आज सकाळी लवकर जाग आली म्हणून सहज फिरायला म्हणून गेलो होतो . थंड हवेचा आस्वाद घेत असताना समोर २ वेगवेगळ्या घटना दिसल्या .
एक स्त्री सायकलवरून जाताना दिसली . एकंदरीत पेहरावावरून गरीब घरातली असावी . सायकलला पुढे एक थोडीशी मलिन झालेली पिशवी होती . बहुधा जेवणाचा डबा असावा त्यात . धापा टाकत , हळुवारपणे , सावध गिरीने रस्त्यावरील इतर वाहनांचा अंदाज घेत ती सायकल चालवत होती . प्रचंड घामाघूम झालेली .
दुसरी घटना म्हणजे थोड्याच वेळाने तिथून आणखी एक लट्ठ अशी स्त्री मॉर्निंग वॉक साठी जाताना दिसली . तीही प्रचंड घामाघूम झालेली, रस्त्याचा अंदाज घेत चालत होती अधून मधून पळत होती .
वर पाहता ह्या दोन्ही घटना अगदी सामान्य आहेत . रोजच्या जीवनाचा भाग म्हणा हवं तर . पण त्या एका धावेमागाची करणे वेगळी . एक स्त्री धावते आहे आपल्या व आपल्या कुटुंबाच्या पोटाची खळगी भरण्यासाठी . तर दुसरी धाव आहे आपल्या पोटावर नको असलेले खाउन साठलेली चरबी कमी करण्यासाठी .
ह्या सध्या घटनेने आपल्या समाजातील विरोधाभासाचे प्रत्यंतर समोर आले.
वाचने
2920
प्रतिक्रिया
12
मिसळपाव
प्रतिक्रिया
लठ्ठ म्हण्जे काय?
ते नाही का इरसाल साहेब.."लाडू
In reply to लठ्ठ म्हण्जे काय? by इरसाल
अच्छा ते होय
In reply to ते नाही का इरसाल साहेब.."लाडू by स्पंदना
लिहिताना लठ्ठ लिहिले तरी
In reply to लठ्ठ म्हण्जे काय? by इरसाल
भावना पोहोचल्या म्हणजे कमावलं
हम्म!
हाहाहा !
In reply to हम्म! by अग्निकोल्हा
हा ही लेख घामटा काढणार ,असं
असेच म्हणते.............
In reply to हा ही लेख घामटा काढणार ,असं by अत्रुप्त आत्मा
हा हा हा ….
अगदी बरोबर
In reply to हा हा हा …. by माम्लेदारचा पन्खा
अत्यंत भेदक निरिक्षण!