डोक्यात तिडिक आणणारे मिपाकर - भाग २
माझं जन्मगांव सोडलं.. तर माझा संबंध फक्त मुंबईशीच आला.. इतर ठिकाणीही असेच होत असेल असा माझा कयास आहे.. तर, बरेचसे मुंबईतले दाक्षिणात्य- जे स्थलांतरीत होऊन इकडे आले, इकडे जन्मले वाढलेले नव्हेत- त्यांना मराठी/हिंदी कळत असूनही कळत नाही असा आव आणतात आणि फक्त इंग्रजी मध्ये बोलल्यासच उत्तर देतात... याला मुंबईत जन्मल्या-वाढलेल्या लोकांचा अपवाद आहे.. अगदी चांगले मराठी बोलणारे खूपसे दाक्षिणात्य परिचयाचे आहेत.... असंच एकदा सगळेजण गप्पा मारत होतो.. गाडी बोलता बोलता.. नेहेमीप्रमाणे.. माझ्या उत्तरभारतीय असण्यावर आली.. एव्हाना याची चांगलीच सवय झाली होती.. मी म्हटलं.. हे तर नेहेमीचे झालं.. आता माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या.. माझ्या पाहण्यातले बरीचशी गुजराती,उत्तर प्रदेशातील कुटुंबे आहेत की ज्यातल्या अगदी छोट्यापासून मोठ्यापर्यंत सगळ्याना चांगली मराठी नि हिंदी बोलता येते.. जर मराठी बोलता येत नसेल.. तर त्यांना कळते तरी नक्कीच.. माझ्या उत्तरभारतीय मैत्रिणीची मुलगी मराठी पाळणाघरात जाते.. तिच्याशी हिंदी बोलले तरी ती उत्तर मात्र शुद्ध मराठीत देते.. काका-मामा-मावश्या-आत्या-आई-बाबा याना मराठी येतंच... दोन्ही आजी-आजोबाच काय.. पणजोबाही मोडकं तोड़कं का होईना.. तिच्याशी मराठीत बोलतात.. मग हे दाक्षिणात्यच असे का वागतात..?? ज्या ठिकाणी १०-२० वर्षं राहतात.. तिथली भाषा कळत नाही असे का म्हणतात..?? त्यावरचं उत्तर खरंच चपखल आहे.. ते दिलं एका तमिळनाडूमध्ये लहानाचे मोठे झालेल्या एका गुज्जुभाईने.. तर त्यांच्या मते.. "तमिळ माणूस हा स्वतःच्या कोशात राहणारा प्राणी आहे.. त्याच्या मनात काय चालू असेल... कुणीच सांगू नाही शकत.. घरातल्या घरात भावा-भावा मध्ये कोश असतात.. पण जेव्हा प्रसंग दुसर्या कुटुंबासोबत येतो.. तेव्हा तो कोश थोडाफार स्वतःच्या कुटंबापुरता विस्तृत होतो.. त्याप्रमाणे जेव्हा आपला प्रदेश सोडून ते बाहेर जातात.. तेव्हा तो कोश आपल्या भाषेपुरताच ठेवतात.. असं म्हणतात की एका ठिकाणी एका मद्राशाला नोकरी द्या.. तो लगेच आपल्या मागे इतरांची रांग लावेल.. तेही या कोश जीवनपद्धतीमुळेच... दुसरी भाषा समजते असं म्हटलं तर त्या कोशात बाहेरचे लोकही येतील असं त्याना वाटतं नि त्यांना ते कोणत्याही परिस्थितीत नको असतं... आता थोडं परिवर्तन येतं आहे.. पण जुनी खोडं बदलणं खरंच अवघड आहे...." आश्चर्य म्हणजे सगळ्याना हे उत्तर पटलंही.. नि बर्याच जणांनी असंही म्हटलं की हे खरं आहे.. पण असं नेमकं शब्दबद्द करणं त्यांना स्वतःलाही जमले नसतं... खरंय!!! आपल्या इथेही दोन पिढितला हा फरक मी खुपदा अनुभवलाय... . . . . . पटतंय ना वरचे लेखन. पटणारच.. मद्रासच्या सफरीचा मस्त वृत्तांत http://misalpav.com/node/7993 इथे अधिक वाचायला मिळेल. तिथेच या लेखमालेच्या आधीच्या भागांची लिंक मिळेल. ***
"ठीक आहे.. राजे नक्की.."---------------चला सुरूवात तर चांगली झाली----------- काऊंट = १ पुढे? "तात्या..?" "हो.. पण ते भांडी घासायला तयार होतील?? स्वयंपाक करायचं एकवेळ मनावर घेतील पण भांडी....??? जिथे पंचपक्वान्ने जेवलो तिथे खरकटे उचलणार नाही असं म्हणून सगळ्या कोर्सवाल्यांना अनवाणीच बाहेर काढतील.... नि जाऊन स्वतःचा 'खाद्य व लग्न संस्कृती' नावाचा प्रोग्राम काढतील. आपल्याकडे काळं कुत्रं फिरकायचं नाही मग... आपल्याला काँपिटीशन नाय पायजे...!!" "खरंच की... तात्या कटाप!!!" "मग अवलियाला खोपच्यात घेऊया"??? "अरे तो माणूस काळा की गोरा हे माहित नाही... .. अजून त्याला कुणी पाहिलं नाही.. तो बाई की बाप्या इथून प्रश्न आहे.. सोड रे त्याला तू" "ठीक आहे.. अवलिया पण कट!!!" ------------------------------- काउंट तसाच. . . खुसखुशीत संवाद आणि मस्त कथाबीज. काय म्हणालात वाचायचे आहे? वाचा तर मॅरेज लाईफ http://misalpav.com/node/8893 http://misalpav.com/node/8906 http://misalpav.com/node/8917 *** मंडळी वरती जे दोन परिच्छेद दिले आहेत ते सदर लेखिकेची क्षमता दाखवुन देण्यास पुरेसे असले तरी ती केवळ एवढेच लिहु शकते असे नाही. तिचे अधिक लेखन http://misalpav.com/newtracker/3586 इथे वाचता येईल. बरोबर आहे मंडळी, ही लेखिका आहे मस्त कलन्दर.. :) रिकामा वेळ अजिबात वाया न घालवणारी, मस्त खुसखुशीत संवादांची फोडणी देत छान छान लेख लिहीणारी, मनातले विचार ठामपणे पण संयत शब्दात मांडणारी एक अतिशय गुणी आणि प्रगल्भ विचारांची मस्त कलन्दर मितभाषी असली तरी मिपावर अनेकांशी विविध विषयांवर चर्चा करत असते. मात्र मस्त कलन्दर आमची या आठवड्याची "डोक्यात तिडीक आणणारा मिपाकर" आहे. कारण सरळ आहे तिच्या कडे असलेल्या मोगर्यांच्या कळ्या सुकल्या आहेत. त्यामुळे हल्ली ती लेख लिहित नाही. हरकत नाही. आम्ही तिला मोगर्यांच्या कळ्या भेट देत आहोत. त्याच बरोबर पुष्पगुच्छ आणि पैठणी देत आहोत. त्याचा तिने स्विकार करावा आणि लवकरात लवकर एखादा मस्त लेख लिहावा की तो वाचून रसिक जन उद्गारतील " वा ! मोगरा फुलला !" बाकी ती ठरवेल ते मान्य. कसे? पुष्पगुच्छ
पैठणी
मोगर्यांच्या कळ्या
दुकानांचे पत्ते
पुष्पगुच्छ - http://www.sendflowerindia.com/Images/bouquet_07.jpg
पैठणी - http://agjbusiness.com/images/paithani.jpg
मोगर्यांच्या कळ्या - http://farm2.static.flickr.com/1426/1170785933_17e9c4bf75.jpg
क्रमशः
(पुढील मिपाकर पूढल्या आठवड्यात - ज्यांना सत्कार नको असेल त्यांनी खरड व्यनीतुन सुचना देणे म्हणजे यादीतुन नाव कटाप करता येईल. यादी लै मोठी आहे)प्रतिक्रिया
रिकामा वेळ अजिबात वाया न घालवणारी, मस्त खुसखुशीत संवादांची फोडणी देत छान छान लेख लिहीणारी, मनातले विचार ठामपणे पण संयत शब्दात मांडणारी एक अतिशय गुणी आणि प्रगल्भ विचारांची मस्त कलन्दर मितभाषी असली तरी मिपावर अनेकांशी विविध विषयांवर चर्चा करत असते.हे कुणी सांगितलं? काही घोर गैरसमज दडलेत या वाक्यात. मितभाषी? मकी? प्रगल्भ विचारांची हे शब्द वाचताना विचारजंत हा शब्द आठवला... ;)
In reply to नाना by श्रावण मोडक
पण संयत शब्दात मांडणारी एक अतिशय गुणी आणि प्रगल्भ विचारांची मस्त कलन्दर मितभाषी असली तरी मिपावर अनेकांशी विविध विषयांवर चर्चा करत असते.वरचे शब्द वाचुन अंमळ डोळ्यासमोर अंधारी आली आणि मकीचे वादविवादपटुत्व कानात गुंजरव करायला लागले. बाकी काही काळापूर्वी आम्ही मकीला मितभाषी म्हणावेच लागेल अशा व्यक्तीमत्वाला सहन केल्याचे आठवले आणि शुद्ध परत आली.
रिकामा वेळ अजिबात वाया न घालवणारी, मस्त खुसखुशीत संवादांची फोडणी देत छान छान लेख लिहीणारी, मनातले विचार ठामपणे पण संयत शब्दात मांडणारी एक अतिशय गुणी आणि प्रगल्भ विचारांची मस्त कलन्दर मितभाषी असली तरी मिपावर अनेकांशी विविध विषयांवर चर्चा करत असते.अरे व्वा.. मी अशी आहे हे मला आज पहिल्यांदाच कळलं रे. बाकी, मी मितभाषी की कशी हे भेटल्यावरच कळेल. :-) आणि दुष्ट माणसा, वरती पैठणी म्हणून दिली आहेस ते सिल्क साडीवर केलेलं कांथावर्क आहे. तशी साडी माझ्याकडे आधीपासून आहे. पैठणी ही अशी दिसते बघ नीट डोळे फाडून उघडून..
बाकी, तुझा आग्रह लक्षात घेऊन लिहीन रे काहीतरी लवकरच... :-)In reply to नान्स धन्स रे.... by मस्त कलंदर
अरे व्वा.. मी अशी आहे हे मला आज पहिल्यांदाच कळलं रे. बाकी, मी मितभाषी की कशी हे भेटल्यावरच कळेल.हा हा हा .. मकाकुंशी सहमत आहे .. हा णाण्या उगाचंच अमुल बटरचं पाकिट घासतोय ... मस्कामारु साला :) तु छाण लिहीतेस गं मकु .. घे आता एक खमंग लेख लिहायला ... :) - (सदा पडिक असणारे मिपाकर) टारझन
In reply to अरे व्वा.. मी अशी आहे हे मला by टारझन
In reply to नान्स धन्स रे.... by मस्त कलंदर
In reply to तेच म्हटले ..उश्त्या हाताने by पर्नल नेने मराठे
In reply to नान्स धन्स रे.... by मस्त कलंदर
बाकी, तुझा आग्रह लक्षात घेऊन लिहीन रे काहीतरी लवकरच.चला आश्वासन तरी मिळाल... नान्स् प्रगती होतेय रे. ;) लिहिता रहा.
In reply to नान्स धन्स रे.... by मस्त कलंदर
In reply to नान्स धन्स रे.... by मस्त कलंदर
In reply to तुला साडी हा प्रकार आवडत by रेवती
In reply to सॉलीड... by मस्त कलंदर
साडीवरती लिहायचं तर तो एक अखंड आणि मस्त विषय आहे... वेळ काढून लिहीन.. बस एकदा मूड यायला हवा तो..अक्षर थोडं बरं काढणार असशील तर ती साडी मला प्रेझेंट म्हणून चालेल. सध्या मी माझा फॅशन कोशंट वाढवण्याचा प्रचंड प्रयत्न करत आहे.
In reply to प्रेझेंट आणि फॅशन कोशंट by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to कॉन्टॅक्ट मोडक by मस्त कलंदर
In reply to अवांतर अमर रहे by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to कृपया ह्या धाग्यावर हा वधु-वर by परिकथेतील राजकुमार
In reply to अवांतर अमर रहे by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to काय ते by श्रावण मोडक
In reply to जुन्या मालकांपासूनच रूढ आहे by ३_१४ विक्षिप्त अदिती
In reply to मकीला समस लिहिलाय =)) आता by पर्नल नेने मराठे
मकीला समस लिहिलायया चुचुचे जितके फेसबुक प्रोफाईल्स तितके मोबाईल नंबर दिसताहेत. @परा: असो!!!! ;-)
In reply to आणि दुष्ट माणसा, वरती पैठणी by विजुभाऊ
In reply to आणि दुष्ट माणसा, वरती पैठणी by विजुभाऊ
जरतारी पदर पहाण्यापेक्षा पेक्षाही तो पदर ज्या खांद्यावर रुलतो त्या खांद्यांच्य मालकिणीला पहात असतोतीच तर पैटनीची खासियत आहे.
In reply to मकीला थोडी सूट! by पैसा
In reply to वा! वा!! वा!!! खर्या पंख्या by रेवती
In reply to हाहा! by पैसा
In reply to याला म्हणतात पाशवी by रेवती
In reply to नाना, याचा भाग-१ आहे का २ by शाहरुख
माझं नाव कट कर रे ! नसेल तर