आपट किबोर्ड, उठू दे अक्षरे, दाब बटणे, दीपव डोळे, कीटव कान, जाळ ती बॅन्डवीड्थ अश्या अतीप्रगत आंतरजालाच्या ऋतूमधे प्रतिभेच्या अगणीत छत्र्या (पावसाळ्यात नाही का ते एका प्रकारचे मश्रूम) न उघडतील तर नवलच. कोणी काहीही लिहले तरी ते कूठल्या न कूठल्या एका तरी साहीत्यप्रकारात फीट होतेच नाही का. साहीत्यसेवेच्या या महायज्ञातील भडकलेल्या अग्नीचे चटके बसून जसे गणपती मिरवणूकीतल्या ढोलाच्या ठेक्यावर जसा आपोआप पाय हलायला लागतो त्याप्रमाणे आमची बोटे टंकीतायला लागली.
पहीला डाव देवाला ह्या नियमाने आम्ही ठरवले की स्वतंत्र लेखाच्या किंवा लोकप्रिय लेखकांच्या पूजेच्या नादी न लागता आपल्या आंतरजालावरील आवडत्या, असामान्य प्रबोधनात्मक असे काहीसे करणारे अस्सल लेखकांना मानवंदना देवू या. (बिगबजेट लेखकांना आपल्या लेखात परवडत नाही म्हणून साइड्चे लेखक घेऊन काढताय का लेख, अशीही टीपणी ऐकू येतेय) असो जास्त वाट बघायला न लावता माझ्या आवडत्या लेखकाचे नाव.....
टिकाकार - हे कधी कधी टीकाकार-१ ह्या नावाने देखील लेखन करतात. त्यात त्यांच्या प्रतिभेला एक नवी "धार" येते. जीची तुलना झनझणीत तर्रीशीच होऊशकते. हे तसे मितभाषी असून पण खूप काही प्रकट करू शकत असल्याचा प्रत्यय त्यांच्या लेखनातून येतो. त्यांच्या लेखनातून त्यांच्या जीवनविषयक तत्वज्ञानाचे उत्तम दर्शन होते. मराठी जन तसे भिडस्त पण "संकेत स्थळ " ह्या आपल्या लेखातून नवीन लहान बाळाला सर्वांदेखत विचीत्र नावाचे म्हणून मराठीजन तोंडदेखले गोड बोलणे सोडा, मी कसे कोणाला न कचरता बोलू शकतो (तुम्हीपण करू शकता अशी) आपल्या विद्रोही साहीत्याची झलक मराठी जनतेला दिली. ह्याच संप्रदायातील जूने लेखक श्री. विनायक यांच्या सारखे दुसर्याच्या कठीण "प्रसव" वेदनांचे स्वतःच्या राजकारणाकरता वापर न करता, लिडींग फ्रॉम फ्रंट असा आर्दश घालून दिला असे मला वाटते.
भारतात व्यक्तिपुजा कधी सम्पणार? हा त्यांच्या काळजाला घोर लागलेला प्रश्र त्यांनी त्यांच्या लेखनातून देखील पूढे आणला. जेव्हा इतरजन भाइकाका, त्यांचे साहीत्य, त्यांची शैली ह्या पूजाअर्चेत अडकले असताना "पु. ल. आणि Atheism" ह्या विद्रोह लेखनमालेच्या अजुन एका साहीत्यरत्नाद्वारे महाराष्ट्रातील पूजा /भक्तीभावाच्या वाढलेल्य प्रस्थावर अत्यंत मार्मीक खडा टाकला. कन्फुयज्ड महाराष्ट्रातील रसीकांना एकदमच बिम्यूज्ड करून टाकले. अजून एक पार्टटाइम लेखक श्री. पोष्टमन ह्यांच्या साहीत्यसमीक्षण पाट्या टाक (संत तात्याबामहाराज वचनामृत - भाग १ ) लेखनचौर्यापेक्षा मला "पु. ल. आणि Atheism" मधील ओरिजीन्यालीटी भावली.
नूस्तीच साहीत्य सेवा नाही केली तर बंड केले. खोटी आणीबाणी , स्वातंत्रावर गदा आणून संपादकीय हूकूमशाहीला जी टक्कर दिली तिने तर आख्खा महाराष्ट्र चक्रावून निघाला.
गद्य, पद्य, लाज ह्या कशाचेच वावडे नसलेल्या व एकला चलो रे हे महातत्व बाळगणार्या मनस्वी तपस्वीकडे वर उल्लेख केलेल्या महायज्ञात घालायला बर्याच काड्या म्हणजे समीधा असतील ह्यात शंकाच नको.
वाचने
15594
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
;)
मित्रा, चां
का?
In reply to मित्रा, चां by टीकाकार-१
"पु. ल. आणि Atheism" मधील ओरिजीन्यालीटी भावली
सुंदर !
प्रा. डॉ.
सही !
In reply to प्रा. डॉ. by टीकाकार-१
बरं बरं
आस्सं आहे तर !
In reply to बरं बरं by टीकाकार-१
टूकाराम-टूकाराम
In reply to आस्सं आहे तर ! by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
राजे
In reply to टूकाराम-टूकाराम by राज जैन (verified= न पडताळणी केलेला)
सहजराव, छान लिहिलं आहेस रे! :)
गद्य पद्य आणि लाज
मस्तच!!
सहमत आहे
In reply to मस्तच!! by कोलबेर
तुमच्या
In reply to सहमत आहे by आजानुकर्ण
हा हा हा
In reply to तुमच्या by टिकाकार
हो रे बाबा,
In reply to हा हा हा by कोलबेर
वा सही!
वा वा!!