Skip to main content

विचार

सांगलीकरांचे काही खास शब्द

लेखक दा विन्ची यांनी शुक्रवार, 28/08/2015 15:21 या दिवशी प्रकाशित केले.
प्रत्येक गावाच्या बोली भाषेचा एक विशिष्ट ढंग /लहेजा असतो. बऱ्याचदा हे काही खास शब्द ऐकल्यावर आपल्याला आपल्या गावाला गेल्याची अनुभूती येते. मिपा वरती तसे पुणेकर , मुंबईकर, कोल्हापूरकर आणि नागपूरकर व त्यांची भाषा आणि खास ढंग यावर बरेच धागे आहेत . खाली काही खास सांगलीचे शब्द आहेत. कोल्हापूर अगदीच शेजारी असल्याने काही शब्द दोन्हीकडेही असणे शक्य आहे .

सयाना (मांत्रिक इ.) आणि फेसबुक (मिडिया इ.)

लेखक विवेकपटाईत यांनी गुरुवार, 27/08/2015 21:18 या दिवशी प्रकाशित केले.
(या लेखाचा उद्देश्य घटनेची सत्य/ असत्यता पडताळणे नव्हे तर लोकांच्या मनोवृतीवर प्रकाश टाकण्याचा आहे) मागासलेली गरीब अनाडी जनता आपल्या समस्या सोडविण्यासाठी गावातल्या सयाना (मांत्रिक म्हणा, ओझा म्हणा ) कडे जाते. या सयानाचे सरळ देवा सोबत कॅनेक्शन असते. भूत, प्रेत, हडळ, चुड़ैल या सर्वाना काबूत ठेवण्यात तो समर्थ असतो. गावात किंवा पंचक्रोशीत काहीही वाईट घडले असेल, कुणाचा अकाल मृत्यू झाला असेल किंवा कुणाचे नवजात मुल दगावले असेल. तर कुणाच्या करणी मुळे असे झाले हे सयाना बरोबर हुडकून काढतो. एकदा जादू टोना, करणी करणार्या हडळ / चुड़ैल कोण आहे हे कळले कि मग काय विचारावे.

निसर्गाने दिलेला धोक्याचा इशारा: १०- मदतकार्यातील सहभागाचा शेवटचा दिवस (अंतिम)

लेखक मार्गी यांनी गुरुवार, 27/08/2015 11:55 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मान्यवरांना मन:पूर्वक अभिवादन! उत्तराखंडच्या २०१३ च्या महापूरामधील अनुभव शेअर करत आहे. ग्लोबल वॉर्मिंग, क्लाएमेट चेंज, सतत येणारे कोरडे किंवा ओले दुष्काळ, महापूर, भूकंप, वेस्टर्न डिस्टर्बन्स अशा विविध मुद्द्यांना ह्या लेखनातून स्पर्श करत आहे. निसर्गाने मानवाला वेळोवेळी इशारे दिले आहेत व त्यांची तीव्रता वाढत जाते आहे. ह्याचं हे जीवंत अनुभव कथन.

अन्नदाता सुखी भव: १ - PL 480

लेखक शेखरमोघे यांनी गुरुवार, 27/08/2015 02:18 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतेच "Time" नियतकालिकात मागील ६०-७० वर्षातले "भारत आणि अमेरिकेचे संबंध" फक्त १२ छायाचित्रात मांडलेले पाहिले. एवढा लांबलचक काळ फक्त १२ छायाचित्रात पकडता येणे तसे कठीणच, त्यामुळे त्रुटी असणे अनिवार्य - पण काय काय राहून गेले याचा विचार करताना "P L 480" या एकेकाळच्या "भारत भाग्य विधात्या"ची आठवण नक्कीच झाली. लक्षांत नाही येत ? "पु. लं. च्या ४८० कथा" वगैरे काहीसे वाटते आहे?

तुलनेचा तराजू

लेखक निमिष सोनार यांनी बुधवार, 26/08/2015 11:55 या दिवशी प्रकाशित केले.
सततची आणि अंधपणे केलेली स्वतःची इतरांशी आणि इतरांच्या जीवनाशी केलेली तुलना द्वेषाचे आणि नाशाचे कारण बनते. आपण इतर दोन व्यक्तींमध्ये केलेली तुलना सुद्धा हेवा आणि लोभाला जन्म देते आणि त्या दोघांचीही अधोगती करवते. तुलनेमुळे स्वतःचे दोष आणि इतरांचे गुण आपल्याला दिसत नाहीत. तुलना केल्याने आपण स्वतःचा वेगळेपणा आणि स्वतंत्र अस्तित्व नकळत नाकारत असतो. तुलना ही नेहेमी हक्काची केली जाते पण कर्तव्याची आणि कर्तृत्वाची केली जात नाही. इतरांपेक्षा मी कसा चांगला होईन, इतरांपेक्षा मी स्वतःच्या स्वभावात जास्त बदल कसा घडवेल अशी तुलना दुर्दैवाने होत नाही.

महाभारताचे जीवन सार: (भाग २)

लेखक निमिष सोनार यांनी बुधवार, 26/08/2015 11:46 या दिवशी प्रकाशित केले.
अर्धसत्य आणि सत्याचे प्रकटीकरण: आपणांस माहिती असेल की महाभारतातील युद्धात कौरवांच्या बाजूने लढत असलेल्या द्रोणाचार्यांचे धैर्य खच्चीकरण करण्यासाठी आणि त्यांनी शस्त्र त्यागण्यासाठी त्यांचा मुलगा अश्वत्थामा युद्धात मारला गेला असे त्यांना खोटे सांगण्यासाठी कृष्णाने सत्यवादी युधिष्ठिराला त्यांचेकडे पाठवले. पण युधिष्ठिर मोठा सत्यवादी. त्याचेकडून खोटे बोलणे शक्य नव्हते. मग अश्वत्थामा नावाचा एक हत्ती भीमाने मारला आणि मग युधिष्ठिरानं द्रोणाला सांगितलं, "हो अश्वत्थामा मेला" आणि मग हळूच त्यांना ऎकू येणार नाही असे बोलला," पण तो हत्ती होता" द्रोणांनी शस्त्रं त्यागली.

निसर्गाने दिलेला धोक्याचा इशारा: ९- मदतकार्याचे विविध पैलू व जमिनीवरील वास्तव

लेखक मार्गी यांनी बुधवार, 26/08/2015 08:05 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मान्यवरांना मन:पूर्वक अभिवादन! उत्तराखंडच्या २०१३ च्या महापूरामधील अनुभव शेअर करत आहे. ग्लोबल वॉर्मिंग, क्लाएमेट चेंज, सतत येणारे कोरडे किंवा ओले दुष्काळ, महापूर, भूकंप, वेस्टर्न डिस्टर्बन्स अशा विविध मुद्द्यांना ह्या लेखनातून स्पर्श करत आहे. निसर्गाने मानवाला वेळोवेळी इशारे दिले आहेत व त्यांची तीव्रता वाढत जाते आहे. ह्याचं हे जीवंत अनुभव कथन.

दर 18 वर्षांनी येणारे विवाहित पुरुषांसाठी कोकीळ व्रत

लेखक दमामि यांनी मंगळवार, 25/08/2015 20:16 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या महिलावर्गाची कोकीळा व्रत करण्याची गडबड चालू आहे. यावेळी समस्त विवाहित पुरुष वर्गासाठी कोकीळ व्रत सुचवले जाते. हे व्रत 18 वर्षानी एकदा येते.ज्या वर्षी अधिक आषाढ मास असतो तेव्हाच करायचे असल्यामुळे आयुष्यात जास्तीत जास्त 3 वेळा करण्याची सॆधी मिळते. यावेळेला हे व्रत 29 जूलै ते 29 आॅगस्ट या महिन्यात आहे. हे व्रत विवाहित पुरुष करतात. (कारण त्यांनाच त्याची गरज असते ). हे व्रत केल्याने पुरुषांना दीर्घकाळ सौ माहेरी गेल्याचे भाग्य, म्हणून आपोआपच पौरुषवृद्धी, शेजारसौख्य व इतर प्रपंचात न अनुभवता येणारी सुखे प्राप्त होतात.

निसर्गाने दिलेला धोक्याचा इशारा: ८- महापूरामागच्या कारणांची मालिका

लेखक मार्गी यांनी मंगळवार, 25/08/2015 11:43 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मान्यवरांना मन:पूर्वक अभिवादन! उत्तराखंडच्या २०१३ च्या महापूरामधील अनुभव शेअर करत आहे. ग्लोबल वॉर्मिंग, क्लाएमेट चेंज, सतत येणारे कोरडे किंवा ओले दुष्काळ, महापूर, भूकंप, वेस्टर्न डिस्टर्बन्स अशा विविध मुद्द्यांना ह्या लेखनातून स्पर्श करत आहे. निसर्गाने मानवाला वेळोवेळी इशारे दिले आहेत व त्यांची तीव्रता वाढत जाते आहे. ह्याचं हे जीवंत अनुभव कथन.

बुद्धिभेद

लेखक शंतनु _०३१ यांनी सोमवार, 24/08/2015 18:20 या दिवशी प्रकाशित केले.
बुद्धिभेद पेपर, टीव्ही, या सगळ्या गोष्टी माझ्यासाठी घटत्या उपयोगितेच्या ( हेन्री फियोल ) पलीकडे गेल्या आहेत.
( मी पा अपवाद :) ).
जे काही वाचनात येत त्यावर परस्पर विरोधी मत वाचायला मिळतात. नीरक्षीर विवेक बर्यापैकी जागृत असल्याने काय घ्यायचं न काय सोडायचं हे स्वत:ला ठरवता येतं. पण माध्यमांच्या त्सुनामी मध्ये एकाच बातमी इतक्या वेग वेगळ्या प्रकारे वाचायला / पाहायला /ऐकायला मिळते कि यातला खरा कोण हे शोधणं कठीण होतंय. आपला मुद्दा मांडणे वेगळ नि वाद घालणे वेगळ, हा गोंधळ कुठेतरी आपल्या निर्णय क्षमतेवरच घाला घालतोय.