Skip to main content

विचार

तीस रुपयाची छॉटीसी गोष्ट

लेखक शब्दानुज यांनी गुरुवार, 16/07/2015 13:03 या दिवशी प्रकाशित केले.
कॉलेज चालू होऊन थोडेच दिवस झाले होते. अशाच एका संध्याकाळी माझ्या एका मित्र्ाने एका अमुक एक ठिकाणाच्या मंदिराकडे जाणार असल्याचे ठरवले. ते ठिकाण जवळपास ३ तासांच्या अंतरावर होते. अमुक एक तिथीला मित्र्ाच्या घरचे तिथे जात असत. यावेळेस हा जाणार होता. सोबतीसाठी त्याने मला विचारले.मी लगेच राजी झालो. सकाळी ८ च्या आासपास आम्हाला बस मिळाली. खडडयातुन आमची गाडी मंदगतीने पुढे सरकत होती. थोड्याच वेळात आमच्या गप्पांना आम्हीच कंटाळलो आणि झोपी गेलो. यथावकाश ती बस एकदाची पोहचली. तीन तासाचा प्रवास आणि जवळपास शंभराहुन जास्त पैसे मोजुन आम्ही तिथे पोहचलो. तिथे अर्थातच गर्दी पसरली होती.

तंत्रशिक्षण निर्णायक वळणावर … २

लेखक खेडूत यांनी मंगळवार, 14/07/2015 18:59 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ २००० मागील भागात पाहिलं त्याप्रमाणे वेगवेगळ्या कारणांनी तंत्रशिक्षणाचा हळूहळू दर्जा खालावत गेला. पण सगळं वाईटच आहे का? तर नाही. म्हणजे बऱ्याच अंशी चांगल्या संस्थांची गरज होती. पण चांगल्या चार- पाच आणि वाईट पन्नास असं झाल्यानं हे सगळे क्षेत्रच वाईट असा समज झाला. काय निवडावं लोकांना कळेनासं झालं. गावातलं कॉलेज - राहायचा खर्च नको व्हायला म्हणून जवळ प्रवेश घेतला तर स्पर्धेत मागे पडतो आणि पुण्यात जाउन घ्यावं तर अतिसुमार ठिकाणी मिळते आणि हे नंतर कळते! अशा पेचात ग्रामीण भागातली मुलं फ़सतात.

तंत्रशिक्षण निर्णायक वळणावर …१

लेखक खेडूत यांनी सोमवार, 13/07/2015 19:00 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या परिचयाचे कित्येक जण इंजिनियर असतात. शहरांत तर घरटी एक इंजिनियर असणे आता फार दूर राहिले नाही. तंत्रशिक्षणाची अधोगती झाली असं आपण ऐकतो त्याच वेळी दोन्ही टोकाची उदाहरणं दिसतात! कुणी भारतीय इंजिनियर देशात अथवा परदेशांत काहीतरी मोठी कामगिरी करताना दिसतो तर त्याच वेळी कुणी इंजिनियर कॉल सेंटरमध्ये जाताना, विमा एजंट किंवा एखाद्या सहकारी ब्यांकेत वीजबिलं स्वीकारताना दिसतो. तुमचा किराणा दुकानदारसुद्धा इंजिनियर असू शकतो , अतिशयोक्ती नाही. पूर्वी बेकारीत रहाणारे इंजिनियर आता मिळेल ते काम करताना दिसतात हे एका अर्थी बरंच झालं. पण प्रश्न असा पडतो की असे का व्हावे?

श्री निरंजन रघुनाथ चरित्र भाग 1

लेखक शशिकांत ओक यांनी बुधवार, 08/07/2015 00:11 या दिवशी प्रकाशित केले.

श्री निरंजन रघुनाथ चरित्र भाग 1

माझे वडील कै. जनार्दन चिंतामण ओक यांनी साधारणपणे सन 1955च्या सुमारास आपल्या हस्ताक्षरात लिहिलेले बाड मला माझी आई कै. मंगला ओक बेहेरे वृद्धाश्रमांत राहात असताना सहज हाती लागले. सन 2012 मधे हे सर्व लेखन टाईप करून ठेवले होते परंतु काही शब्द व पाने टायपिंग करायची राहिल्याने ते अप्रकाशित होते. आज ते कागद सहजी हाती आले व उरलेले लेखन टाईप करून तयार झाले.

फिल्म इन्स्टिट्यूटचा पेच

लेखक आशु जोग यांनी मंगळवार, 07/07/2015 21:39 या दिवशी प्रकाशित केले.
फिल्म अँण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही पुण्यातली संस्था सध्या गाजते आहे ती तिथल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे. नवे अध्यक्ष आल्यानंतर त्यांच्या विरोधात हे आंदोलन सुरु आहे. या अध्यक्षांनी अजून कामाला सुरुवातही केलेली नाही. तोवर या आंदोलनाला सुरुवात झाली. का तर अमुक तमुक प्रकारचा अध्यक्ष आम्हाला नको.

'किल्ला' आणि प्रेक्षक!

लेखक लई भारी यांनी गुरुवार, 02/07/2015 11:14 या दिवशी प्रकाशित केले.
(चित्रपट पाहिला नसल्यास सूचना: काही किरकोळ स्पॉइलर आहेत, त्यामुळे नंतर तक्रार चालणार नाही :) ) काल रात्री किल्ला पाहण्याचा योग आला. चित्रपट निश्चित आवडला पण प्रेक्षकांचा प्रतिसाद बघून काही (अस्वस्थ करणारे) प्रश्न पडले. चित्रपटाचा विषय खूप तरल आहे आणि विनोदी प्रसंगांची पेरणी असली तरी ती गरजेनुसार वातावरण निर्मितीसाठी किंवा असे म्हणूयात एकसुरी/संथ होणे टाळण्यासाठी केली आहे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हा चित्रपट खूप बोलत नाही. दृश्य-परिणामकारकता(शब्द चुकल्यास सुचवावे), पार्श्वसंगीत आणि शांतता यातून खूप गोष्टी सांगून जातो. हा चित्रपट एक अनुभव म्हणून आपल्याशी जोडून घ्यायचा आहे असे मला वाटले.

लंपन मालिका वाचून संपली!

लेखक लई भारी यांनी गुरुवार, 02/07/2015 10:20 या दिवशी प्रकाशित केले.
गेले कित्येक दिवस/महिने बाजूला ठेवत आलेलं 'झुंबर' आज वाचून संपलं. हुरहूर लागणार माहित होती आणि मलपृष्ठ वाचून शेवटच्या कथेत काय असणार याचा अंदाज आला होता पण वाचत असताना वेगळंच काही तरी होत होतं. 'स्पर्श' वाचत असताना सुरुवातीला 'संकेश्वर', 'गडहिंग्लज', 'आजरा' ही ओळखीची आणि जवळची गावे बघून छान वाटत होत, त्यात लंपन च्या आई-बाबांचं गाव बहुधा 'पुणे' असावं असंही सुचित झालं जे आज पर्यंत माझ्यासाठी कोड होत किंवा लक्षात नव्हत आलं . एकंदरीत या कथेचा बाज थोडा वेगळा वाटत होता, आतापर्यंतच्या इतर कथांपेक्षा.