काल संध्याकाळी एका वातानुकुलित मॉल मधे शिरतांना कानांवर एक संवाद धडकला
दारामधेच,सर्वांगाला तपासून आत सोडण्याच्या यंत्रामधून मी जात असतांना तिथे उभ्या असलेल्या दोन सिक्युरिटी गार्ड्स स्त्रिया बोलत होत्या -
पहिली स्त्री - कल करवा चौथ का उपास किया का गं? मैने तो नहीं किया, बहुत कडक होता हय!
दुसरी स्त्री - कुत्सितपणे हसत, करवा चोथ! मेरेकु इसी जनम में पती नहीं चाहिए तो आगेके सात जन्मोंके लिए कौन उसे मांगेगा!
मी ते ऐकून पुढे सरकले पण डोक्यामधे तो संवाद घोळत राहिला. मॉलमधे ब-याच स्त्रिया हातावर मेंहदी काढलेल्या दिसल्या तेंव्हा वाटलं हे करवा चौथ नेमकं काय असेल बरं? माझ्या मैत्रिणीला विचारलं पण तिने, तिला माहित असलेलं एकचं वाक्य सांगितलं,'पती की लंबी उमर के लिए करते हैं, शायद'. अर्थात तिला हे उत्तर तिच्या आई आणि सासूने सांगितलं होतं.
तसं तर मी हरतालिका आणि वटसावित्री पौर्णिमा हे दोन उपवास ऐकले/बघितले आहेत जे लग्न झालेल्या स्त्रिया त्यांच्या पतीसाठी करतात.
पण हे सगळे उपवास नेमके कोणी सुरू केले असतील? माझ्या आजीला विचारलं तर ती म्हटली,'अगं आमच्या काळी ब-याचदा पुरूषमंडळी कधी व्यवसायानिमित्त दूरदेशी जायची तर कोणी सैन्यात भरती व्हायचे किंवा एखाद्या आजाराने पिडीत असायचे. त्यामुळे, लग्न झालेल्या स्त्रियांना पतीचा सहवास एकूणच कमी मिळायचा. तसंच, तिचं कुंकू बळकट रहावं, धडधाकट परत यावं म्हणून हे सगळे उपास-तापास लावले होते बघ! पण हल्लीच्या काळी ह्या प्रथेला तोच अर्थ राहिला आहे असं म्हणता नाही येणार. कारण तंत्रज्ञानामुळे नवरा-बायको जरी एका शहरामधे नसले तरी सतत संपर्कात राहू शकतात, ख्याली-खुशाली जाणून घेऊ शकतात. तेंव्हा हा उपवास करायलाच हवा असं काही गरजेचं नाही. हां पण, हल्ली हे सुध्दा वाढलंय की पोरी वर्षातून हा एक दिवसाचा उपवास करतात आणि बाकी वर्षभर किंवा आयुष्यभर नव-याचा जीव खातात! मी म्हणते कशाला करायचा तो दिखाऊपणा, त्यापेक्षा उपवास न-करता दोन गोड शब्द बोला त्याच्याशी म्हणजे तो सुखी होईल'.
आजीने तर अगदी सहजरीतीने जुन्या-नव्याची सांगड घालत ह्या उपवासाचं रूप मला समजावून सांगितलं. पण मला अजून एक प्रश्न पडला,'आजी जशा स्त्रिया त्यांच्या पतीसाठी असा उपवास करतात तसा पुरूष करतात का गं?' ह्यावर आजी अगदी मनमोकळेपणाने हसली आणि माझ्या डोक्यात टपल मारत म्ह्टली,'वेडी गं वेडी, पुरूषमंडळी कधीच कोणताच उपवास करत नाहीत निदान स्वतःच्या बायकोसाठी. माझ्या उभ्या आयुष्यात मी असा एकही पुरूष आपल्या कुटुंबात किंवा आसपास बघितला किंवा ऐकला नाही! पण असं आहे बघ की, त्यांच्या मनामधे आपल्याविषयी प्रेम, काळजी नाही असं नाही. पण, त्यांना स्त्रियांसारखं ते व्रत-वैकल्य करून सिध्द करता येत नाही.
पण मला काय वाटतं माहित आहे का, खरं तर हे सगळे व्रत-वैकल्यं ना बायकांनीच स्वत:चं मन रमवून घेण्यासाठी सुरू केले असावेत कारण पूर्वीच्या काळी टीव्ही वगैरे नव्हते ना' आणि आजी खुदकन हसली :)
हम्म तर हे होतं आजीचं मत पण मंडळी तुम्हांला जर 'करवा चौथ' किंवा 'हरतालिका' ह्या व्रतांची खरी-खुरी काही कथा माहित असेल तर जरूर सांगा :)
वाचने
9962
प्रतिक्रिया
41
मिसळपाव
प्रतिक्रिया
करवा चौथ
प्रतिक्रियेसाठी धन्यवाद
In reply to करवा चौथ by प्रसाद गोडबोले
दहाएक वर्षांपूर्वी
प्रतिक्रियेसाठी धन्यवाद रेवती
In reply to दहाएक वर्षांपूर्वी by रेवती
खुसपट
In reply to दहाएक वर्षांपूर्वी by रेवती
बिनाधुली म्हणजे सालासकट हो.
In reply to खुसपट by सुनील
भन्नाट लेख आणि भन्नाट प्रतिसाद
In reply to दहाएक वर्षांपूर्वी by रेवती
रंगाकाकांना लक्षात तरी असेल
In reply to भन्नाट लेख आणि भन्नाट प्रतिसाद by एस
काय हो रंगाकाका
In reply to रंगाकाकांना लक्षात तरी असेल by रेवती
आधी उपासतापास करायचे आणि नंतर
कवितेची लिंक दिल्याबद्दल
In reply to आधी उपासतापास करायचे आणि नंतर by सूड
हा एकूण प्रकार कसा
च्यायला खालची पोष्ट टाकल्यावर
In reply to हा एकूण प्रकार कसा by बॅटमॅन
लोकहितवाद्यांची शतपत्रे.- निरुद्योगीपणाच्या चाली..
१८४९ सालचं पत्र?? कोणाचं आहे
In reply to लोकहितवाद्यांची शतपत्रे.- निरुद्योगीपणाच्या चाली.. by यसवायजी
http://en.wikipedia.org/wiki
In reply to १८४९ सालचं पत्र?? कोणाचं आहे by क्रेझी
:)
>> लहानपणी ही एखादी शिवी आहे
In reply to :) by राजो
पाखरं फार डायट कॉन्शिअस
च्यामारी मी म्हणतो ही
In reply to पाखरं फार डायट कॉन्शिअस by मदनबाण
अलीकडे अल्पसंख्य व फेमिनाझी
In reply to च्यामारी मी म्हणतो ही by बॅटमॅन
दुखावणं सोडाच पण दुर्लक्ष देखील करता कामा नये...
In reply to च्यामारी मी म्हणतो ही by बॅटमॅन
धरले की चावतात आणि सोडले की
In reply to दुखावणं सोडाच पण दुर्लक्ष देखील करता कामा नये... by सुहासदवन
नशिब ! पाखरांना स्वतःचे
In reply to पाखरं फार डायट कॉन्शिअस by मदनबाण
लाख बोललात बघा... !!
In reply to नशिब ! पाखरांना स्वतःचे by मितान
येस्स!
In reply to नशिब ! पाखरांना स्वतःचे by मितान
डायट अन्कॉन्शसपणावरूनच पहायचे
In reply to नशिब ! पाखरांना स्वतःचे by मितान
हम्म
ती मंगळाची असल्याने तिचे एक
In reply to हम्म by पैसा
.
In reply to हम्म by पैसा
नाही
In reply to . by उद्दाम
एकदम सहमत आहे ह्या लेखाशी
पूर्वीच्या काळात बाकी माहित
फार छान व्रत आहे
आज काल तरुण पोरीच काय अनेक
..
भारतीय स्त्रीवादी लिखाण ...
+१
In reply to भारतीय स्त्रीवादी लिखाण ... by ३_१४ विक्षिप्त अदिती
स्त्रीयांनो आधूनिक व्हा.
निषेध.
निषेध मान्य.
In reply to निषेध. by प्रभाकर पेठकर