राष्ट्रध्वज फडकवण्याची नियम

लीना सचिन चौधरी जनातलं, मनातलं
तुम्हाला तुमच्या घरांवर व दुकानांवर राष्ट्रध्वज वर्षभर फडकावावासा वाटतो. पण त्यासाठी त्याचा तुम्हाला तुमच्या घरांवर व दुकानांवर राष्ट्रध्वज वर्षभर फडकावावासा वाटतो. पण त्यासाठी त्याचा मानसन्मान पाळला गेला पाहिजे. त्याच्याविषयीच्या नितीनियमांची माहिती... राष्ट्रध्वज उतरवणे देशातील महान व्यक्ती, राष्ट्राध्यक्ष यांचे निधन झाल्यास त्यांचा सन्मान राखण्यासाठी शोक पाळण्यात येतो. त्यावेळी राष्ट्रध्वजाला झुकविण्यात येते. याचा अर्थ ध्वज दंडाच्या मध्यभागी आणून फडकावण्याच्या स्थिती ठेवण्यात येते. राष्ट्रध्वज घेऊन संचलन किंवा मिरवणूकीने शोक व्यक्त केला जात असेल तर भाल्याच्या अग्रभागी काळ्या रंगाच्या दोन पट्टाय लावल्या जातील. त्या पट्ट्या लटकलेल्या असतील. मात्र, असे प्रयोग केवळ शासनाच्या आदेशावरच होतील. खालील व्यक्तींचे निधन झाल्यास ध्वज उतरविण्याचे प्रभाव क्षेत्र राष्ट्रपती, उपराष्ट्रपती किंवा पंतप्रधान- संपूर्ण भारतात लोकसभा अध्यक्ष किंवा भारताचे सरन्यायाधीश- दिल्लीत केंद्रिय मंत्रिमंडळ स्तरावरील मंत्री- केवळ दिल्ली व राज्यांच्या राजधानीत केंद्र, राज्यमंत्री किंवा उपमंत्री - दिल्लीत राज्यपाल, उपराज्यपाल, मुख्यमंत्री, संबधित किंवा संघशासित राज्याचा मुख्यमंत्री- संपूर्ण राज्य कोणत्याही राज्याचा मंत्रिमंडळ स्तराचा मंत्री- संबंधित राज्याच्या राजधानीत सूचना- दिल्ली म्हणजे दिल्ली महापालिका, नवी दिल्ली नगर पालिका व कॅन्टोन्मेंट बोर्ड या सर्व भाग. विशेष स्थिती राष्ट्रीय उत्सवावेळी अर्थात पंधरा ऑगस्ट, २६ जानेवारीला देशातील मोठ्या व्यक्तीचे निधन झाल्यास राष्ट्रीय शोक घोषित केला जातो. त्यावेळी ध्वज उतरविला पाहिजे.मात्र या दिवशी सर्वत्र ध्वजारोहण कार्यक्रम नेहमीप्रमाणे होतील. फक्त ज्या इमारतीत त्या व्यक्तीचे पार्थिव ठेवले आहे, तेथील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरविलेला असेल. पार्थिव शरीर अंत्यसंस्कारासाठी बाहेर काढण्यात आल्यानंतर राष्ट्रध्वजाला पूर्ण उंच फडकावले पाहिजे. शहिदांवर राष्ट्रध्वज देशासाठी प्राणांचे बलिदान देणार्या जवानांचा सन्मान करण्यासाठी राष्ट्रध्वज त्यांच्यावर लपेटण्यात येतो. त्यावेळी केशरी पट्टी डोक्याच्या दिशेने आणि हिरवी पट्टी मांड्यांच्या दिशेने असली पाहिजे. पांढरी पट्टी डोक्यापासून पायापर्यंत आणि केशरी आणि हिरवी पट्टी डाव्या व उजव्या बाजूला अशी स्थिती अजिबात नको. आणखी एक महत्त्वाची बाब. शहीद वा मोठ्या व्यक्तिंच्या अंत्यसंस्कारावेळी राष्ट्रध्वज जाळायचा वा दफन करायचा नाही. मुखाग्नी देण्यापूर्वी किंवा दफन करण्यापूर्वी तो काढून घेतला पाहिजे. नष्ट कसा करायचा रंग उडालेला, फाटलेला राष्ट्रध्वज फडकावण्यास योग्य नसतो. असे करणे म्हणजे ध्वजाचा अपमान करणे आहे हे लक्षात ठेवा. राष्ट्रध्वजाची अशी स्थिती झाल्यास गुप्तपणे त्याला अग्नीच्या स्वाधीन केले पाहिजे. किंवा वजन किंवा रेतीत बांधून पवित्र नदी किंवा जलसमाधी दिली पाहिजे. पार्थिव शरीरावरून उतरवलेल्या ध्वजाच्या बाबतीतही असे केले पाहिजे. राष्ट्रध्वजाचा अपमान पाणी ओतणे, जमिनीवर पाडणे, फाडणे, जाळणे, त्यावर लिहिणे किंवा व्यावसायिक उद्देशाने वापर करणे हा राष्ट्रध्वजाचा अपमान समजला जातो. राष्ट्रध्वज झुकवणे हाही अपमान समजला जातो.
वर्गीकरण
लेखनप्रकार

10 टिप्पण्या 3,290 दृश्ये
शेअर करा: 📱 WhatsApp

Comments

चिगो नवीन

महत्त्वाची, मोलाची माहिती... धन्यवाद...

पाषाणभेद नवीन

लेख (की लेखमाला?) छानच आहे.चांगली माहीती आहे. २६ जाने. किंवा १५ ऑगस्टसाठी राखून ठेवलेला होता काय?

यशोधरा नवीन

आजकाल बरेच जण कारमध्ये वगैरे भारतीय ध्वजाच्या छोट्या प्रतिकृती ठेवतात, किंवा डेस्कवर. ते नियमात बसते का? बसत असेल, तर मलाही अशी प्रतिकृती ठेवायला आवडेल.

सुनील नवीन

नियम वाचले. माहितीत भर पडली. नियम थोडे किचकट वाटतात. त्याची गरज आहे काय? सर्वच देशात असे किचकट नियम असतात काय? जर नसतील तर त्या देशांतील लोकांचे राष्ट्रप्रेम कमअस्सल असते असे मानावे काय?

हुप्प्या नवीन

अनवधानाने ध्वज उलटा लावला गेला तर प्रायश्चित्त म्हणून जळते निखारे हातात घेऊन राष्ट्रपती भवनाच्या पाच प्रदक्षिणा अनवाणी घालाव्या लागतात असे ऐकले आहे ते खरे का? अर्थात आपले प्रेमळ धाकले बंधूराष्ट्र पाकिस्तान जेव्हा हे कृत्य जाणून बुजून पुनःपुनः करते तेव्हा ही नियमावली बासनात गुंडाळून त्याला मोठ्या मनाने माफ करायचे असते हे माहीती आहे मला! १५ ऑगस्ट वा २६ जानेवारीला ध्वज उभारण्याकरता एखादा अंघोळ वगैरे करून शूचिर्भूत झाला असेल आणि कुण्या पारोशाच्या स्पर्शाने विटाळ झाला तर पुन्हा स्नान करावे का? की काही मंत्र ( जसे सारे जहांसे अच्छा) वगैरे म्हणून विटाळ धुता येतो? जर एखाद्या देशाशी युद्ध चालू असेल तर त्याच्या ध्वजाचा आपल्या ध्वजाला विटाळ होईल का? ल्यापटॉपवर जर फडकणारा भारताचा झेंडा स्क्रीन सेव्हर म्हणून लावला तर तो ध्वजाचा अपमान आहे का? असा ल्यापटॉप जर अनवधानाने उलटा वा आडवा झाला तर ध्वजसंहितेचा विटाळ होतो का? त्याला काय शिक्षा आहे? एखाद्याने देशाच्या झेंड्यावरून देश ओळखा असे काही कोडे बनवायचे ठरवले (खरेखुरे वा कंप्युटर प्रोग्रॅम) आणि त्यात भारताच्या ध्वजाचा समावेश असेल तर तो वरील नियमावलीचा भंग आहे का? की असा खेळ फक्त १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारीला सूर्योदयानंतर आणि सूर्यास्ताआधी खेळता येईल?

३_१४ विक्षिप्त अदिती नवीन

हा घ्या याच लेखाचा आणखी दुवा: http://marathi.webdunia.com/miscellaneous/special09/rday/0901/23/1090123068_1.htm ठकूताई उर्फ कांचनताई यांनी एक चौर्यकर्म दाखवल्यामुळे गुगल केल्यावर हे मिळालं.