Skip to main content

संदर्भ

भाषाशुद्धी, जडजंबाल लेखन, मराठी भाषेचे मूळ

लेखक आजानुकर्ण यांनी बुधवार, 28/05/2008 22:18 या दिवशी प्रकाशित केले.
भाषाशुद्धीकरण आणि जडजंबाल लेखन : मंगेश विट्ठल राजाध्यक्ष यांचे निवडक उतारे. मराठीतली भाषाशुद्धीकरणाची चळवळ या शतकाच्या चौथ्या दशकात सुरू झाली. काही काळ तिने आवाज केला. पुढे तो थंडावत गेला. दरम्यान या चळवळीला पुरस्कर्ते आणि अनुयायी लाभले ते संख्येने मर्यादितच होते. उच्च जात, आणि उच्च नसले तरी त्याच्या जवळपासचे शिक्षण, या दोन प्रमुख मर्यादा. सर्वसाधारण लोकात तिचे हसे झाले. शुद्धीकृत भाषेची विडंबने झाली. तिला अनुयायांपेक्षा पुरस्कर्तेच अधिक लाभले :) म्हणजे अशा शुद्धीकरणाचा तात्त्विक पुरस्कार करणारे. 'तशा' भाषेत आपले लेखन करणारे फार थोडे होते.

बासूदांचे 'अनुभव'

लेखक भोचक यांनी सोमवार, 28/04/2008 19:35 या दिवशी प्रकाशित केले.
बासू भट्टाचार्य एक बिनधास्त व्यक्तिमत्व होऊन गेलं. मानवी नातेसंबंध विशेषतः स्त्री-पुरूष संबंध हा त्यांचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय. त्यावरच अनुभव, अविष्कार आणि गृहप्रवेश ही चित्रत्रयी त्यांनी दिली. काही वर्षांपूर्वी आलेला आस्था हा चित्रपटही त्याच साखळीतला होता, असे म्हणायला हरकत नाही. नुकतंच बासूदांचं 'अनुभव' हे आत्मकथनपर पुस्तक वाचलं. 'सकाळ'मध्ये काही वर्षांपूर्वी हे आत्मकथन सदरातून प्रसिद्ध होत होतं. पण एकत्रितरित्या पुस्तकातून वाचताना त्याचा आनंद काही औरच. फिल्मी मंडळींच्या आत्मचरित्रातून अनेक गोष्टी समजतात. याच वर्तुळात रहाणारी मंडळी कशी कचकड्याची असतात, हेही त्यातून दिसून येत असते.

शेअर बाजारात फेरफटका.

लेखक विसोबा खेचर यांनी बुधवार, 02/04/2008 10:33 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, नाना चेंगट, शरूबाबा यांच्याप्रमाणे आज जरा आम्हालाही शेअर बाजारात फेरफटका मारायचा मूड आला म्हणून हे चार शब्द! तांत्रिक विश्लेषण - कालचा बंद १५६००. वरची पातळी साधारण १८२०० च्या आसपास आणि खाली साधारण पहिली पातळी १५३०० (कालच्या बंदच्या जवळ) व दुसरी १४७०० च्या आसपास निर्देशांक फिरतो आहे असे दिसते. ही रेंज गेल्या महिन्या सव्वा महिन्यांच्या कालावधीतील आहे. म्हणजे साधारण ३२०० ची उलथापालथ!

सुचना : गप्पाड्डा (आचार विचारांचे झटपट अदानप्रदान....)

लेखक मधु मलुष्टे यांनी मंगळवार, 01/04/2008 09:23 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, सतत काहीतरी नवीन देण्याच्या मिसळपावच्या उद्दीष्टाला धरुन आम्ही आपल्या लाडक्या संकेतस्थळावर "गप्पाड्डा" (गप्पांसाठी जागा/चॅट रुम) सुरु करायचे योजले आहे. अजून ही सोय पूर्णपणे कार्यांन्वित नसल्याने तुर्तास काही सद्स्यांना थोडी अडचण येण्याची शक्यता आहे. तमाम मिसळपाव ग्रामस्थांनी त्याचा आनंद घ्यावा ही विनंती.

उत्तर शोधायचे आहे!

लेखक ॐकार यांनी सोमवार, 31/03/2008 01:31 या दिवशी प्रकाशित केले.
ओशो रजनिश यांच्या संत कबीरांवरील प्रवचनांचे भाषांतर वाचण्याचा योग आला. त्यात ओशोंनी पुढील दाखला दिला आहे - एकदा चार बायका एक प्रसिद्ध सूफी संताकडे ज्ञानप्राप्तीकराता जातात आणि त्याने गुरू बनावे अशी विनवणी करतात. त्यांना त्याच्याकडून ज्ञान म्हणजे काय हे समजून घ्याअय्चे असते. परंतु सूफी संत मात्र तयार होत नाही. त्या बायका तश्याच दाराशी भुकेल्या तहानलेल्या बसून राहतात. अखेर त्याला त्यांची दया येते. तो त्यांची परीक्षा घेण्याचे ठरवतो. परीक्षेत उत्तीर्ण होणार्‍या स्त्रीला शिष्या करून घेण्यास तो तयार होतो.