Skip to main content

विचार

भारतीय गणित काल, आज व उद्या

लेखक शनआत्तार यांनी बुधवार, 04/09/2013 19:02 या दिवशी प्रकाशित केले.
भारतीय गणित काल, आज व उद्या विधात्याने पृथ्वीवर जो पहीला मानव पाहिला तो काहीसा भयचकित, भयचित्त मनाने दाही दिशांचा विश्वासा अफाट व बहुरंगी पसारा तो पाहू लागला. त्यालाच काहीच उमजेना आणि आकलनही होईना. तेव्हा उंच आवाजात त्याने स्वत:शिच एक प्रश्न केला, “ को हम? “ म्हणजे कॊण आहे मी? त्यावेळी त्याला त्या निळ्य़ाभोर, निरभ्र अवकाशात एक हसतमुख ईश्वराचे दर्शन झाले.

शिक्षण क्षेत्रात येवू घालतोय सिंधूदुर्ग पॅटर्न

लेखक शनआत्तार यांनी बुधवार, 04/09/2013 18:59 या दिवशी प्रकाशित केले.
शिक्षण क्षेत्रात येवू घालतोय सिंधूदुर्ग पॅटर्न परशुरामाचा प्रदेश म्हणजे बुद्दीवंताचा प्रदेश अशी ओळख कोकणाची आहे. याच कोकणातून विचारवंत खेळाडू, शास्त्रज्ञ, समाजसेवक, स्वातंत्रसेनानी, कलाकार, लेखक अशा अनेक क्षेत्रांत कोकणपुत्रानी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे हे सर्वांना ज्ञात आहे. अशी ओळख असलेल्या कोकणाची मुंबई ला चाकरमाणी पुरवीणारा प्रदेश अशीही ओळख होती. मनिऑर्डवर चालणारी घरे आठवली तर आजची कोकणाची प्रगती पाहता आपसूक तोंडात बोटे जातात. शिक्षणामूळे व्यक्तीची , समाजाची व अनुशंगाने देशाची प्रगती होत असते.त्याच बरोवर दिशा देणारा पालकही असावा लागतो.

आम्हां घरी धन.....(३)

लेखक मोदक यांनी बुधवार, 04/09/2013 16:02 या दिवशी प्रकाशित केले.
आम्हा घरी धन... आम्हां घरी धन ...(२) ---------------- धन्यवाद मंडळी! पहिल्या आणि दुसर्‍या धाग्याला उदंड प्रतिसाद मिळाला. अनेक उत्तमोत्तम उतारे, कविता सर्वांना वाचायला मिळाले. पण आता तिथे नव्या प्रतिक्रिया, नवे उतारे शोधणे अवघड होऊन बसले आहे. त्यामुळे या धाग्याचा पुढचा भाग सुरू करत आहे. चला.. आपल्याला आवडलेल्या कविता, ओळी, छोटेखानी लेख, वन लाईनर्स, टॅन्जंट्स, सुभाषिते..

हैराण इराण !!

लेखक सुधीर मुतालीक यांनी रविवार, 01/09/2013 17:53 या दिवशी प्रकाशित केले.
14 जुन ला इराणच्या नवीन म्हणजे ११ व्या अध्यक्षांसाठी निवडणुका झाल्या. इराणी जनतेने भरभरून मतदान केले. पाच कोटी पाच लाख मतदारांपैकी घसघशीत ८०% मतदारांनी मतदान केले. अमेरिकी अध्यक्षीय निवडणुकी पेक्षा प्रचंड मतदान झाल्याने इराण मध्ये लोकशाही नाही असे म्हणणा-यांची तोंडे काही काळासाठी तरी बंद झाली होती. अमेरिकेच्या निवडणुकीत ५०% च मतदान झाले होते. निवडून आलेल्या हासन रोहानी यांना ५०% हून थोडे अधिक मतदान झाले. रोहानी अध्यक्ष होणार हे समजल्यावर इराणी जनतेने एका अर्थाने सुटकेचा नि:श्वास टाकला होता. कारण इराणी जनता आता एकूणच त्यांच्या सद्य परिस्थितीला पकली आहे.

ती आणि मी - सुख म्हणजे आणखी काय असते.. (७)

लेखक तुमचा अभिषेक यांनी शनिवार, 31/08/2013 23:37 या दिवशी प्रकाशित केले.
दर दुसर्‍या तासाला येणारा तिचा फोन.. आज ऑफिसला पोहोचून तीन तास उलटून गेले तरी आला नाही तेव्हा चुकचुकल्यासारखे वाटणे साहजिकच होते.. मात्र कामाच्या घाईगडबडीत डोक्यात येणारे सारेच विचार तसेच रेंगाळत ठेवता येत नाहीत.. दुपारी खिशातला फोन खणखणला तेव्हा तिची आठवण झाली, पण वेगळाच नंबर पाहून चुटपुटलो.. तेवढ्यापुरतेच.. कारण समोरून आवाज तिचाच होता, बातमी तेवढी चांगली नव्हती.. बाईसाहेब फोन कुठेतरी हरवून आल्या होत्या.. तिच्यावर ओरडावे कि डाफरावे या विचारांत असतानाच तिने फोन कट देखील केला. कदाचित मला हे कळवण्यापुरताच केला असावा.. ते ही खरेच, दुसर्‍याच्या फोनवरून कितीसे बोलणार..

पुरुष विभाग धागा क्र.३---- संसार देवाची कहाणी-----

लेखक मुक्त विहारि यांनी शुक्रवार, 30/08/2013 17:44 या दिवशी प्रकाशित केले.
माझे मित्र म्हणतात की तुझा संसार सुखाचा आहे.असेल,कदाचित तसेही असेल.कारण मी "संसार देवाची" रोज पुजा करतो.माझे लग्न झाल्यावर, माझ्या वडीलांनीच मला हे व्रत करायला सांगीतले.मी तर सुखी झालो (मित्र खोटे बोलत नाहीत, हे मी आधीच पु.वि.धा.क्र.२ मध्ये स्पष्ट केले आहेच.... http://www.misalpav.com/node/24546 ) नमनाला इतके तेल खूप झाले.

एका गाजलेल्या पुस्तकाचे परिक्षण

लेखक दशानन यांनी बुधवार, 28/08/2013 21:50 या दिवशी प्रकाशित केले.
आज प्रदर्शनात दुपारी थोडावेळ मिळाला म्हणून एक पुस्तक वाचण्यासाठी हाती घेतले. प्रथमदर्शनी पुस्तकाचे निर्माण कसे करु नये? याचे उत्तम उदाहरण म्हणून हे पुस्तक नक्कीच खपून जाईल, त्यामुळेच तर याला उत्कृष्ट वाडमयीन त्यावर्षी मिळाला होता. कव्हर ३०० जीएसम च्या जागी ३०५ आणि आतील पाने ५८ जीएसम च्या जागी ६० वापरली असती तर अजून हे पुस्तक चांगले घडू शकले असते, मॅथलीतो च्या जागी नॅचरल असता तर जगात भारी पुस्तक निर्माण झाले असते. पुस्तकाचे वजन अंमळ जास्त आहे, थोडी काही शे पाने कमी केली असती तर वजन नक्कीच कमी झाले असते.

जोवरी हे जग, जोवरी भाषण - २ : पार्श्वभूमी

लेखक तिरकीट यांनी रविवार, 25/08/2013 17:27 या दिवशी प्रकाशित केले.
गीतरामायणाची मूळ संकल्पना सीताकांत लाड यांची. १९५५ साली पुणे आकाशवाणीमध्ये सहनिर्देषक म्हणून काम करत असलेल्या लाड यांनी ही कल्पना गदिमांना बोलून दाखवली. गीतकार म्हणून ग. दि. माडगुळकर आणी संगीतकार म्हणून सुधीर फडके या द्वयीची निवड करण्यात आली. तिघांच्या चर्चेतून 'गीतरामायण' हे शीर्षक ठरले. गुढीपाडव्याला सुरुवात करून आठवड्याला १ याप्रमाणे ५२ गीते पुणे आकाशवाणी वरून सादर करण्याचे ठरले.

जादूटोणा विरोधी कायदा - एक अनावश्यक, अव्यवहार्य आणि उपद्रवी कायदा (लेखांक-२)

लेखक गंगाधर मुटे यांनी शुक्रवार, 23/08/2013 23:22 या दिवशी प्रकाशित केले.
जादूटोणा विरोधी कायदा - एक अनावश्यक, अव्यवहार्य आणि उपद्रवी कायदा (लेखांक-२)