अर्थक्षेत्र.....एक उपेक्षित क्षेत्र
दिवाळी ते मे महिना कसली नि कसली शिबिरे चालू असतात. व्यक्तिमत्व विकास शिबीर, क्रिकेट शिबीर, टेनिस शिबीर, तबला पेटी नृत्य गायन ह्याचा रतीब चालूच असतो म्हणजे पर्यायाने खेळ गायन पाककृती कलादालन (मीपवारही अर्थ दालन असावे असे वाटते.) वगैरे बरेच काही विषय पैसे देऊन हाताळले जातात. बरे पालक पण किती चोखंदळ असतात देव जाणे कारण शेजारचा जातो म्हणून माझा जातो इथपासून ते "आहो तेवढाच आम्हाला मोकळा वेळ मिळतो!!" पर्यंतची मुक्ताफळे मी पालकांकडून ऐकत आलो आहे.
मिसळपाव