Skip to main content

विचार

चीनी कम

लेखक आशु जोग यांनी शुक्रवार, 26/06/2015 23:49 या दिवशी प्रकाशित केले.
आजवर भारतीय उपखंडामधे(सार्क) केवळ भारत आणि पाकिस्तान यांच्यातल्या रस्सीखेचीलाच फार महत्त्व मिळे पण भारताने आपल्या पश्चिमेकडून आता थोडे पूर्वेकडे पाहणेही आवश्यक आहे असे प्रतिपादन केले जाऊ लागले. पूर्वीच्या सरकारने त्याचे वर्णन लूक-ईस्ट पॉलिसी असे केले होते. सध्या त्यापुढे एक पाऊल जावून अ‍ॅक्ट-ईस्ट पोलिसीचा बोलबाला आहे. पंतप्रधानांच्या मंगोलिया, बांगलादेश भेटीनंतर याला पुन्हा दुजोरा मिळाला आहे.

कधीतरी काहीतरी

लेखक prasadoak7 यांनी शुक्रवार, 26/06/2015 21:59 या दिवशी प्रकाशित केले.
भाग-3 अंधाराच्या आत जेवण बनवायला हव होत. राकेल मिळवायला किती हेलपाटे मारायला लागत होते. मोठ्या कष्टाने एक कॅन मिळत होता. झोपड्यात येणार्‍या स्त्यावरच्या दिव्याचा प्रकाशत ती रोजच सगळ आवरायची. लेकर आल्यातील म्हणून आज घासलेटचा दिवा पेटवला होता. दिव्याचा प्रकाशात आज बरेच दिवसांनी झोपडीत दिवाळी नाचत होती. हातपाय धुवून त्यान कांबळी अंथरली. पोर धावत बापाला बिलगली. हळूच धाकट्या लेकरान बा ची मांडी पटकावली. बापाची हनुवटी इवल्या हातान हलवीत त्यान विचारल बा त्या रेल्वेचा ड्रायव्हर यवढी मोठी लांब गाडी वळवतो कशी ? थोरली लेक जोरात हसायला लागली . बा न डोळ मोठ करीत तीला गप केल.

शायद कभी ख्वाबोंमे मिले..

लेखक गवि यांनी शुक्रवार, 26/06/2015 11:27 या दिवशी प्रकाशित केले.
अहमद फराझ एक पाकिस्तानी मनुष्य. "पाकिस्तानी कवी", "पाकिस्तानी गायक" असे शिक्के बसलेल्यांपैकी एक खरोखर दिलसे फनकार व्यक्ती. गुलाम अली, फराझ, इक्बाल बानू, मेहंदी हसन यांच्यासारखे लोक जेव्हा कुठेकुठे त्यांच्या जिओग्राफिकल बाउंडरीने उल्लेखले जातात तेव्हा किमान काही गोष्टी तरी हद्दी न मानणार्‍या असाव्यात असा विचार ब्लेड मारल्यासारखा चरचर देऊन जातो. पण ते एक जाऊ दे आत्ता. फराझचे शेर सांगताना त्याची खूप ओळख करुन द्यायची गरज नसते. त्याने खूप मोठ्या संख्येने खूप नजाकतपूर्ण शेरोशायरी केली आहे. सरळसोप्या शब्दरचनेपासून अतिशय गुंतागुंतीचा भाव दाखवणारे शेर, गजल्स त्याने जन्माला घातल्या आहेत.

डोमिसाईल हवंय.... ? ?

लेखक खेडूत यांनी मंगळवार, 23/06/2015 13:15 या दिवशी प्रकाशित केले.
आता म्हणाल हे डोमिसाईलचं काय नवीनच फ्याड? तुम्हाला एक वेळ ''पी.एस.पी.ओ. '' माहीत नसेल तरी क्षम्य आहे . पण डोमिसाईल - महाराष्ट्रातल्या रहिवासाचं प्रमाणपत्र माहीत हवंच. मागची दहा वर्षे तुम्ही महाराष्ट्रात रहात असल्याचा पुरावा. तुम्ही म्हणाल इथंच तर असतो तीस वर्षं झाली - दुसरीकडे कुठं जाणारे? तुम्ही राहिवासी असालही महाराष्ट्राचे - पण तुमच्या पाल्याला प्रमाणपत्र मिळालंय का तसं? अतिप्राचीन काळापासून जन्मभूमी आणि कर्मभूमी वेगळी असण्याचा इथला इतिहास आहे. अनेक महारथी जन्मदात्याच्या घरात न रहाता अन्यत्र जाउनच मोठे झाले. तुम्हीही तसेच महान असाल हे सरकारने गृहीत धरलंय.

मध्य लटपटीत

लेखक ओंकारा यांनी रविवार, 21/06/2015 23:59 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी माणसाच्या मनातील न्यूनगंडाला अस्मितेच्या कोंदणात बसवून राजकारण करणारी संघटना म्हणजे शिवसेना. 19 जून 1966 या दिवशी मुंबईत जन्मलेल्या शिवसेनेनं आता सुवर्णमहोत्सवी वर्षात प्रवेश केलाय. शिवसेनेच्या स्थापनेपासूनच मराठी माणसाचे प्रश्न आणि त्याच्यावरचा अन्याय या भोवती फिरणारी शिवसेना मराठी माणसांच्या मनात तर आहे. पण दुर्दैवानं ती त्या प्रमाणात राजकारणात दिसते का याचा विचार होणं आवश्यक आहे. एक मुद्दा लक्षात घ्यायला हवा तो म्हणजे, शिवसेना जसा प्रादेशिक पक्ष आहे.

तत्त्वभान

लेखक निरन्जनदास यांनी गुरुवार, 18/06/2015 21:12 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो, मी गेल्या वर्षी म्हणजे २०१४ साली ‘लोकसत्ता’मध्ये 'तत्त्वभान' हे सदर लेखन करीत होतो. तत्त्वज्ञान या विषयाची ओळख करून देणारं. मी तत्त्वज्ञानाचा प्राध्यापक आहे. तत्त्वज्ञान हा जरी उच्च दर्जाचा प्रतिष्ठित विषय असला तरी त्याच्या नादी कुणी फारसं लागत नाही. एका विशिष्ट पातळीच्या खाली येऊन त्यावर लेखन करता येत नाही, अशीही भानगड आहेच. पण वृत्तपत्राचा वाचक सर्व स्तरावरचा असतो. सामान्य माणसापासून प्रतिभावंत तत्त्ववेत्त्यापर्यंत एक मोठा पट या वाचकात असतो. त्यामुळे या सर्वाना सुलभ वाटेल, असे तत्त्वज्ञानविषयक लेखन करण्याचा माझा हा प्रयत्न होता. दर गुरुवारी हे सदर प्रसिद्ध होत असे.

७ 'कधीपण-कुठेपण' व्यायामप्रकार

लेखक वेल्लाभट यांनी गुरुवार, 18/06/2015 12:19 या दिवशी प्रकाशित केले.
ब्लॉग पोस्ट इंग्रजीत आहे. तिचा दुवा हा खाली दिलेले ७ व्यायामप्रकार असे आहेत की जे कुठेही केले जाऊ शकतात. या व्यायामप्रकारांत शरिरातील अनेक सांधे, स्नायू कार्यत्यामुळे, त्यामुळे हे कंपाउंड एक्सरसाइजेस या वर्गात मोडतात. जिम लावेपर्यंत, लावायच्या आधी, किंवा लावायचं नसेल तर, हे व्यायामप्रकार तुमच्या दिनचर्येचा भाग होऊ शकतात. आधी महत्वाचे: - नेहमी निगेटिव मूव्हमेंट हळू करावी. ५ आकडे मोजत निगेटिव मूव्हमेंट होणे आदर्श. उदा.

मानसिक होरपळ -रुग्णाच्या नातेवाईकांची...

लेखक सविता००१ यांनी बुधवार, 17/06/2015 14:44 या दिवशी प्रकाशित केले.
गेला महिनाभर मी एका वेगळ्या ताणामध्ये वावरतेय. त्यासाठी ठरवलं की आता इथेच या विषयाला तोड फोडूया आणि पाहू की रुग्णाची जवळची नातेवाईक म्हणून मी माझ्यात अजून काय सुधारणा करायला हव्यात? माझ्या हातून काही चुकतंय का? म्हणून हा प्रपंच. त्याचं झालं असं : माझ्या बाबांना प्रोस्टेट कँसर झाल्याचं कळलं ही अचानकच म्हणजे अगदी आत्ता १ मे २०१५ च्या सुमारास आणि सगळ्या तपासण्यांमधून ऑपरेशन होईतो २ जून उजाडला. या काळात त्यांच्याच आग्रहामुळे मी कुणालाच- म्हणजे नातेवाईकांना हे कळू दिलं नाही. त्यांची चिडचिड नको म्हणून. त्यांच्याच कलाकलाने सगळं घेत होते/घेते आहे.