नमस्कार्,नमस्कार.......
मिपाला तीन वर्षे झाली.खुप फास्ट प्रगती चाललेय.होउ दे,आपल्याला काय त्याचा फायदा होणार नाही.पण शुभेच्छा द्यायला पैसे लागत नाहीत,म्हणुन शुभेच्छा(कोरड्या) देतो.
आता सुरु करतो.
त्यादीवशी सकाळी खजुर जरा जास्त खाल्ले,म्हणुन जरा जास्त excite झालो होतो.डोळ्यांना फील्टर लावल्याप्रमाणे सगळीकडे स्त्रीयाच दीसत होत्या.एक जुन्या ओळखीची दीसली.मी "गुड मॉर्निग" म्हणालो.तिनेही काही न म्हणता फक्त नाजुक हसुन दाखवल,मी "चल लग्न करुया" हे मनात आलेले वाक्य खुप प्रयत्न करुन अडवल.नजर वेगळीकडे वळवत सटकलो.
ह्या सर्वात कुठे अपघात तर होणार नाही ना,ही भीती मनात धरत रस्त्यावर चालत होतो.
ठाण्याला जाणा-या एस्टीत बसलो.ट्रेनची सवय असल्याने एस्टीत बसायला भेटत म्हणुन मी सारखा आनंदात असतो.
ठाण्याला एस्टी थांबली.मी कामाच्या ठीकाणी जायला रीक्षा पाहु लागलो.कंपनीची मतलबी गाडी मला न घेतल्यास पेट्रोल कमी लागेल ह्या भावनेने पाच मिनिटे आधीच सटकली होती,पण आज राग आला नाही,मी सारखा हसत होतो,विनाकारण.
".हां बसा........... कळवा,कळवा,कळवा......" रीक्षावाला अस ओरडत होता.कळव्यासारख्या जागी आपले नशीब शोधणारे भारतीय रीक्षात बसत होते.
"कळवा,कळवा.........."रीक्षावाल्याच चालु होत.
"कळवतो,कळवतो............." म्हणत मी रीक्षात बसलो.माझा जोक आवडला असेल म्हणुन मी बाजुला बसलेल्या फ्रेंच कट व शेंडी ठेवलेल्या माणसाकडे बघुन हळुच पण छानपैकी हसलो.
"सकाळी सकाळी काय फालतु जोक मारतोय,यडपट साला!" अशा नजरेने त्याने माझ्याकडे बघितल.
मला मान बाहेर काढुन हवा घेणे जास्त सुरक्षित वाटल.
रीक्षा माझ्या मंजिलवर येऊन थांबली.३-४ रुपये रीक्षावाल्याला द्यावेत ह्या उदात्त हेतुने मी वीसची नोट देत,
"छुट्टा रहने दो,रहने दो!" अस म्हणालो.
रीक्षावाला थोडा वैतागत म्हणाला"ओ साब्,क्या छुट्टा रखु? पच्चीस रुपया हुआ,और पाच रुपया दो"
मी माझा पोपट झाला हे दु:ख मनात ठेउन खुर्च्या तोडायच्या कामावर निघालो.
आजचा दीवस भलताच अतरंगी आहे,ह्याची सर्व सिग्लल्स मिळाली होती.
आता मेन गोष्ट,
लंच टाईम झाला.मी मनावर दगड ठेउन त्या फालतु हॉटेलमधे शिरलो.तिथले वेटर काम जास्त करतात म्हणुन की अजुन काही माहीती नाही,पण सारखे येरवडा जेलमधे निष्पाप असताना सक्तमजुरी भोगावी लागत असल्याचे भाव चेह-यावर असतात.
"एक अंडा बिरयाणी ला"मी म्हणालो.
"जी" माझी होणारी बायको असल्यासारखा लाडात येउन तो म्हणाला.
गल्ल्यावर बसलेला शेट माझ्यापासुन ४० अंशाच्या कोनात समोर बसला होता.माझ्या मागे डोक्यावर जरा जास्तच वर बसवलेली एक टीव्ही होती.मला ती बघायला थोडेसे वळावे लागत होते.
मालक "टाईम क्या हुआ रे" अस ओरडत होता.
मी(मनात) : अरे मेल्या वर घड्याळ बघ ना,कशाला त्या दु;खी आत्मांना समोर आणतोस?
शेट त्याचा आवडता कार्यक्रम चालु झाला म्हणुन अॅडजस्ट होउन बसला.सेट मॅक्सवर स्वप्निल जोशी ज्या कार्यक्रमात काळा गुजराती बनला आहे,तो कार्यक्रम चालु होता,कदाचित त्याच नाव 'पापडपोल' आहे.
कार्यक्रम पाहताना शेट पैसे मोजतानाही टीव्हीवरची मालिका मिस होणार नाही ना,ह्याची काळजी घेत होता.
"ह्याला अंडा बिरयाणी का बोलाव?" असा प्रश्न निर्माण करणारं व्यजन समोर आले.
मी वैतागुन खाउ लागलो.
शेट हसत होता,मधेच चेहरा गंभीर करुन पहात होता.बोलल्या जाणा-या डायलॉग्सवर विचार करत होता.ब्रेक झाला की कार्यक्रम पुन्हा सुरु होईपर्यंत टीव्हीकडे पाहात नव्हता.
माझी अंडा बिरयाणी अर्धी खाउन झाली तेव्हा कार्यक्रम संपायला आला आहे,अस स्वप्निल जोशीच्या डायलॉग्स व कॉमेडी मालिकेचा करुण्,दु:खी शेवट करु पाहणारे म्युजिक ह्यावरुन वाटले.मला फक्त आवाज स्पष्ट ऐकायला येत होता.
स्वप्निल जोशी रडक्या आवाजात काहीस अस म्हणत होता,"आप हमारे पास पैसे नही ईसलिये हमसे नाता नही बनाना चाहते.क्या मेरा गरीब बाप पैसे नही ईसलिये जी नही सकता,राजेशबाबु? बताईये राजेशबाबु,हम क्या करे?" आवाजात दर्द होता.मी मनात त्याला "जा रे,^&*^&*$" अस काहीसे म्हणालो.
पण शेट भलाताच मग्न व भावुक झाला होता.स्वप्निल जोशीबरोबर हा रडतो की काय अशी शक्यता वाटल्याने मी शेटकडे टक लावुन पहात होतो.
स्वप्निल जोशीचा चेहरा अश्रुंनी भरला असेल हे मला आवाजावरुन समजल,शेटचे डोळे भरुन यायला लागले.मी जोरात हसणार तर नाही ह्याची मला भीती वाटायला लागली.मी हसणे दाबत आता आवडायला लागलेली बिरयाणी खात होतो.
शेटला कुणीच बघत का नाही,ह्याचे मला आश्चर्य वाटले.भरुन आलेले डोळे थोडे कोरडे झाले.
स्वप्निल जोशीने "हमारी यही गलती है के हम गरीब है!" असा अर्थाचे काहीतरी म्हणुन मोठा हंबरडा फोडला.मी लगेच शेटकडे बघितल,त्याच्या डोळ्यातुन पडलेला अश्रु त्याच्या त्याच्या गालावर घोळु लागला.मला अजुन खुप हासायच कारण पुढे मिळणार होतं.आता कार्यक्रम संपुन नाव पडायला लागली.
काउंटरवर एक बाई काहीतरी पार्सल घ्यायला आली.शेट डोळ्यावर असणारा अश्रु कसा पुसु ह्याचे उत्तर न मिळाल्याने थोडा खाली बघुनच लाजणा-या नवरीप्रमाणे "क्या चाहीये?" अस म्हणाला.
माझ्या तोंडातुन अन्न टेबलावर पडायच राहील होत्,माझ्याकडेच्या अनोळखींनी आधीच माझी वेड्यात गिणती केल्याने माझ्या हसण्याशी त्यांना काही घेणदेण नव्हत.बाई जे बोलली त्यावर शेट लगेच "नही है" म्हणाला.व बाई गेल्यावर लगेच अश्रु पुसुन हीशोबवहीत बघु लागला.
मी "अरे वेड्या ही टीव्ही सीरीयल आहे!' अस म्हणायचा मोह आवरला.
बिरयाणी थोडी तशीच ठेउन मी उठलो पण पैसे वसुल झाले होते.वेटरकडे पैसे देउन शेटकडे न बघता मी निघुन गेलो.
भावना खुप महत्वाच्या असतात,त्या मी माणसांना स्वःताशी जोडण्यासाठी वापरतो,अशा फालतु गोष्टींत रस घेणारे मला आवडत नाहीत.
असो,हा लेख माझ्या बालपणीच्या मैत्रीणीला अर्पण!
वाचने
5317
प्रतिक्रिया
22
मिसळपाव
प्रतिक्रिया
>>मिपाला तीन वर्षे झाली.खुप
आपणास उपचाराची अवश्यकता
In reply to >>मिपाला तीन वर्षे झाली.खुप by मराठमोळा
'मला कुणाच्या प्रगती,आनंद
In reply to >>मिपाला तीन वर्षे झाली.खुप by मराठमोळा
( वेळी अवेळी दारु पिऊन काहीही
शानबाभौ. तुमी लिव्हता चांगलं.
शानब्या का रे बाबा विनकारण
केवळ पी एच डी करतोय
पहीली गोष्ट म्हणजे मी सध्या
In reply to केवळ पी एच डी करतोय by गोगोल
गमतीदार लेख
असंच लिहीत राहा
In reply to गमतीदार लेख by राजेश घासकडवी
शानबा५२ हाच टारझन आहे.
In reply to गमतीदार लेख by राजेश घासकडवी
अरे नही भाय्,हम तो एक मामुली
In reply to शानबा५२ हाच टारझन आहे. by llपुण्याचे पेशवेll
मस्त जमलाय
हॉटेलमधे मालकीण असती तर तिचे
छान
ठीक.. पण अनुभव म्हणुन लिहा
मी थोडासा राजेश आणि प्रदीप
सगळ्यांनीच वाचा हो!
In reply to मी थोडासा राजेश आणि प्रदीप by बिपिन कार्यकर्ते
मस्त!!!! लेख आवडला!! खूप हसले
मस्त...
खजुर
हो,खजुर aphrodisiac असतात
In reply to खजुर by विनायक प्रभू