Skip to main content

विचार

जीवनाची प्रभावी दशसूत्री !

लेखक निमिष सोनार यांनी मंगळवार, 18/08/2015 15:21 या दिवशी प्रकाशित केले.
आपले जीवन हे रोज एकेका दिवसाने आपल्यासमोर येते. थेट मृत्यूपर्यंत!! म्हणूनच आपला प्रत्येक दिवस सारखाच महत्त्वाचा असतो. खाली दिलेल्या दहा गोष्टी रोज करा म्हणजे प्रत्येक दिवस सत्कारणी लागू शकेल. अनेक सकारात्मक विचार, सुविचार आणि पुस्तके वाचून त्यात समान असे काही धागे मी शोधले आणि ते संकलन करून आपल्यापुढे मी मांडतो आहे. त्याने आपल्या सर्वांचा झालाच तर फायदाच होईल, नुकसान काही होणार नाही. त्यामुळे प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे? 1) सकाळी देवाला स्मरून दिवसभराची आखणी करून दिवसाची सकारात्मक सुरूवात करावी. आपल्याला जे काही मिळाले आहे त्याबद्दल देवाचे अाभार मानून त्याबद्दल कृतज्ञता बाळगावी.

निसर्गाने दिलेला धोक्याचा इशारा: २- गोरी गंगेच्या काठावरती...

लेखक मार्गी यांनी मंगळवार, 18/08/2015 14:45 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मान्यवरांना मन:पूर्वक अभिवादन! उत्तराखंडच्या २०१३ च्या महापूरामधील अनुभव शेअर करत आहे. ग्लोबल वॉर्मिंग, क्लाएमेट चेंज, सतत येणारे कोरडे किंवा ओले दुष्काळ, महापूर, भूकंप, वेस्टर्न डिस्टर्बन्स अशा विविध मुद्द्यांना ह्या लेखनातून स्पर्श करत आहे. निसर्गाने मानवाला वेळोवेळी इशारे दिले आहेत व त्यांची तीव्रता वाढत जाते आहे. ह्याचं हे जीवंत अनुभव कथन.

नामाची महिमा न्यारी

लेखक विवेकपटाईत यांनी सोमवार, 17/08/2015 21:21 या दिवशी प्रकाशित केले.
नाम संकीर्तन साधन पैं सोपे जळतील पापें जन्मांतरीची. (संत. तुकोबाराय) शेक्सपिअर म्हणतो नावात काय आहे? अरे पण नाव नसते तर शेक्सपिअरला कोणी ओळखले असते. नावाच मुळे शेक्सपिअरला लोक आज ही ओळखतात. नावाची महीमाच न्यारी आहे. व्यक्तीपेक्षा त्याचे नाव मोठे असते. समुद्रावर सेतू बांधताना, राम नाव लिहिलेले पाषाण समुद्रावर तरंगत होते. पण भगवंतानी आपल्या हाताने समुद्रात टाकलेला दगड समुद्रात बुडाला कारण त्या दगडावर राम नाम लिहिलेले नव्हते.

विवेकानंदांची पत्रे वाचतांना मनात आलेले विचार .

लेखक मारवा यांनी सोमवार, 17/08/2015 12:52 या दिवशी प्रकाशित केले.
मला हिंदु धर्मातील सर्वसंगपरीत्याग संन्यास हि संकल्पना नेहमीच इंटरेस्टींग ( सीरीयसली या अर्थाने इंटरेस्टींग ) वाटत आलेली आहे, एक माणुस एका महान ध्येय्यासाठी वा त्याच्या द्रुष्टीने अधिक श्रेयस्कर अशा अर्थपुर्ण तत्वासाठी वा उच्चत्तम जीवन जगण्यासाठी इतर सर्व मानवी नातेसंबंधांचा त्याग करतो. हे विचारणीय आहे. माणुस खरोखर सर्वसंगपरीत्याग मुळात करु शकतो का ? करण्याने करण्याचा अविर्भाव केल्याने तसे करता येणे शक्य असते का ? मुळात असे त्याला का करावेसे वाटते ? जन्मापासुन ते मृत्युपर्यंत माणुस कुठल्या ना कुठल्या गोष्टीशी व्यक्तीशी संबधात असतोच असतो.

निसर्गाने दिलेला धोक्याचा इशारा: १- पिथौरागढ़

लेखक मार्गी यांनी सोमवार, 17/08/2015 10:43 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मान्यवरांना मन:पूर्वक अभिवादन! उत्तराखंडच्या २०१३ च्या महापुरामधील अनुभव शेअर करत आहे. ग्लोबल वॉर्मिंग, क्लाएमेट चेंज, सतत येणारे कोरडे किंवा ओले दुष्काळ, महापूर, भूकंप, वेस्टर्न डिस्टर्बन्स अशा विविध मुद्द्यांना ह्या लेखनातून स्पर्श करत आहे. निसर्गाने मानवाला वेळोवेळी इशारे दिले आहेत व त्यांची तीव्रता वाढत जाते आहे. ह्याचं हे जीवंत अनुभव कथन. धन्यवाद. निसर्गाने दिलेला धोक्याचा इशारा: १- पिथौरागढ़ १. ढगफुटी तर केदारनाथला झाली, मग पिथौरागढला जाऊन काय करशील? २. आता तर सर्व लोकांना वाचवलं‌ गेलं आहे, रिलिफ काम संपलं आहे, आता तिथे जाऊन काय करशील? ३.

ज्योतिष .......

लेखक झंडुबाम यांनी रविवार, 16/08/2015 17:25 या दिवशी प्रकाशित केले.
ज्योतिष शास्त्र . यामध्ये विज्ञानाचा भाग किती हा खरच एक कुतूहलाचा विषय आहे . कुठलाही माणूस असू देत आस्तिक किंवा नास्तिक पण आपलं भविष्य कसं असलं पाहिजे या बद्दल एक विलक्षण कुतूहल ,जिज्ञासा . त्यानंतर भविष्य समजलं कि मग ते खरं मानायचं कि खोटं ते मात्र आपण ठरवायचं ,म्हणजे कोणी चांगलं सांगितलं तर ते छाती ठोकपणे सगळ्यांना सांगणार , आणि तेच जर काही वाईट समजलं तर मात्र हे सगळं थोतांड ठरवून मोकळं व्हायचं . मुळात जन्मवेळ देण्यात येते ती किती योग्य असते ? नर्स चे घड्याळ चुकीची वेळ दाखवत असेल तर ? लिहिताना चूक झाली तर? एक न अनेक बर्याच शक्यता .

MIDC

लेखक अर्थहीन यांनी बुधवार, 12/08/2015 15:50 या दिवशी प्रकाशित केले.
लंच संपवून डेस्क वर येऊन बसतो. अर्थहीन लंच-चा टॉपिक- त्याहून जास्त अर्थहीन असतो. "शेतकऱ्यांना खरंच कर्जमाफीची गरज असते का?" एकजण शहरातला त्यात ताड़-ताड़ बोलत असतो. सगळ्यांना सपशेल निरुत्तर करुन सोडतो. म्हणतो- ते गरीब तिकडं राना-ऊना-पावसात राबतात, कधी लाईट नसते, तर कधी पाणी. तरी आपलं खायचं अन्न पिकवतात. त्यांना हवी ती मदत सरकारने करायलाच हवी. बायोस्कोपची 'बैल' कथा बघुन रडलो होतो मी. मला त्याचं पटतं. (--ती कथा भक्कम होती.) हा शहरातला असून याला कळवळा किती असं मी मनाला म्हणतो. तर मन म्हणतं -खरंय तुझं. ऐकताना मलापण असंच वाटलं याच्याबद्दल.

सत्य कथा - रुपयाचे कांदे वीस पैश्यात

लेखक विवेकपटाईत यांनी शनिवार, 08/08/2015 20:02 या दिवशी प्रकाशित केले.
सीपी ते उत्तम नगर, ३५ मिनिटांचा मेट्रो प्रवास. माझ्या जवळ बसलेला एक मेट्रो प्रवासी सहज म्हणाला 'प्याज फिर महंगा हो गया है, सरकार को नतीजा भुगतना पड़ेगा.' 'कोण म्हणतो कांदा महाग झाला' एक पांढरे केस वाला वयस्कर ग्रामीण (चौधरी) उतरला. त्यावर तो प्रवासी म्हणाला, चौधरीजी मालूम है, आज प्याज का भाव ५० रुपया किलो है. कांद्यामुळे सरकार पडते, १९९८ मध्ये दिल्लीत काय घडले होते माहित आहे का? चौधरी उतरला, चांगले माहित आहे, त्या वेळी हि कांद्याचा भाव ५० रुपये किलो झाला होता. पण त्याला १७ वर्षे झाली. त्या वेळी बसचे भाडे ३ रुपये होते, आज १५ रुपये आहे. मेट्रोत तर आणखीन जास्त लागतात.

सत्यकथा .. अध्याय - ३

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी शुक्रवार, 07/08/2015 01:31 या दिवशी प्रकाशित केले.
मागिल भागः- सत्यकथा .. अध्याय १ आणि २ सूत म्हणतात, "या शतानंदाने आधी धर्मावर रुसून चिडून एक टप्पा पार केला...हे ही एक प्रकारचे सत्यच होते. पण त्याची दुसरी बाजू न पाहिली गेल्यामुळे ते सत्य लंगडे आणि अनुपयुक्त होते. जेंव्हा शतानंदाला या सत्याचा दुसरा स्वतःमधला भाग दिसला तेंव्हा ते परिपूर्ण झाले..आणि त्याच्या कामीहि आले.

बुधा!

लेखक शब्दबम्बाळ यांनी गुरुवार, 06/08/2015 00:52 या दिवशी प्रकाशित केले.
काही गोष्टी पहिल्यांदा पाहिल्यावर आपल्याला फारशा आवडत नाहीत पण नंतर कधीतरी अचानक आपल्याही नकळत त्या आपल्या मनाचा ताबा घेतात! तसच काहीस माझ बुधाच्या बाबतीत झाल. पहिल्यांदा भेट झाली तेव्हा हा मोतीबिंदू झालेला म्हातारा मुंबई सोडून एकटाच कुठे त्या राजमाचीला निघाला आहे हा प्रश्न पडला. त्याला उतारवयात त्या माचीची, श्रीवर्धन, मनरंजन गडांची ओढ का लागली आहे हे काही समजत नव्हते आणि तेव्हा ते जाणून घेण्यात रसही वाटला नाही. त्यामुळे ती पहिली भेट अगदी थोडक्यात आटपली! पण मनात कुठेतरी बुधाविषयी उत्सुकता राहिली असावी कदाचित!