मी जिथे काम करतो तेथील प्रसंग. इतके दिवस जुनाट कपाटं, कागद, वाळलेल्या पापडासारखी पोस्टर्स, निवांत सरकारी कामं, एका बाईचा तार सप्तकातला इरिटेटिंग स्वर अस एकंदर स्वरूप.
परवा अचानक गडबड झाली, खडबडून जाग आली म्हणा ना...सगळी पोस्टर्स पुसून घ्यायला लावली...कुणाला?? संशोधकांना...आम्हाला देण्यात येणाऱ्या पगारात हे ही समाविष्ट असत वाटत. नवीनच कळलं. १ महिना रखडलेल्या पोस्टरच काम १ तासात उरकलं गेलं अन ते प्रिंट करायला धाडण्यात आलं. जुनी कपाटं नवीन दिसण्याचे दुबळे प्रयत्न करून झाले. कार्पेट नवीन, पायपुसणी नवीन एवढच काय तर चहाचे कपदेखील नवीन. अन तार सप्तकातला स्वर आणखीनच फाटक्या स्पीकर सारखा झाला.
म्हटलं च्यायला झालं काय???
एक बाई येतीय, परदेशातून. फॉरीन बर का. कुलगुरुंपेक्षा महत्वाची लोकं. मग हे खराब आहे, इथे तिला आणायलाच नको, तिथे नको वगैरे planning झालं. मग water cooler आतून साफ केला गेला, please check it does not have mosquito larvae या शब्दात बोलून झालं. (इतके दिवस त्यातलंच पाणी पितोय आम्ही. पण आम्ही फॉरीनचे नाही ना. असली त्या संचालक बाईची अक्कल). सगळं कसं टापटीप. सुंदर. च्यायला ती काय अडाणी आहे का काय?? बांग्लादेशात काम केलय तीने. LMIC (low middle income countries) मध्ये काय अन कस चालत माहित नाही की काय तीला? हे असले आव कशाला आणायचे.? बर ती बाई काय funding वगैरे देणारे का? नाही..ते पण नाही.
एकच कारण. बाई, अन त्यातून गोरी. कार्व्हर ने शोध लावलेच नाहीत. आपल्याकडील गोर्या कातडीचं आकर्षण संपत नाहीच. त्यांचे गुलाम म्हणून जगायचीच लायकी आहे वाटत तुमची. या सगळयाच मूळ कुठे आहे? आम्हाला संशोधन पद्धती शिकवतात न तिथेच. संशोधन म्हणजे फार नवीन अन फार मस्त असा प्रकार. नवीन शोध. अनेक पॉलीसी, आरोग्य सेवा यांच्या दर्जात भर टाकणारे शोध. लोकहिताचे. पण सुरुवात कुठून करायची??
पूर्वी केलाय कुणी असा अभ्यास?? नाही?? मग गोरे काय वेडे आहेत का? त्यांच्या डोक्यात नक्कीच आलं असेल. असा रिसर्च नाही ना झाला पूर्वी? मग होतंच नसेल...methodology मध्ये काहीतरी प्रोब्लेम असणार. तू असं कर, ४-५ सिमिलर रिसर्च शोध. आणि carry out is as it is.
या सगळ्याला नवीन मी प्रश्न विचारतो, पण मग वेगळं काय करतोय आपण?? मग मला वेड्यात काढत उत्तर मिळत, "अरे स्टडी स्ट्रेन्थ मध्ये लिहायचं, हा भारतीय context मध्ये पहिला आहे"...
म्हणजे काय झालं पुन्हा? जा...पाय चाटा गोऱ्यांचे!!
स्स्स्साली वृत्ती नाही बदलली.!!!
वाचने
4483
प्रतिक्रिया
21
मिसळपाव
प्रतिक्रिया
अहो, निदान त्यानिमित्ताने
थोड़ी स्वच्छता तुम्हाला करायला
हाहाहा...नाही हो.
In reply to थोड़ी स्वच्छता तुम्हाला करायला by कैलासवासी सोन्याबापु
हज्जारवेळा सहमत!!!
म्हाद्या भाऊ
तळटीपेबद्दल :
In reply to म्हाद्या भाऊ by नाखु
आमच्याकडे हेच. ओफिस( लॅब
पूर्वी केलाय कुणी असा अभ्यास?
निरुत्साही नाहीत, पण असे आहेत न की...
In reply to पूर्वी केलाय कुणी असा अभ्यास? by काळा पहाड
चाटूगिरी ! युगानुयुगे चालत
आपल्याकडे गोरेपणा आणि सौंदर्य
ते जरा
In reply to आपल्याकडे गोरेपणा आणि सौंदर्य by पद्मावति
कोण यमी ? असा प्रतिसाद नाही
In reply to ते जरा by इरसाल
थोडी दुरुस्ती.
खरं आहे
In reply to थोडी दुरुस्ती. by पद्मावति
होय
In reply to थोडी दुरुस्ती. by पद्मावति
परदेसी आणि गोर्या बाईंचे
हे असच आणखी बर्याच प्रसंगात
मिपा बेष्ट
कार्व्हर ने शोध लावलेच नाहीत.
धन्यवाद!
In reply to कार्व्हर ने शोध लावलेच नाहीत. by द-बाहुबली