Skip to main content

विचार

बंड्याचे बुद्धिबळ

लेखक विश्वनाथ मेहेंदळे यांनी शनिवार, 07/12/2013 15:59 या दिवशी प्रकाशित केले.
मी शाळेत असतानाची गोष्ट आहे. उन्हाळ्याची सुट्टी चालू होती. मी माझ्या कुठल्याशा नातेवाईकांकडे काही दिवसांकरिता राहायला गेलो होतो. ज्या बिल्डींग मध्ये आमचे नातेवाईक राहत होते तिथे भरपूर मुले होती माझ्या वयाची. त्यात एक बंड्या नावाचा मुलगा होता. बंड्या तसा हुशार आणि बोलावागायला बरा होता. कधी कधी जरा तऱ्हेवाईक पणे वागायचा. एकटा आणि लाडावलेला असल्याने असेल कदाचित पण आपले तेच खरे करायची त्याला सवय होती. एकदा असेच गप्पा मारताना कळले की हा बंड्या बुद्धिबळ उत्तम खेळायचा म्हणे. नुसते उत्तम नाही तर पूर्ण सोसायटीत त्याला आजवर कुणीही हरवू शकले नव्हते.

पंचाईत

लेखक चिन्मय श्री जोशी यांनी बुधवार, 04/12/2013 23:05 या दिवशी प्रकाशित केले.
हल्ली ना माझी फार म्हणजे फारच पंचाईत होते .... काय कराव आणि कसं वागावं हेच मला कळत नाहीये असं वाटायला लागतं ... आता हेच बघा ना, परवाची गोष्ट ... ऑफिस मध्ये नवीन कलिग ने जॉईन केलं , ती मुलगी इन्फी मधून आलेली .... आल्या आल्या मला विचारते , तुला गैजेट्स नाही का आवडत .... मी सरळ नाही म्हणालो तर माझ्याकडे "कोई मिल गया" मधल्या जादू कडे बघावं तसं बघत नाक उडवून निघून गेली .... काय चुकलं माझं ?? आमच्या सोसायटी मधल्या (बिल्डींग हल्ली खूपच डाऊन मार्केट समजतात म्हणून सोसायटी ...) एका लहान मुलीला विचारलं कि तु शाळेत जाते का ... तर ती मला म्हणते कि मी शाळेत जायला काय मोठी आहे का ??

पॅरलल पार्किंग

लेखक वेल्लाभट यांनी शनिवार, 30/11/2013 17:45 या दिवशी प्रकाशित केले.
गाडी चालवणा-या समस्त लोकांपैकी फार कमी लोकांना पॅरलल पार्किंग व्यवस्थित जमतं. माझ्या सोसायटीतल्या काही महाभागांना तर पार्किंग नावाचं काही असतं हेच माहित नाही; ते येतात आणि जिथे भिंत समोर येईल तिथे गाडी थांबवून उतरून घरी जातात. असो. पॅरलल पार्किंग हे खूप महत्वाचं स्किल आहे स्किल, माझ्या मते. आणि ते यायला हवं. ते वाटतं तितकं कठीण नव्हे. जराशी भूमिती, जरासं गणित, आणि जरासा अंदाज आला, की झालं. मी, मला कळलेलं पॅरलल पार्किंग इथे तुम्हाला सांगावं म्हणतो..

केला इशारा जाता जाता!

लेखक शशिकांत ओक यांनी शुक्रवार, 29/11/2013 14:40 या दिवशी प्रकाशित केले.
केला इशारा जाता जाता ... मि. वॉटसनकडे पहात शेरलॉक होम्सने डाव्या हाताच्या पकडीतील पाईपमधून लांबलचक झुरका घेतला. धुराचा भपका सोडत बारीक नजरेतून... ... बिंदू, अरुणा इराणी वा तत्सम हलकट जवानीची हूल दाखवणाऱ्या बिल्लो राण्यांच्या महिला मंडळाकडून केलेल्या इशाऱ्याची वाट पाहत असलेल्या मर्दांच्या एका हातात लाल पाण्याचा गिलास तर दुसर्‍या हाताच्या मुठीत कडक सिग्रेटची कांडी. ओठांचा चंबू करून धुराच्या गोल गोल रिंगा काढून आपापला धाक जमवणाऱ्या कधी अट्टल पटाईतांकडे, तर कधी शेरलॉक होमला आदरपूर्वक पहात असताना आरोग्यास हानिकारक संवैधानिक उदघोषणा 'पचका' करून जातात.

THANK YOU शेतकरी दादा!

लेखक रामबाण यांनी बुधवार, 27/11/2013 12:36 या दिवशी प्रकाशित केले.
काही वर्षांपूर्वी नेटवर असंच भटकत असताना Thank a farmer (TAF) बद्दल वाचनात आलं. अमेरिकेतला एक शेतकरी १५५ लोकांची भूक भागेल एवढं अन्न पिकवतो म्हणे; त्या शेतकऱ्यांचे मोठे ऋण आपल्यावर आहे, त्यांचे आभार मानायलाच हवे; असं अगदी लहानपणापासून तिथे बिंबवलं जातं. यासाठी thank a farmer day सारख्या संकल्पना पुढं येतात. त्याला शाळेपासून ते कार्पोरेट जगतापर्यंत, समाजाच्या प्रत्येक घटकाचा चांगला प्रतिसादही मिळतो. Have u thanked a farmer today? असं तिथं विचारलं जातं.

विज्ञान आणि चमत्कार - ग्रंथ परिचय

लेखक शशिकांत ओक यांनी बुधवार, 27/11/2013 01:25 या दिवशी प्रकाशित केले.
ग्रंथ परिचय – विज्ञान अणि चमत्कार भानामतीचे खेळ कोण करतो? मृतात्मे – भुते खरी असतात का? युएफओ उर्फ उडत्या तबकड्यांचे रहस्य काय ? शून्यातून वस्तु निर्मिती होते काय ? पुनर्जन्म मानायचा का? अतींद्रीय शक्ती असतात का? देवदूत असतात काय? गणपतीचा चमत्कार कसा होतो? श्रद्धेचे चमत्कारात काय स्थान? या सर्वांवर वैज्ञानिक स्पष्टीकरण आहे काय? असेल तर त्यांचे काय मत आहे? भारतीय ब्रह्मविद्याशास्त्राचे याबाबत काय मत आहे? बुद्धीप्रामाण्यवाद, नियतीवाद, कर्मफल, विधिलिखित या सर्वांचा समग्र संबंध आहे काय?

कसाब अजुन जिवंत आहे का ?

लेखक जेपी यांनी मंगळवार, 26/11/2013 11:18 या दिवशी प्रकाशित केले.
२६/११ मुंबई हल्याला आज ५ वर्ष पूर्ण होतील . त्या हल्यात मृत झालेल्या लोकांना आज ठिकठिकाणी श्र्दांजली वाहिली जातेय . या पार्श्वभूमीवर एक प्रश्न मला काही दिवसा पासुन पडलाय . कसाब अजुन जिवंत आहे का ? मंजे त्याला गुपचूप फाशी दिली ,दफन हि केला . मग त्याचा एखादा फोटो किवां चित्रफित फाशी देतानाची का नाही दाखवली जात . त्या सदाम हुसेन च्या फाशीची चित्रफित पहिली होती आपण . लादेन हि मेला हे निट कळाल . मग कसाब च्या फाशीचा एखादा पुरावा का नाही .

शिव्यांना शिव्या देऊ नये.

लेखक वडापाव यांनी शनिवार, 23/11/2013 02:12 या दिवशी प्रकाशित केले.
अगदी खरं सांगतो, शक्यतो मी शिव्या देत नाही. पण तरी त्यांच्याबद्दल मनात एक आत्मीयता आहे. एक आपुलकीचा आणि कृतज्ञतेचा भाव आहे. विशेषतः मराठी शिव्यांबद्दल; नव्हे, फक्त मराठी शिव्यांबद्दलच. बाकी भाषांमधल्या शिव्या अतिशय नेभळट वाटतात... तर हा एक शिव्यांबद्दलचा कृतज्ञता व्यक्त करण्याचा प्रयत्न. [ज्या शिव्या लेखात दिसतील त्या मी स्वतः कोणाला देत नाहीये, त्यामुळे त्यांच्याकडे केवळ एक (प्रभावी आणि परिणामकारक) शब्द म्हणून पाहिलं जावं ही विनंती. रसभंग होईल या भितीने शक्य तिथे शि* असं न लिहीता शिवी असं पूर्ण लिहीलं आहे, तेव्हा थोर मनानं सांभाळून घ्या.] सुरुवात झाली 'अईला!!' पासून.

२० मिनिटात होणारा व्यायाम - सर्किट ट्रेनिंग

लेखक वेल्लाभट यांनी शुक्रवार, 22/11/2013 07:27 या दिवशी प्रकाशित केले.
व्यायाम हा प्रत्येक आणि प्रत्येक जणाला किती महत्वाचा आहे हे सगळेच जाणतात. ते नव्याने सांगायला नको. पण तो न केला जाण्याची जी अनेक कारणं असतात त्यापैकी जास्तीत जास्त जणांना लागू होणारी आणि टॉप ३ कारणं अशी असतील. १. कंटाळा २. वेळच नाही (याचं खरं कारण क्र.१ आहे) ३. त्यापेक्षा सोप्पं काहीतरी सांग ना पण या तिन्ही कारणांचं समाधान करणारी व्यायामाची एक पद्धती आहे. जिला सर्किट ट्रेनिंग म्हणतात. इथे सर्किट म्हणजे व्यायामप्रकारांची एकामागोमाग केलेली जोडणी. ४ ते ५ मोजके व्यायामप्रकार घेऊन ते एकामागोमाग ठराविक वेळ, किंवा ठराविक वेळा केले जातात आणि असं ठराविक वेळ/ठराविक वेळा केलं जातं.