Skip to main content

संदर्भ

बुध-शुक्र युती दिनांक २६/०२/२००८

लेखक धोंडोपंत यांनी रविवार, 24/02/2008 15:00 या दिवशी प्रकाशित केले.
लोकहो ! दिनांक २६ फेब्रुवारी रोजी बुध आणि शुक्राची युती मकर राशीत होते आहे. दिनांक २६ फेब्रुवारी रोजी पहाटे साडेपाच वाजता बुध आणि शुक्र हे मकरेत १६ अंशांवर असतील. कोणत्याही दोन किंवा अधिक ग्रहांच्या युतियोगाला फलज्योतिषात फारच महत्व आहे. जेव्हा दोन ग्रह एकमेकांच्या युतीत असतात तेव्हा ते एकमेकांचे कारकत्व वाढवित असतात किंवा त्याचा नाश करतात. बुध शुक्र युतीबद्दल बोलायचे झाले तर हे दोन ग्रह "अंतर्वर्ती" ग्रह आहेत. म्हणजे सूर्य आणि पृथ्वी यांच्या मध्ये हे दोन ग्रह आहेत. त्यांच्या नंतर सूर्यमालेत पृथ्वी आहे आणि पृथ्वीच्या पुढे मंगळ गुरू शनी वगैरे ग्रह आहेत.

जडणघडण

लेखक सरपंच यांनी गुरुवार, 07/02/2008 12:19 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, मिसळपाव वर अधिकाधिक सोयी उपलब्ध करण्याचा प्रयत्न चाललेला आहे. अनेकांच्या ते लक्षात आले असेलही. तरीही येथे नव्या सोयी बद्दल माहिती दिली जाईल. तसेच काही अडचणी असल्यास त्या सुद्धा येथे मांडल्यास हरकत नाही. सदस्य व्यवस्थापनासाठी सदस्यं संरचनेत थोडा बदल केलेला आहे. त्यामुळे तुमच्या काही सोई ज्या तुम्ही आधी वापरत होतात आणि आता त्या दिसत नाहीत असा काहिसा प्रकार असेल तर येथे तसे नमुद करावे. सोई पुर्ववत करण्यात येतील.

जगभरातील व्यक्तिमत्वे ओळखा

लेखक देवदत्त यांनी गुरुवार, 10/01/2008 00:06 या दिवशी प्रकाशित केले.
WorldPersonalities वरील चित्रात जगभरातील व्यक्तींची चित्रे रेखाटली आहेत. किती ओळखता येतात ते पाहू? मी ओळखलेले: महात्मा गांधी चार्ली चॅपलीन बीथोवन हिटलर सद्दाम हुसैन बिल क्लिंटन ब्रुसली अल्बर्ट आईन्स्टाईन अब्राहम लिंकन यासर अराफात मेरीलीन मॉन्ऱो जॉर्ज बुश आणखी जमल्यास लिहीन पुढे... (चित्र आंतरजालावर कुठेतरी मिळाले.)

आयसीसी चे नवे नियम :

लेखक छोटा डॉन यांनी बुधवार, 09/01/2008 17:32 या दिवशी प्रकाशित केले.
आधीच जाहीर करतो की "आलेल्या फॉरवर्डेड मेलमधून साभार" परवाच्या सिडनी टेस्ट नंतर आयसीसी ला सूचवलेले काही नवे नियम : १. यानंतर पुढे कुठल्याही ऑस्ट्रेलियाचया मॅचसाठी रिकी पाँटिंग [ क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात महान, हाडाचा व ज्याच्या प्रामाणिकपणावर कोणिही शंका घेऊ शकत नाही, असा क्रिकेटचा सितारा ] याला कायदेशिररित्या चौथा पंच म्हणून मान्यता देण्यात यावी. या नव्या कायद्याप्रमाणे चौथ्या अंपायरचा निर्णय अंतिम असेल. आधीच्या निर्णयामध्ये सुध्धा बदल करण्याचा त्याला अधिकार राहिल.

बालचित्रवाणी, संस्कार, गोट्या आणि असेच काही

लेखक ॐकार यांनी मंगळवार, 18/12/2007 10:14 या दिवशी प्रकाशित केले.
मुलामुलांचीऽऽऽ मजेमजेचीऽऽऽ बालचित्रवाणी फुले पाखरे आनंदाने , आनंदाऽऽनेऽऽ फुले पाखरे आनंदाने गाती गंमत गाऽणीऽ बालचित्रवाणीऽऽ , बालचित्रवाणी तात्यांचा लेख वाचून मी ही जुन्या काळात रमलो आणि आठवण आली ती बालचित्रवाणीची. त्यातल्या गाण्यांची, छोट्या छोट्या कार्यक्रमांची. अगदी पाण्याचे उपयोग, फळे-भाज्या यांतील जीवनस्त्त्वे यांची उजळणी करणारे छोटे छोटे प्रसंग ते दात स्वच्छ ठेवण्याबाबत दाखवली जाणारी "शीऽऽऽ, दात किती किडलेत हिचे' ही ओळ आठवून देणारी छोट्या मुलीची आणि सोबत तिच्या बाहुलीची प्रतिमा; अशी असंख्य क्षणचित्रं डोळ्यासमोर तरळली. त्याचसोबत 'किलबिल किलबिल पक्षी बोलती....

अतिदीर्घ बोधकथा (संपूर्ण काल्पनिक)

लेखक आजानुकर्ण यांनी गुरुवार, 15/11/2007 09:54 या दिवशी प्रकाशित केले.
ही कथा खरे तर नेहमीच्या स्टँडर्डप्रमाणे लघुकथा आहे. मात्र काही आधुनिक कथांशी तुलना करता तिला कादंबरी किंवा अतिदीर्घ कथा म्हणणे योग्य ठरेल. शिवाय नारदमुनी वगळता सर्व कथापात्रे (म्हणजे उरलेले एक) काल्पनिक. नेहमीप्रमाणे पगाराचा करमुक्त भाग असणारा लीव्ह ट्रॅव्हल अलाउंस क्लेम करण्यासाठी रजा घेऊन नारदमुनी पृथ्वीवर आले (अन्यथा त्या पैशावर त्यांना कर भरावा लागला असता.) मंडळी करांविषयी नंतर कधीतरी. मिसळपाववरच! पृथ्वीवर त्यांना एक गोंडस डुक्कर दिसले. काय त्याचे सौंदर्य वर्णावे महाराजा.

एजीओजी

लेखक ॐकार यांनी गुरुवार, 08/11/2007 10:04 या दिवशी प्रकाशित केले.
दीपावलीचे निमित्त साधून मिसळपावच्या सर्व सदस्यांना कळवण्यास अत्यंत आनंद होत आहे की आपापल्या बोलीभाषेत वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारण्याकरता ( चॅटींग - चॅटरूम्स) , जालावर अनुदिनी लिहिण्याकरता (ब्लॉग्स) त्याचप्रमाणे भारतातील विविध माहितीस्रोतांचा भारतीय भाषांत संचय करण्याकरता, बहुभाषिक सोई असलेले नवे संकेतस्थळ एजीओजी सुरू झाले आहे. सध्या या संकेतस्थळाची जडणघडण चालू आहे. येत्या पंधरवड्यात विकीपिडीया नुसार सार्वजनिक व्यासपीठावर नव्या सोई उपलब्ध करून देण्याचा विचार आहे.