Skip to main content

संदर्भ

गांधीवाद्याची थप्पड

लेखक भास्कर केन्डे यांनी शुक्रवार, 05/12/2008 01:00 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या महाविद्यालयात अभियांत्रिकीव्यतिरिक्त अनेक सामजिक कर्यावर सुद्धा उहापोह होत असे. वृक्षारोपण, रक्तदान शिबिरे अशा उपक्रमांना सुद्धा खेळाच्या स्पर्धांप्रमाणेच भरगोस प्रतिसाद मिळे. शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद, गांधीजी, डॉ सर्वपल्ली राधकृष्णन यांच्या जयंत्या आम्ही वादविवादासारख्या स्पर्धा भरवून साजर्‍या करत असू. या सगळ्या कार्यक्रमांमध्ये एक वैशिष्ट्यपूर्ण वल्ली होता जीवन जोशी, आमचा एक वर्गमित्र. गांधींविषयीची त्याची भक्ती सुपरिचित होती. कट्टयांवरच्या गप्पा असोत की चर्चासत्रे, तो मोठ्या चिकाटीने आणि विश्वासाने गांधीवादी विचारांचे मुद्दे मांडत असे.

पाकिस्तानी सैन्य भारतीय सीमेवर.

लेखक बबलु यांनी रविवार, 30/11/2008 13:19 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ताच आलेली म.टा. च्या संस्थळावरील मुख्यपृष्ठावरील बातमी... अफगाणिस्तानच्या सीमेवर असलेले एक लाख सैन्य हलवून ते भारताच्या सीमाभागाजवळ तैनात करणे आवश्यक असल्याचे पाकिस्तानने नाटो आणि अमेरिकन लष्कराला कळवले आहे. http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3775546.cms

मिपाचे वैभव..!

लेखक विसोबा खेचर यांनी गुरुवार, 27/11/2008 10:53 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मिपाकरहो.. नुकताच मिपाकर सुनील यांनी 'मिपाचे बंद पडणे..' अशी तक्रार केली होती. त्या तक्रारीस तिथे आम्ही उत्तर दिले आहेच परंतु आमच्या उत्तराला सपोर्टिंग म्हणून आम्ही खाली काही चित्रे प्रकाशित करत आहोत.. या वरून मिपाची वाढती लोकप्रियता सहज लक्षात यावी.. आणि म्हणूनच आजूबाजूच्या संकेतथळावरील काही मिपाद्वेष्टी मंडळी मिपाच्या सर्व्हरवर अतिरिक्त कृत्रीम ताण आणून मिपा वारंवार बंद पाडत आहेत हे उघड आहे... असो, या बाबतीत शक्य ते सर्व प्रयत्न सुरू आहेत.

कनकालेश्वर - ऐतिहासिक मानबिंदू

लेखक भास्कर केन्डे यांनी मंगळवार, 18/11/2008 09:12 या दिवशी प्रकाशित केले.
औरंग्याने महाराष्ट्रातल्या वास्तव्यात हजारो मंदिरे उध्वस्त केली. त्यातली बरीच मशिदींमध्ये बदलवली गेली, काही नामशेष झाली, काही आजही डगडुगीच्या/जिर्नोद्धाराच्या प्रतिक्षेत आहेत तर थोडी पुन्हा नव्याने उभारी घेऊन उभी राहिली.

जुवळ- भाग २( अंतिम)

लेखक कपिल काळे यांनी सोमवार, 17/11/2008 21:27 या दिवशी प्रकाशित केले.
जाउया की नको वरती, काय असेल......? >> पहिला भाग इथे वाचा चलबिचल होउन शेवटी वरती जाउन काय ते बघायचं ठरवलं. पहिली छोटीशी चढाई करुन वर गेलो. समोर बघतो तर काय, एक विलक्षण दॄश्य दिसत होतं. आम्ही देहभान हरपून बघतच उभे राहिलो. शेजारी कोणी उभं आहे ह्याची सुद्धा जाणिव झाली नाही. नजरबंदी झाल्यागत होउन गेलं. त्या छोट्याश्या सपाटीवर दोन तीन बांबूची बेटं होती. दोन तीन वीत भर उंच गवत माजलं होतं.

जुवळ- भाग-१

लेखक कपिल काळे यांनी सोमवार, 17/11/2008 21:24 या दिवशी प्रकाशित केले.
मी नववीत होतो तेव्हा पावसाळ्यात ट्रेक करायचा ठरवला. तेव्हा काही बाही पुस्तकं वगैरे वाचून, नॅट-जिओवर काही फिल्म्स बघून ट्रेकबद्दल एकदम आकर्षण निर्माण झालेलं.आम्ही सगळे मित्र तसे पावसात क्रिकेट खेळता येत नाही म्हणून डोंगरउतारावरुन घसरगुंडी खेळायचो. पावसाळ्यात उतार निसरडा झाला की खाली सरकत यायचं. त्यामुळे दर पावसाळ्यात घसरुन उतरुन पहिली चड्डी फाटली की तो खेळ बंद. पण त्या वर्षी गावातल्या व्हाळातून* चालत ट्रेक करण्याचा घाट घातला. ते भाद्रपदातले दिवस होते. शाळेला गणपतीची सुट्टी नुकतीच लागली होती. ह्या दिवसात कोकणात पाउस जरा खळावतो* आणि थोडी ताप* पडते. त्यामुळे जनावरं* बिळातून बाहेर येतात.

इयत्ता ३री ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्याना गणित विषयासाठी उपयुक्त वेब लिंक

लेखक शनआत्तार यांनी शुक्रवार, 14/11/2008 19:32 या दिवशी प्रकाशित केले.
इयत्ता ३री ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्याना गणित विषयासाठी उपयुक्त अशा ६० वेब लिंक प्रकरणानुसार या लेखात दील्या आहेत You mentioned yesterday your high workload having taken up 3 Std 10tth classes of 0ver 160 students. You had asked for help with relevant website content. There are over 60 links below from my research on math related content on the internet. This could give you MUCH MORE than you really need, but I think you should have it.

अनुष्टुभ छंद - विस्तारीत अष्टाक्षर बांधणी

लेखक बेसनलाडू यांनी मंगळवार, 11/11/2008 08:26 या दिवशी प्रकाशित केले.
धोंडोपंतांच्या छंदशास्त्रावरील स्तुत्य उपक्रमात माझ्या वतीने ही छोटीशी समिधा समस्त मिसळपावकरी आणि कविवर्य धोंडोपंत यांना सादर अर्पण. देवद्वार, पादाकुलक, अनुष्टुभ, गायत्री, जगती, बृहत असे अनेक छंद आज परिचयाचे आहेत. अनेक श्लोक, स्तोत्रे, वेदांमधील ऋचा, काव्ये, सर्वपरिचित सुभाषिते इ. छंदबद्ध असतातच; फक्त ती गाताना आपल्याला ती अमुक एका छंदात आहेत, याची जाणीव तेव्हढी होत नाही. मात्र छंदशास्त्राच्या माध्यमातून जेव्हा आपण छंदांची लक्षणे अभ्यासू लागतो नि परिचित उदाहरणे वाचून ती या लक्षणांशी किती जवळीक साधतात, हे पाहू लागतो, तेव्हा हे विविध छंद अधिक जवळचे वाटू लागतात.
Taxonomy upgrade extras

तुलना ( अष्टाक्षरी)

लेखक कपिल काळे यांनी मंगळवार, 11/11/2008 03:59 या दिवशी प्रकाशित केले.
कवी म्हणू नका मला अशी करु नका घाई रास प्रासांची ओतिली धोंडोपंती सर नाही चार ओळी जुळवल्या कवी होईन का त्याने मूळ प्रेरणा ही दिली त्या हो अस्सल पंताने इंदराचा त्या हो भार जाणे एक एरावत वेद रेड्याने बोलावा नाही त्याची ती ऎपत वसंताच्या मोसमात काक: काक: पिक :पिक: नीर क्षीर विवेकेषु हंस: हंस: बक: बक: जाणे गुणी हो गुणाला निरगुण हा का जाणे जाणे बली महाबली निरबल ते का जाणे शेवटची तीन कडवी “जाने गुनी गुन को”, ह्या अडाणा रागातील ध्रुपदाचा भावानुवाद आहेत.
Taxonomy upgrade extras