Skip to main content

शुभेच्छा

डोक्यात तिडीक आणणारे मिपाकर - भाग ३

लेखक अवलिया यांनी शुक्रवार, 11/02/2011 18:49 या दिवशी प्रकाशित केले.
मागील भाग - http://misalpav.com/node/16707 *** अ‍ॅटमबॉम्ब, खिमा पॅटिस नि चाय यात साम्य काय आहे आणि यावर काहीतरी लिहा असे जर सांगितले तर आपल्यापैकी किती जणांचे डोके चालेल हे मला माहित नाही. किमान मी तरी असे काही लिहू शकणार नाही हे नक्की. लिहिल्यानंतर लोकांना ते आवडेलच याची खात्री नाही. पण काही जण मात्र आरामात अशा वरवर एकमेकांशी संबंध नसलेल्या शब्दांच्या शीर्षकाचा लेख लिहितात आणि तो वाचला की आपल्याला वाटते "अरे हो यार ! आपण पण असे लिहू शकलो असतो !!

डोक्यात तिडिक आणणारे मिपाकर - भाग २

लेखक अवलिया यांनी गुरुवार, 10/02/2011 18:23 या दिवशी प्रकाशित केले.
माझं जन्मगांव सोडलं.. तर माझा संबंध फक्त मुंबईशीच आला.. इतर ठिकाणीही असेच होत असेल असा माझा कयास आहे.. तर, बरेचसे मुंबईतले दाक्षिणात्य- जे स्थलांतरीत होऊन इकडे आले, इकडे जन्मले वाढलेले नव्हेत- त्यांना मराठी/हिंदी कळत असूनही कळत नाही असा आव आणतात आणि फक्त इंग्रजी मध्ये बोलल्यासच उत्तर देतात... याला मुंबईत जन्मल्या-वाढलेल्या लोकांचा अपवाद आहे.. अगदी चांगले मराठी बोलणारे खूपसे दाक्षिणात्य परिचयाचे आहेत.... असंच एकदा सगळेजण गप्पा मारत होतो.. गाडी बोलता बोलता.. नेहेमीप्रमाणे.. माझ्या उत्तरभारतीय असण्यावर आली.. एव्हाना याची चांगलीच सवय झाली होती.. मी म्हटलं.. हे तर नेहेमीचे झालं..

साने गुरुजी समग्र पुस्तक संच.

लेखक कलंत्री यांनी शुक्रवार, 21/01/2011 23:26 या दिवशी प्रकाशित केले.
१९५० च्या सुमारास घडलेली ही खरी घटना आहे. साने गुरुजीच्या पुस्तकांनी महाराष्ट्राची तरुण पीढी भारावलेली होती. त्यातच एका १८/१९ वयाच्या युवकाचा समावेश होता. दुर्दवाने त्या युवकाला असाध्य अश्या आजाराने गाठलेले होते. मरण्यापूर्वी साने गुरुजींना भेटावे असे त्याला वाटत होते. त्याच्या पालकांनी साने गुरुजींना तसे कळविळे आणि भेटता येईल का असे विचारले. पत्राची वाट पाहत असतांना प्रत्यक्ष साने गुरुजीच त्यांना भेटायला त्याच्या गावी आले.

मकर संक्रांतीच्या शुभेच्छा.

लेखक ५० फक्त यांनी शुक्रवार, 14/01/2011 22:19 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मिपाकरांना २०११ मकर संक्रांतिच्या हार्दिक शुभेच्छा. या निमित्त्त आमच्याकडे आमच्या सॉ. नि आज बाजरीच्या भाकरी व भाजी असा बेत केला होता. आपल्या तोंडाला पाणी सुटण्यासाठी / जळजळ होण्यासाठी खाली काही फोटो देत आहे. पहिला फोटो बाजरीची भाकरी व लोणि आणि या फोटोत त्याबरोबर भाजी पण आहे, असो संक्रांतीचं स्पेशल स्लोगन काय तर - तिळगुळ घ्या गोड गोड बोला, आणि त्याची पण सोय केलेली आहे.

उ. न. क. - नवा अध्याय

लेखक आदिजोशी यांनी बुधवार, 12/01/2011 14:22 या दिवशी प्रकाशित केले.
काही महिन्यांपूर्वी महिलांना ३३% आरक्षण देणार्‍या विधेयकाला संमती मिळाली. ह्या आरक्षणाचे भविष्यात होणारे भयानक परिणाम ओळखून लालू प्रसाद यादवांसारख्या काही द्रष्ट्या नेत्यांनी ह्याला विरोध केला, पण मध्यंतरी बराच काळ ते नुसतेच बोलविते धनी असल्याने त्यांचा आवाज लोकांपर्यंत पोहोचला नाही. ह्या आरक्षणाचा आणि महिला मुक्ती चळवळीचा फार जवळचा संबंध आहे. महिला सक्षमीकरणाची चळवळ साधारण ७० च्या दशकात सुरू झाली. पण त्या आधीही आपल्याला अनेक ठिकाणी लाक्षणिकरित्या सक्षम आणि भक्कम महिला दिसतंच होत्या. असो. आजचा मुद्दा हा नव्हे. महिला मुक्ती चळवळी इतकाच, किंबहुना त्याहूनही जुना इतिहास पुरूषमुक्ती चळवळीला आहे.

हैप्पी ३१ स्ट

लेखक विनायक बेलापुरे यांनी शुक्रवार, 31/12/2010 15:04 या दिवशी प्रकाशित केले.
दारु की खुश्बू गुटके की मिठास गांजे की महेक और चरस का स्वाद भांग के पकोडे और विल्स का प्यार मुबारक हो आपको बेवडों का त्योहार हैप्पी ३१ स्ट (एका समस वरुन साभार)

२०१०: एक उत्तम वर्ष

लेखक ऋषिकेश यांनी शुक्रवार, 31/12/2010 09:14 या दिवशी प्रकाशित केले.
२०१० ला बाय बाय करायची वेळ आली आहे. अश्यावेळी वाटेवर थांबून जरा मागे सरलेल्या २०१०कडे बघताना काय वाटतं? मला तरी हे सरतं वर्ष भारताच्या दृष्टीकोनातून एक उत्तम वर्ष वाटतं. एक धावता आढावा: क्रिडा: क्रिडा क्षेत्राकडे बघता हे वर्ष भारतासाठी अप्रतिम गेलं यात वादच नाही. राष्ट्रकुल खेळांच्या (शेवटच्या क्षणापर्यंत श्वास रोखायला लाऊन नंतर) केलेल्या दैदिप्यमान प्रदर्शनाबरोबरच त्यात भारतीय खेळाडूंनी केलेली पदकांची लयलूट, मिळवलेलं दुसरं स्थान सारंच स्वप्नवत होतं. आशियायी खेळातही आतापर्यंत सर्वाधिक मिळालेली पदके क्रिडाक्षेत्रातील भारताच्या वाढत्या परिघाची ग्वाही देत होती.

अभिनंदन !!!

लेखक पर्नल नेने मराठे यांनी शनिवार, 25/12/2010 15:15 या दिवशी प्रकाशित केले.
आताच हाती आलेल्या व्रुतानुसार आपले सगळ्यांचे लाडके मित्र श्री. कुन्द्या ह्यांस पुत्ररत्न प्राप्त झाले आहे. तरी त्यांचे मिपा परिवारातर्फे हार्दिक अभिनंदन !!!

स्वामी समर्थ आणि दत्तभक्ती

लेखक शुचि यांनी रविवार, 19/12/2010 22:17 या दिवशी प्रकाशित केले.
२० डिसेंबर २०१० ही दत्तात्रेय जयंती. या दिवसाचे निमित्त साधून, पुढील गोष्ट ही माझ्याकडे असलेल्या पुस्तकांतून जशीच्या तशी उतरवली आहे. पुस्तकाचे नाव आहे - "चरित्र चिंतन -प प श्रीमदवासुदेवानंदसरस्वती (टेंबे) स्वामी महाराज". या पुस्तकाचे लेखक आहेत - डॉ वासुदेव व्यंकटेश देशमुख. संपादकांना योग्य वाटल्यास हा धागा ठेवावा अथवा उडवावा. श्री दत्त व प्रभू रामचंद्र हे दोन्ही भगवान विष्णूंचे अवतार होते. एक कृत युगातले तर दुसरे त्रेता युगातले. प्रभू रामचंद्र हे स्वामी समर्थांचे उपास्य दैवत.