काही महिन्यांपूर्वी महिलांना ३३% आरक्षण देणार्या विधेयकाला संमती मिळाली. ह्या आरक्षणाचे भविष्यात होणारे भयानक परिणाम ओळखून लालू प्रसाद यादवांसारख्या काही द्रष्ट्या नेत्यांनी ह्याला विरोध केला, पण मध्यंतरी बराच काळ ते नुसतेच बोलविते धनी असल्याने त्यांचा आवाज लोकांपर्यंत पोहोचला नाही. ह्या आरक्षणाचा आणि महिला मुक्ती चळवळीचा फार जवळचा संबंध आहे. महिला सक्षमीकरणाची चळवळ साधारण ७० च्या दशकात सुरू झाली. पण त्या आधीही आपल्याला अनेक ठिकाणी लाक्षणिकरित्या सक्षम आणि भक्कम महिला दिसतंच होत्या. असो.
आजचा मुद्दा हा नव्हे. महिला मुक्ती चळवळी इतकाच, किंबहुना त्याहूनही जुना इतिहास पुरूषमुक्ती चळवळीला आहे.