Skip to main content

विचार

शतशब्दकथा स्पर्धेच्या निमित्ताने

लेखक आदिजोशी यांनी सोमवार, 03/08/2015 18:34 या दिवशी प्रकाशित केले.
स्पर्धेसाठी लिहिलेल्या कथेचा सिक्वलही लिहायचा आहे हे वाचल्यावर एक गोष्ट लक्षात आली त्यासाठी धागा काढतोय. आदूबाळच्या धाग्यावरही ते सांगता आलं असतं. पण हा मुद्दा त्या धाग्यावरील इतर प्रतिसादांपुढे वाचला गेला नाही तर स्पर्धकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे म्हणून नवा धागा. पुरेशा लोकांनी वाचल्यावर हा धागा उडवला तरी चालेल. आत्ता उडवला तरी चालेल. तर... वाचकांना ही विनंती आहे की... कथेचा पुढचा भाग काय असेल ह्या संबंधीचे तुमचे अंदाज कॄपा करून धाग्यावर टाकू नका. धन्यवाद.

बाहुबली बघा व्यवस्थापन नीती शिका

लेखक पाटीलअमित यांनी शुक्रवार, 31/07/2015 16:26 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्व प्रकाशित बाहुबली हा चित्रपट सगळ्यानीच बघतील असणारच ,पण तो चित्रपट म्हणून न बघत एक बोधप्रद कथा म्हणून बघीतले तर कसे होईल ह्यासाठी हा खटाटोप बाहुबली मधून ह्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत दूरदृष्टी / नियोजन :- बाहुबलि चे काम नियोजन बद्ध होते ,त्रिशूल व्युह चे आधीच ठरवून आला होता ,जेव्हा भ्रष्ट मंत्री उडी मारतो तेव्हा आधी पासून ठेवलेली दोरी काम येते नात्यांची जपणूक :- जेव्हा भल्ला देव ने काल्केल्या मारले किवा त्याचे नाव राजा म्हणून पुकारले गेले तेव्हा कॅमेरा बाहूबलीकडे मुद्दाम रोखला गेला होता ,त्याचा चेहरा शांतच होता

बॉलीवूड, टीवी आणि स्टिरियोटाइप.

लेखक पद्मावति यांनी गुरुवार, 30/07/2015 20:25 या दिवशी प्रकाशित केले.
एकदा माझी तामिळ मैत्रीण तावातावाने मला सुनवत होती होती...'यू नॉर्थ इंडियन पीपल'...हो, ती अशी हमरीतुमरी वर आली की मला नेहमी यू नॉर्थ इंडीयन्स वगैरे म्हणते न चुकता. आपल्याला कसं कमीतकमी चार दिशा माहीत असतात नं, तशा माझ्या या मैत्रिणीला दोनच दिशा माहिती आहेत. उत्तर आणि दक्षिण. तामीळनाडू, केरळ पासून वरती साधारणपणे हैदराबाद पर्यंत साऊथ इंडिया आणि हैदराबाद च्या वरती सगळा नॉर्थ इंडिया. बाकी महाराष्ट्र, गुजरात तिकडे बंगाल हे असले कॉंप्लिकेशन्स नकोच आपल्याला. असो. पण तिचा मुद्दा असा होता की आपल्या हिंदी चित्रपटांमधे दक्षिण भारतीय पात्रांना फारच विनोदी दाखवतात.

रावणाचे उदाती कारण

लेखक पाटीलअमित यांनी गुरुवार, 30/07/2015 16:22 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्व प्रकाशित रावणाचे उदाती कारण शारुख खान च्या रा वन मध्ये एक वाक्य आहे "तुम लोग रावण को हर साल जलाते हो क्युंकी वोह कभी नाही मरता" आज आपल्या भारत देशा सारख्या संस्कृतीचे मिरवणार्या मध्ये हे काय चालले आहे १) कोणते हि वर्तामान पत्र बघा ,याकुब मेमोन च्या फाशीची बातमी कलाम यांच्या पेक्षा जास्त आहे २) जेव्हा माननीय ठाकरे साहेब यांचे देहावसान झाले तेवा पण कसाब ची चर्चा जास्त झाली ३) २ दिवसाआधी तर कहर झाला twitter वर कलाम हे trending असायला पाहिजे तर प्रतिभा पाटील ह्या दिसत होत्या आपले लोक का फुटकळ गोष्टीना एवेढे मह

स्स्स्साली वृत्ती नाही बदलली.!!!

लेखक आगाऊ म्हादया यांनी मंगळवार, 28/07/2015 07:41 या दिवशी प्रकाशित केले.
मी जिथे काम करतो तेथील प्रसंग. इतके दिवस जुनाट कपाटं, कागद, वाळलेल्या पापडासारखी पोस्टर्स, निवांत सरकारी कामं, एका बाईचा तार सप्तकातला इरिटेटिंग स्वर अस एकंदर स्वरूप. परवा अचानक गडबड झाली, खडबडून जाग आली म्हणा ना...सगळी पोस्टर्स पुसून घ्यायला लावली...कुणाला?? संशोधकांना...आम्हाला देण्यात येणाऱ्या पगारात हे ही समाविष्ट असत वाटत. नवीनच कळलं. १ महिना रखडलेल्या पोस्टरच काम १ तासात उरकलं गेलं अन ते प्रिंट करायला धाडण्यात आलं. जुनी कपाटं नवीन दिसण्याचे दुबळे प्रयत्न करून झाले. कार्पेट नवीन, पायपुसणी नवीन एवढच काय तर चहाचे कपदेखील नवीन.

भारतरत्न अब्दुल कलाम

लेखक विकास यांनी सोमवार, 27/07/2015 22:01 या दिवशी प्रकाशित केले.
APJ Kalam भारतरत्न अब्दुल कलाम हे अधुनिक भारतातले एक विरळ आणि सुखद उदाहरण आहे. एक संशोधक जो नंतर राष्ट्रपती झाल्याने राजकारणी म्हणता येईल अशी ही व्यक्ती जी तरी देखील जनसामान्यात लोकप्रिय झाली. कलामांची वाक्ये सुविचार म्हणून आजही जालावर फिरत असतात. आणि ती त्यांची आहेत म्हणून लोकांना प्रेरणा घ्यावीशी वाटते, यात बरेच काही आले. आज भारतात विशेषतः महाराष्ट्रात तमाम जनता आषाढी पाळत आहे आणि विठ्ठलाचे दर्शन घेत आहे.

भात

लेखक प्रसाद गोडबोले यांनी शुक्रवार, 24/07/2015 16:30 या दिवशी प्रकाशित केले.
भात हां तर झाले असे की गणेशा म्हणाला "समाधान हॉटेल , रावेत ला जाऊ , मस्त चुलीवरील मटन भाकरी खाऊ , कोणी आले तर आले नाही तर आपले आपण! " . 'आपले हाल होणार' हे स्पष्ट दिसत असल्याने आमच्या शाकाहारी मित्राने टांग दिली , आणि मग दुसर्‍या शाकाहारी मित्राला बोलावण्यात काही पॉईंट नाही असे वाटल्याने त्यांन्ना फोन करण्याचे टाळेल पण अस्मादिकांन्नी विचार केला की हे अत्ता लगेचच चातुर्मास सुरु होत आहे त्या आधी एकदा जोरदार बेत होऊनच जाऊदे ! मग काय , अप्रतिम मटन भाकरी खाल्ल्या नंतर पाना मध्ये आला

भात

... आई शप्पथ ! काय चव होती म्हणुन सांगु !

आमची(ही) निष्काम साहित्यसेवा : पूर्वप्रकाशित

लेखक विशाल कुलकर्णी यांनी शुक्रवार, 17/07/2015 12:57 या दिवशी प्रकाशित केले.
आज अचानक झुक्याच्या थोबडापुस्तकाने दोन-तीन वर्षांपूर्वी लिहीलेल्या एका लेखाची आठवण करून दिली. हा लेख त्यावेळी देवकाकांच्या होळी विशेषांकासाठी लिहीला होता. त्यामुळे तो अंक आनि माझा ब्लॉग सोडला तर इतरत्र कुठेच प्रकाशित केल्याचे आजतरी आठवत नाहीये. म्हणून हा जुनाच लेख आज पुन्हा मिपाकरांसाठी इथे पोस्ट करतोय. कोणी आधी वाचला असेल तर क्षमस्व ! ************************************************************************** लिहायला सुरूवात करून आता बरीच वर्षे झाली. आधी आम्ही काय लिहीतोय हे कुणालाच कळायचं नाही…..(कधी कधी आम्हालाही नाही)! कारण आमचे लेखन नेहमीच कधी चि.वि., कधी द.मा.

तंत्रशिक्षण निर्णायक वळणावर … ३ (अंतिम )

लेखक खेडूत यांनी गुरुवार, 16/07/2015 16:59 या दिवशी प्रकाशित केले.
भाग ३ (अंतिम ) भाग १ भाग २ २०१५ आज ३२ वर्षानंतरही संस्था वाढवण्याची स्पर्धा कमी होत नाही. कापड गल्लीत अजून एक कापडाचं दुकान चालतंच ! किंवा अजून थोडं वेगळं उदाहरण. एखाद्या मंदिरात जत्रेनिमित्य लाखोंची गर्दी होणार, आणि येणारा प्रत्येकजण एक प्रसादाचा नारळ घेणार असेल तर नारळाची भरपूर दुकाने निघणारच. काहीजण चार दुकाने टाकणार तर कुणी फक्त भांडवल टाकून दुकान दुसऱ्याला चालवायला देणार. विशिष्ठ लोकेशनच्य दुकानाचे अन ओरडणाऱ्याचे जास्त नारळ खपणार.