आपल्याला आजवरच्या आयुष्यात अनेक विविध प्रसंगांत वेळोवेळी कधी न कधी तरी "नाही" म्हणण्याचे राहून गेले असे झाले असेल. आपले नातेवाईक, शेजार पाजारी समाज काय म्हणेल या भीतीने वेळोवेळी आपल्या मनाविरुद्ध काही गोष्टी कराव्या लागत असतील.
तसे बघा यला गेले तर त्याची सुरुवात आपल्या घरातल्या माणसांपासूनच होते असे म्हटले तरी चालेल.
पालक आपल्या अपेक्षांचे ओझे मुलांवर लादतो. मुलगा/ मुलगी १ ० पास झाली कि कला, वाणिज्य आणि शास्त्र यापैकी शास्त्र हा विषय घेवून त्याने डॉक्टर किवा इंजिनियर व्हावे असे वाटते. भले मग तो विषय त्याला आवडो अगर न आवडो किवा त्याला अभ्यास झेपेल/ नाही झेपेल या विषयी त्याचे मत विचारात घेतले जात नाही.जर तो मुलगा/ मुलगी ठामपणे वेळीच नकार देवू शकला, तर आपल्या हव्या त्या विषयात निपुण होण्याचे स्वप्न पूर्ण करू शकतो.--break--> आज अशी बरीच उदाहरणे आपल्याला अभिनय क्षेत्रात दिसतील कि जे पेशाने डॉक्टर/इंजिनियर असून सुद्धा अभिनय क्षेत्रात काम करत आहेत. उदा. डॉक्टर काशिनाथ घाणेकर , डॉक्टर सलिल कुलकर्णी, डॉक्टर गिरीश ओक तर मेडिसीन मध्ये उच्च शिक्षण घेता घेता ते अर्धवट सोडून समाजकारणात शिरलेल्या मृणाल गोरे हे एक वेगळे उदाहरण.
जे गोष्ट शिक्षणाची तीच लग्नाची. मुले उपवर झाली कि त्यांचे लग्न ठरवताना कित्येकदा पालक मुलांच्या मनाचा विचारच करीत नाही. काही वेळा धाकाने तर काही वेळा कौटुंबिक परिस्थिती जाण असल्याने मुले/मुली लग्न उरकून घेतात पण मग पुढे संसारात त्यांना त्याचे परिणाम भोगायला लागतात. काही जण मग मन मारून नमते घेतात आणि आलेल्या परिस्थीतीशी जुळवून घेतात हे जुळवून घेणे म्हणजे काय तर पुढे आयुष्य भर ते "नाही" हा शब्दच कधी उच्चारात नाहीत. तर काहींनी नंतर नाही म्हटल्या मुळे त्यांचा संसार सुखाचा होत नाही. हे सर्व वेळीच "नाही" म्हटले असते तर टाळता आले असते.
--break-->
या गोष्टीत तर मुलीना तर ती फक्त मुलगी आहे हे मनावर बिंबवून "तू हे करू नको, ते करु नको"असे वारंवार बजावले जाते. आणि मग ती मुलगी पुढे कुठल्याच गोष्टीला विरोध करित नाही.