फक्त नाजुक हसुन दाखवल,मी "चल लग्न करुया" हे मनात आलेले वाक्य खुप प्रयत्न करुन अडवल.नजर वेगळीकडे वळवत सटकलो. ह्या सर्वात कुठे अपघात तर होणार नाही ना,ही भीती मनात धरत रस्त्यावर चालत होतो. ठाण्याला जाणा

राष्ट्रध्वज फडकवण्याची नियम

लेखक लीना सचिन चौधरी यांनी शुक्रवार, 10/09/2010 15:26 या दिवशी प्रकाशित केले.
तुम्हाला तुमच्या घरांवर व दुकानांवर राष्ट्रध्वज वर्षभर फडकावावासा वाटतो. पण त्यासाठी त्याचा तुम्हाला तुमच्या घरांवर व दुकानांवर राष्ट्रध्वज वर्षभर फडकावावासा वाटतो. पण त्यासाठी त्याचा मानसन्मान पाळला गेला पाहिजे. त्याच्याविषयीच्या नितीनियमांची माहिती... राष्ट्रध्वज उतरवणे देशातील महान व्यक्ती, राष्ट्राध्यक्ष यांचे निधन झाल्यास त्यांचा सन्मान राखण्यासाठी शोक पाळण्यात येतो. त्यावेळी राष्ट्रध्वजाला झुकविण्यात येते. याचा अर्थ ध्वज दंडाच्या मध्यभागी आणून फडकावण्याच्या स्थिती ठेवण्यात येते.

राष्ट्रध्वज फडकवण्याची नियमावली

लेखक लीना सचिन चौधरी यांनी शुक्रवार, 10/09/2010 15:23 या दिवशी प्रकाशित केले.
देशाच्या अस्मितेचे प्रतीक असलेला राष्ट्रध्वज तिरंगा राष्ट्रीय सण व अन्य महत्त्वपूर्ण दिवशी सन्मानपूर्वक फडकवला जातो. राष्ट्राचे प्रतीक असलेल्या राष्ट्रध्वजाला फडकावित असताना त्याचा कुठल्याही प्रकारे अवमान होणार नाही, यासाठी काही नियम करण्यात आले आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या वतीने भारतीय राष्ट्रध्वज संहिता तयार करण्यात आली आहे. ध्वज संहितेबाबत नागरिकांमध्ये जागृती निर्माण व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. राष्ट्रीय ध्वजाबाबत संहिता तयार करण्यात आल्याचे खूप कमी नागरिकांना माहिती असते.

प्लास्टिक आणि कागदी राष्ट्र ध्वज विक्रीचा विरोध

लेखक लीना सचिन चौधरी यांनी शुक्रवार, 10/09/2010 15:21 या दिवशी प्रकाशित केले.
प्लास्टिक आणि कागदी राष्ट्र ध्वज विक्रीचा विरोध 15 ऑगस्टला स्वातंत्र्यदिन व २6 जानेवारीला प्रजासत्ताक दिन आपण मोठ्या हर्षोल्हासाने साजरा करीत असतो. देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी अनेकांना आपल्या प्राणाचे बलिदान द्यावे लागले तर काहींना घरदार सोडावे लागले आहे. आजही जेंव्हा आपण सुखाने झोपलेलो असतो, आपल्या कुटुंबासोबत सण साजरे करत असतो, तिकडे सीमेवर आपल्या रक्षणासाठी कोणीतरी रात्रंदिवस पहारा करत असतं. मात्र गेल्या काही वर्षापासून आपल्या देशाचे मानचिन्ह 'तिरंगा' झेंड्याची अवहेलना होत असल्याचे दिसत आहे. दरवर्षी आपल्या देशात सर्वत्र प्रजासत्ताक दिनी व स्वतंत्रता दिनी अगणित प्लास्टिक आणि कागदी राष्ट्रध्वजांची विक्री होत असते. लोक अतिशय उत्साहाने ही खरेदी करतात मात्र दुसर्याच दिवशी हे राष्ट्रध्वज केविलवण्या परिस्थितीत रस्त्यात इतस्तत: पडलेले असतात. सार्वजनिक सफाई कामगाराव्यतिरिक्त त्यांच्याकडे कोणी वळुन पाहणण्याचेही कष्ट घेत नाही. आपल्याच राष्ट्रध्वजाची अशी उपेक्षा या स्वतंत्र देशाचा नागरिक म्हणून आपल्याला शोभते का? राष्ट्रध्वजासाठी प्लास्टिकचा वापर करता येणार नाही, या केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशाला लाथाळून सर्रासपणे असे ध्वज तयार केले जात असून भारतीय जनता आपल्या मुलांना त्या ध्वजाचे महत्त्व न सांगता त्यांना खुशाल असे प्लास्टिकचे ध्वज खरेदी करून देत असतात. मुले तर मुलेच ना, त्यांना या ध्वजाचे महत्त्व माहित नसल्याने त्यांच्याकडून अशा चूक होणारच. परंतु पालकांनी सजगता दाखवून अशी प्लास्टिकचे ध्वज खरेदी करू नयेत. तरच त्याचे उत्पादनाला आपोआप खिळबसेल. या देशाचे सुजाण आणि जबाबदार नागरिक बानविण्याची जबाबदारी आपल्यावर आहे. आपण प्रजासत्ताक व स्वतंत्र राष्ट्र आहोत याचा जल्लोष मांडून झाल्यावर त्याच राष्ट्रध्वजाला, पायदळी तुडवतना, कचरयाच्या पेटीत टाकताना आपल्याला काहीच वाटत नाही? रस्त्यावर ट्रॅफिक सिग्नलाच्या कडेला हे ध्वज विकणारी मुले, ते गरज म्हणून विकतात पण आपण ते काय म्हणून विकत घेतो? क्रिकेट पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांकडूनही आपल्या ध्वजाचा अवहेलना केली जाते. त्यांना तोंड व परिधान केलेल्या कपड्यावर तिरंगा रंगवून घेतांना काहीच कसे वाटत नाही. याचे आश्चर्य वाटते. आपण सांगा हे कितपत योग्य आहे. ध्वजाला कपड्यावर नाही तर मनावर स्थान पाहिजे. आणि ते आपल्या कर्तृत्त्वातून जाणवत.असते. फाटलेला किंवा मळलेला राष्ट्रध्वज वापरु नये, याची सर्वांनाच कल्पना आहे, असायलाच हवी. मात्र फाटलेला किंवा मळलेला राष्ट्रध्वज पुर्णत: नष्ट कसा करावा याची किती लोकांना माहिती आहे? स्वतंत्र भारतात आपल्याला श्वास घेता यावा म्हणून कित्येकांनी आपल्या आयुष्याची होळी केली आहे. आपल्या घराची समृद्धी या देशासाठी त्याग केला आहे. त्यांच्या त्यागाची आणि बलिदानाची परतफेड आपण अशा प्रकारे करणार आहोत का? अशा प्रकारे ध्वज विकत घेऊन त्याची उपेक्षा करण्यपेक्षा, तो न विकत घेता, खरंतर तो विकण्यावरच आक्षेप घेऊन स्वत:ला या देशाची नागरिक म्हणवणं मी जास्त पसंत करीन. यापुढे प्लास्टिक आणि कागदाच्या राष्ट्रध्वजविक्रिसाठी मी आक्षेप घेणार आहे. जिथे जिथे मला अशा प्रकारची विक्री होताना आढळेल, तिथे तिथे मी स्वत: जाउन लोकांना असे ध्वज खरेदी न करण्याविषयी आवाहन करणार आहे. स्वत:च्या देशाचा मानसन्मान कायम राखाण्याकरिता तुम्ही काय करणार आहात? सौ. लीना सचिन चौधरी (अध्यापक) ज्ञानप्रबोधिनी नवनगर विद्यालय, निगडी (गुरुकुल विभाग)

श्री गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा !!

लेखक अमोल केळकर यांनी शुक्रवार, 10/09/2010 14:33 या दिवशी प्रकाशित केले.
उद्या आपल्या लाडक्या गजाननाचे आगमन होत आहे. आता १० दिवस एक उत्साहाचे वातावरण सगळीकडे असेल. मनातील मरगळ काढून टाकुन या विघ्नहर्त्याचे स्वागत करायला सज्ज होऊ या. यानिमित्याने आपण व आपल्या कुटुंबियांवर श्री गजाननाची अखंड कृपा दृष्टी राहो या शुभेच्छा !!!