मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

शुभेच्छा

महिला क्रिकेट, आशिया कप, T-20

मुक्त विहारि ·
आजपासून, महिला क्रिकेट, आशिया कप, T-20, बांगलादेश येथे सुरू होत आहे भाग घेणारे संघ खालील प्रमाणे भारत श्रीलंका पाकिस्तान थायलंड बांगलादेश मलेशिया युएई हाॅटस्टार वर, ह्या खेळाचा आनंद घेऊ शकता.

महिला क्रिकेट ....भारत 3, इंग्लंड 0.... ये नया भारत है...

मुक्त विहारि ·
नुकतीच, इंग्लंड विरूद्ध भारत ही तीन सामन्यांची एक दिवसीय क्रिकेट मालिका संपली. हळूहळू का होईना पण, महिला क्रिकेट बाबतीत, लोकं रस घेत आहेत, हे जाणवले. पहिल्या आणि दुसर्या मॅच मध्ये, हरमन प्रीत कौरने, अप्रतिम खेळ केला, विशेषतः दुसर्या मॅच मध्ये... 2017 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध केलेल्या 169 रन्स नंतर, ही 111 चेंडूत 139 रन्सची खेळी, खरोखरच दृष्ट लागण्या सारखी.

पुणे मिपाकट्टा सप्टेंबर २०२२ वृत्तांत: मिपाकट्टा संपन्न झाला

पाषाणभेद ·
आज दिनांक : १७ सप्टेंबर, शनिवार रोजी सकाळी १० ते दु. २ च्या दरम्यान ठिकाण पाताळेश्वर लेणी, जंगली महाराज मंदिराशेजारी, जंगली महाराज रोड, शिवाजी नगर, पुणे - 411005 येथे अत्यंत उत्साहात साजरा झाला. एकूण सतरा (१७) मिपाकर, मिपा मालकांसहीत उपस्थित होते. त्यांची नावे खालील प्रमाणे आहेत.

नमस्कार, मी भाऊ तोरसेकर… तुम्ही बघत आहात || प्रतिपक्ष ||

टर्मीनेटर ·
काल सकाळी युट्युबचे एक नोटीफिकेशन आले त्यात ज्येष्ठ पत्रकार आणि राजकिय विश्लेषक श्री.

हॅप्पी बर्थडे माही….

सुजित जाधव ·
जुन्या हिंदी चित्रपटात एक सिन असायचा बघा..एक गुंडांची टोळी हिरॉईनच अपहरण करते.. एका सूनसान जागी तिला बांधून ठेवल जातं.. आणि तिचा छळ केला जायचा...तिच्या अंगाला त्या टोळीच्या म्होरक्याचा हात लागतो न लागतो तोच आपला हिरो अचानक एन्ट्री मारायचा...आधी तो थोडा मार खायचा पण मग पुढे त्याचा पवित्रा अचानक बदलायचा आणि तो गुंडांना बदडून काढायचा...क्रिकेटच्या मैदानावर पण असाच एक हिरो होता. जेव्हा जेव्हा भारतीय संघ अडचणीत सापडायचा तेव्हा तेव्हा तो अगदी शांतपणे मैदानात एन्ट्री करायचा आणि आपल्या स्टाईल मध्ये सामना जिंकवूनच परतायचा..

प्रिय सचिन

जे.पी.मॉर्गन ·
प्रिय सचिन, पुन्हा तो दिवस - पुन्हा तीच भावना. आता तर त्या भावनेला शब्दांचीही गरज वाटत नाही. तू निवृत्त होऊन ९ वर्षं झाली. आम्हीही थोडे (वयानी) मोठे झालो, वयानुरूप थोडीबहुत परिपक्वता, व्यावहारिकता आली. जे दिसतंय त्यापलिकडे बघायची नजर आली. तू खेळत असताना असलेली आमची क्रिकेट बघण्यातली बेहोषी आता कमी झाली. परिस्थिती बदलली, जग बदललं तसं क्रिकेटही अर्थातच बदललं. आम्ही अजूनही क्रिकेटवेडे आहोतच. आताही शुभमन गिलच्या शैलीवर, पंतच्या बेफिकीरीवर, डेवॉल्ड ब्रेविसच्या चौफेर फटक्यांच्या रेंजवर, शाहीन आफ्रिदीच्या वेगावर फिदा आहोतच. स्मृती मनधाना, हरमनप्रीत कौर, शेफाली वर्मासारख्या मुलींबद्दलही कौतुक आहेच.

आज, 24 मार्च 2022, आपल्या सर्वांना, "गाॅडफादर डे" च्या शुभेच्छा...

मुक्त विहारि ·
50 वर्षांपुर्वी, आजच्याच दिवशी, द गाॅडफादर, हा अविस्मरणीय सिनेमा प्रदर्शित झाला ... काही काही चित्रपट, एखादी लाट तयार करतात. द गाॅडफादर, हा पण असाच. चित्रपट परिक्षण, हा माझा प्रांत नाही. कारण, चित्र, नाटक, सिनेमा, अभिजात संगीत हे व्यक्तीसापेक्ष असते. माफिया, हा शब्द माहिती पडला तो, ही कादंबरी वाचतांना आणि संघटित गुन्हेगारीचे, भारतातील स्वरूप देखील समजत गेले... बाबू रेशीम, मन्या सुर्वे, इत्यादी समकालीन गुन्हेगारांपेक्षा, दाऊद इब्राहीमच साम्राज्य का उभारू शकला? ह्याची थोडीफार कल्पना, ही कादंबरी वाचतांना येतेच येते.

मराठी भाषा दिन

कर्नलतपस्वी ·
कणा मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेउन, तुम्ही फक्‍त लढ म्हणा ! – कुसुमाग्रज मिसळपाव परिवारात सामील झाल्यावर सुरुवातीला काही कवीता, मनोगते,मुक्तके राजभाषा हिन्दी मध्ये लिहिल्या, प्रतीसाद संमिश्र आले, गदारोळ माजला, टपल्या, टोमणे,काही शालजोडीतले, काही पुणेरी वर वर स्तुतीपर पण सरळ कसोट्यालाच हात घालणारे. माय मराठीत जन्मलो पण कमी वयातच दूर जावे लागले म्हणून सहवास कमी लाभला. राजभाषेचा सहवास भरपूर. दोघींवर तितकेच प्रेम. आता परत माय मराठीच्या कुशीत आल्या मुळे मराठी भाषेतील अमूल्य रत्ने दृष्टीक्षेपात आली.

दोन पैश्याचं ऊन !

चौथा कोनाडा ·
सीन १: मुंबईतला पावसाळी दिवस, धो धो पाऊस कोसळतोय. तो पावसात चिंब भिजून आंतर्बाह्य निथळतोय ! समोर काही सेकंद थांबलेल्या टॅक्सीचे दार उघडून तो आत घुसतो. टॅक्सीत एक तरुणी आधीच बसलीय. ती त्याला उतरायला सांगतेय. धो धो पावसामुळे तो टॅक्सीतच थांबायचे आहे. तिला वाटतेय हा आपला "ग्राहक" म्हणून बसू इच्छितो ! "मी रस्त्यात एके ठिकाणी थांबणार आहे, अर्धा तास लागेल." पुढच्या दृष्यात ती एका फ्लॅटची बेल दाबते, फ्लॅटवाला दरवाजा उघडतो. ती थेट त्याच्या बेडवर जाऊन बसते. "कॉण्डोम लाया ना? " सॅण्डल काढता-काढता तिचा प्रश्न. "मी काय पैसे देत नसतो का?" तो. त्यानं कॉण्डोम आणलेला नाहीय हे ती ओळखते.

सर्व मिपाकरांना, संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा...

मुक्त विहारि ·
नमस्कार, कसे आहात? सर्व मिपाकरांना, संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा... हिंदू सणांचे, हे एक वैशिष्ट्य आहे की, वर्षभर कितीही भांडलो, वादविवाद झाले, प्रसंगी एकमेकांना टोमणे मारून झाले तरी, दसरा, होळी आणि संक्रांतीच्या दिवशी, एकमेकांना शुभेच्छा देतोच आणि सहज शक्य झाले तर, गाठीभेटी पण घेतोच. मिपामुळे, आपण सगळेच एकत्र आहोत.वाद तर होतच राहणार, त्याला पर्याय नाही. मत भिन्नता असणे, हे नैसर्गिक आहे, पण ते मत, सुयोग्य भाषेत, सार्वजनिक रित्या मांडण्याची मुभा देणे, ही लोकशाही आहे. अशा, खरोखरी लोकशाही तत्वावर, एकमेकांना साथ देत चालणार्या, सर्व मिपाकरांना, संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा...