Skip to main content

विचार

ओ कलकत्ता

लेखक पैसा यांनी शनिवार, 18/09/2010 23:38 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या वर्षी युनियनच्या कॉंफरन्सच्या निमित्ताने कलकत्त्याला गेले होते. बरोबर 2 मैत्रिणी होत्या. वास्को- हावडा एक्सप्रेसने आम्ही कलकत्त्याला पोचलो. महिला वर्गासाठी रहाण्याची उत्तम सोय गुजरात समाजाच्या लॉजमध्ये केली होती. तर कॉन्फरन्स “महाजाति सदन” मध्ये बडा बाजार रस्त्यावर होती. बाजूलाच मेट्रो स्टेशन आहे. सकाळी ते पाहिलं. कॉंफरन्स सुरू झाली. नाश्ता जेवण सगळं वेगळ्याच बंगाली चवीचं पण स्वादिष्ट होतं. दिवसभर भाषणं वगैरे झाली. रात्रीच्या जेवणाची व्यवस्थाही तिथेच, म्हणजे महाजाति सदन मध्ये होती. रसभरे रसगुल्ले खाउन रसना तृप्त झाली. जेवण जरा जास्तच झालं.

सर

लेखक शानबा५१२ यांनी शनिवार, 18/09/2010 00:18 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार,नमस्कार........ विशेष नोंद : मी मिपावर इतर लेखांवर प्रतिसाद देत नाही व ह्यापुढे देणार नाही.पण मी लेख वाचतो,काही चांगले असतात्,आभ्यासु,वैचारीक,नवीन माहीती देणारे असतात.माझ्या एका लेखाच्या प्रतिसादात आधीच सांगितल्याप्रमाणे माझ्यासारख्या फडतुस in turn थर्ड क्लास माणसाने एक भिकार लेख लिहावा व त्यावर आपल्यासरख्या प्रेमळ माणसांनी प्रतिसाद द्यावेत,ही गोष्ट माझी पातळी(पडलेली) उंचावल्याचा भास करुन देते. हो,फुकट आपुलकी मिळावी म्हणुन लिहल आहे,आपण खवमधे आपले विचार कळवावेत्,भीक आनंदाने स्विकारली जाईल.असो. आज माझ्या शाळेतल्या आवडत्या शिकक्षकाबद्दलचे व जुना आहे म्हणुन आवडायला लागलेल्या एका मित्रा

What is non-negotiable in your life?

लेखक शुचि यांनी शनिवार, 18/09/2010 00:15 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या "लीडरशिप" अर्थात नेतृत्व विषयक लेख वाचतेय. माझा अतोनात आवडीचा विषय. म्हणजे अंमलबजावणी करण्यासाठी नाही तर नुसता वाचनमात्र म्हणून. एक खूप सुंदर लेख *१ वाचनात आला काल परवा. विषय होता - What is non-negotiable in your life? अर्थात तुमच्या जीवनात तुम्ही काही मूल्य अतीव प्रेमादरानी म्हणा, अतिशय ध्यासाने म्हणा अशी ऊराशी धरली आहेत का ज्यांच्याशी तुमच्या जीवनात तडजोडीला स्थान नाही? मग लेखकाने पुढे दिले आहे जर तशी मूल्य नसतील आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल की तुमचं आयुष्य हे वादळात हेलकावे खाणार्‍या नौकेसारखं का भरकटत आहे किंवा तुम्ही समाधानी का नाही आहात तर ते रास्तच आहे ई.

एका (अज्ञात) सैनिकाने लिहिलेल्या हृदयद्रावक कवितेचे भाषांतर!

लेखक सुधीर काळे यांनी गुरुवार, 16/09/2010 20:36 या दिवशी प्रकाशित केले.
श्री. तरुण विजय यांचे टाइम्स ऑफ इंडियावरील ब्लॉग्ज हल्ली वाचनात आले व मला आवडले. श्री. तरुण विजय यांचा परिचय करून दिला जातो तो असा: सिंधु नदीवरची झुळूक, कैलास पर्वतावरचा शिवमंत्र, चुशुलमधील सफर, गोठलेल्या झंस्कारवर चादर पांघरून मारलेली चक्कर. या सर्वांची गोळाबेरीज म्हणजे श्री तरुण विजय! ते श्यामाप्रसाद मुखर्जी रीसर्च फाऊंडेशनचे संचालक असून भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते आहेत.

"सुशि"... बास्सं. आणखी काय !?

लेखक चिगो यांनी बुधवार, 15/09/2010 02:13 या दिवशी प्रकाशित केले.
खरं तर एवढयातच पुन्हा लिवायचा काही विचार नव्हता. पण "धमु" शी खवखवता "सुशि"चा विषय निघाला, आणि खपली निघाली.. सुशिंना मी पहिल्यांदा केव्हा वाचला, आठवत नाही. पण "शॅबी" हा शब्द मी उगाचच्या उगाच वापरायचो, कारण तो "येता.. जाता" मध्ये वाचला होता. पिसाट हसलो होतो हि कादंबरी वाचुन.. खरंच काय रेंज होती ना या माणसाची स्साली ? हृद्य पिळवटुन घ्यायचंय, वाचा मग दुनियादारी, कल्पान्त, क्षितिज, दास्तान, झूम... हृद्याला भोकं पाडून घ्यावीशी वाटतंय?

Paths of Glory

लेखक मृत्युन्जय यांनी मंगळवार, 14/09/2010 13:52 या दिवशी प्रकाशित केले.
काही चित्रपट पाहुन झपाटल्यासारखे होते. मंत्रमुग्ध झाल्यासारखे वाटते. आपण नि:शब्द होतो. स्टेनली कुब्रिक दिग्दर्शित पाथ्स ऑफ ग्लोरी हा असाच एक चित्रपट. लोलिता, आइज वाइड शट, क्लोकवर्क ऑरेंज असे एकापेक्षा एक वादग्रस्त आणि भडक चित्रपट बनवणार्‍या कुब्रिकने पाथ्स ऑफ ग्लोरी सारखी दर्जेदार कलाकृती देखील सादर केली आहे. पाथ्स ऑफ ग्लोरी याच नावाच्या Humphrey Cobb लिखीत कादंबरी वर आधारीत आहे. चित्रपटाला पहिल्या महायुद्धातील जर्मनी आणि फ्रान्स यांच्यामधल्या एका लढाईची पार्श्वभूमी आहे. पण हा युद्धपट मात्र नाही. लढाईमागचे राजकारण हाच या चित्रपटाचा विषय आहे.

सार्वजनिक गणेशोत्सव : जनजागृती

लेखक लीना सचिन चौधरी यांनी सोमवार, 13/09/2010 16:01 या दिवशी प्रकाशित केले.
सार्वजनिक गणेशोत्सव : जनजागृती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना आवाहन -उत्सव त्याच्या मूळ उद्देशानुरूप साजरा करा ! १०७ वर्षांपूर्वी लोकमान्य टिळक यांनी समाजसंघटन, राष्ट्ररक्षण, पाश्चात्त्य संस्कृतीच्या आक्रमणाचा प्रतिकार व धर्मजागृति या उद्देशाने सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला; परंतु सध्या उत्सवाच्या दरम्यान निधिसंकलनातील जबरदस्ती, गणपतीच्या दर्शनासाठी येणार्या महिलांशी असभ्य वर्तन, मंडपात मद्यपान करणे जुगार खेळणे, मिरवणुकीत दारू पिऊन नाचणे, ध्वनिप्रदूषण अशा अनेक गैरप्रकारांमुळे उत्सवाचा मूळ उद्देश हरपला आहे.