Skip to main content

समीक्षा

आणि एक वर्तुळ पुर्ण झाले.

लेखक मृत्युन्जय यांनी सोमवार, 09/04/2012 17:10 या दिवशी प्रकाशित केले.
रूपे जराया भयम। अर्थात रुपाला वार्धक्याचे भय असते आणि देवाने तारुण्यात दिलेले रुप आणि सौष्ठव नाहिसे होते म्हणुन मनुष्यालादेखील वार्धक्याचे भय असते. अँटी एजिंग क्रीम्स च्या जमान्यात आज आपल्याला ते असते तर पुराणकालातील ययातीला ते असल्यास आश्चर्य वाटायला नको. त्यात वर तो गेलेला विषयसुखाच्या आहारी. स्त्रीसुखात रममाण झालेला, स्त्रियांच्या बाहुपाशात राजधर्म विसरलेला, देवयानीसारखी करारी स्त्री पत्नी असुनही राजधर्माची उपेक्षा करणारा.

फुल्ल गोंधळ 'हाउसफुल्ल - २' - (Review -House full -2)

लेखक रसप यांनी शनिवार, 07/04/2012 17:41 या दिवशी प्रकाशित केले.
कितीही मोठे झालो तरी कधी कधी मोठ्ठ्या आकाशपाळण्यात बसल्यावर मजा येतेच ना? तस्संच, कितीही कळत असलं तरी कधी कधी काही सिनेमे लॉजिक-फिजीक.. डोकं-बिकं.. समज-बिमज.. बाजूला ठेवून पाहिले ना की सॉल्लिड मज्जा येते बुवा.. "हाउसफुल्ल -२" त्यातलाच एक..! आजकाल विनोदी सिनेमा म्हटलं की प्रचंड गुंतागुंतीचं कथानक हे एक समीकरणच झालं आहे. इथेही तोच प्रकार आहे. चिंटू कपूर (ऋषी कपूर) आणि डब्बू कपूर (रणधीर कपूर) हे सावत्र भाऊ. चिंटू 'रिअल सन' आणि डब्बू 'नाजायाझ!' पण त्यांच्या वडिलांनी त्यांची ब्रिटनमधील कंपनी व इतर मिळकत दोघांच्याही नावावर समसमान केली असते. ह्यामुळे 'रिअल सन' चिंटू चा डब्बूवर फार राग असतो.

असीर

लेखक मृत्युन्जय यांनी शुक्रवार, 06/04/2012 14:18 या दिवशी प्रकाशित केले.
असीर करके हमें क्यों रिहा किया सैयाद, वो हमसफीर भी छूटे, वो बाग भी न मिला। -'जलाल' लखनवी एकटेपणाचे दु:ख अफाट असते आणि ते ओझे खांद्यावर घेउन आयुष्यभर वणवण भटकण्याची शिक्षा मृत्युपेक्षाही भयानक. लखनवी च्या शायरीमधला पक्षी म्हणुनच पारध्याला (सैयाद) म्हणतो आहे " बाबा रे कधी काळी मला कैद (असीर) केले होतेस ते होतेस पण आता असे एकट्याला सोडुन का देतो आहेस? जिथुन कैद केले होतेस ती बाग तर आता कोसो दूर आहे आणि ज्यांच्यासाठी जगायचे ते कोणी आसपास उरलेले नाही.

ब्लड मनी

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी गुरुवार, 05/04/2012 14:10 या दिवशी प्रकाशित केले.
लिखाणाला सुरुवात करण्याआधी मला दोन अपराधांची क्षमा मागायची आहे. ते कन्फेशन का काय म्हणतात ना ते. १) मी ब्लडमनी हा चित्रपट पैसे खर्च करून थेटरात जाऊन बघितला. २) आणि वर मी आता त्याचे परीक्षण देखील लिहीत आहे. ब्लड मनी हा महेश भट्ट साहेबांचा चित्रपट, अर्थात तो कुठूनतरी ढापलेल्या प्लॉटवरून तयार केलेला असणार हे उघड होतेच. त्यातून त्याला अभिनयसम्राट कुणाल खेमू आणि जगप्रसिद्ध अभिनेत्री अम्रिता पुरी असल्याचे कळले आणि आम्ही ब्लड मनी विषयी वाचायचे देखील बंद केले.

वारणम आयीराम

लेखक अँग्री बर्ड यांनी बुधवार, 04/04/2012 02:13 या दिवशी प्रकाशित केले.
first
तेलगु पिक्चर बघायची हौस दांडगी आहे, शक्यतो जो येईल तो बघितला असे मी करत नाही, कारण त्यातून काहीतरी चांगले निघेल ह्याची वाट बघत धीरोदत्तपणे चित्रपट पाहण्याएवढे patience माझ्याकडे मुळीच नाहीत.

द अंडरटेकर!

लेखक चैतन्य गौरान्गप्रभु यांनी सोमवार, 26/03/2012 04:09 या दिवशी प्रकाशित केले.
बास! शिर्षक वाचल्यावरच अनेकांचा थरकाप उडेल. अनेकांना आश्चर्य वाटेल. अनेकांना उत्साह वाटेल. आणि अनेकांना विचित्रही वाटेल. मात्र 'कोण हा अंडरटेकर?' असा प्रश्न कुणालाच पडणार नाही. रेसलींग या नावानं प्रसिद्ध असलेली कुस्ती तुम्हाला आवडत असेल अथवा नसेल, आणि डब्ल्य़ुडब्ल्य़ुएफ (किंवा आता डब्ल्य़ुडब्ल्य़ुई) अनेक वर्षांपासुन पाहिले असेल अथवा नसेल; परंतु 'अंडरटेकर' हे नाव आणि हे व्यक्तीमत्त्व याबद्दल काहिच कल्पना नाही; असा माणुस सापडणे विरळाच! आपण ज्या क्षेत्रात काम करतो, त्या क्षेत्रालाच आपल्या नावानं ओळखलं जाण्याचं सौभाग्य एखाद्याच सचिन तेंडुलकरला मिळतं आणि एखाद्याच अंडरटेकरला! मार्क विल्यम कॉलॉवे.

नर्मदे हर!

लेखक पैसा यांनी रविवार, 18/03/2012 13:25 या दिवशी प्रकाशित केले.
नर्मदे हर! काही दिवसांपूर्वी एक मिपाकर आत्मशून्य नर्मदा परिक्रमेच्या उद्देशाने बाहेर पडला. पण काही कारणाने त्याची परिक्रमा पुरी नाही झाली. त्या निमित्ताने सध्या मध्य प्रदेशात रहाणार्‍या यशवंत कुलकर्णीने एका मिपाकराची नर्मदा परिक्रमा ही सुंदर लेखमालिका लिहिली होती. ती वाचताना या नर्मदा परिक्रमेबद्दल कुतुहल जागं झालं. की हे काय प्रकरण आहे? अशी कोणती प्रेरणा आहे, की जिच्यामुळे लोक हजारों मैलांचं अंतर पायी चालून जायला तयार होतात? तसं खूप वर्षांपूर्वी गोनीदांचं 'कुण्या एकाची भ्रमणगाथा' वाचलं होतं. पण मध्यंतरीच्या वर्षात ते कुठेतरी मागे राहून गेलं होतं.

"क्रांती" - कर ले घडी दो घडी!

लेखक फारएन्ड यांनी सोमवार, 05/03/2012 23:23 या दिवशी प्रकाशित केले.
दिलीप कुमारचे एवढे जबरदस्त काम क्रांतीमधे झालेले आहे की केवळ त्याच्याबद्दलच्या आदराने बाकी सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करावे (सुरूवातीलाच एक संवाद म्हणताना तो स्वतःच्या मुलाला कडेवर घेताना किंचित हसतो, हे इम्प्रोव्हायझेशन नक्कीच त्याचे असणार. असे अनेक सीन्स आहेत), पण हळुहळू इतर जण त्याला वरचढ होतात :). लक्ष्मीकांत प्यारेलाल ची काही श्रवणीय गाणी आहेत ("लुई शमाशा उई" जर स्वतंत्रपणे ऐकले तर "vintage LP" आहे - मस्त ठेका आणि त्याहून जबरी लताचा आवाज), काही गाण्यांतील जमून गेलेली देशभक्तीपर वाक्ये, अशा काही genuine moments चित्रपटात नक्की आहेत. त्यात तेव्हाचा हा अतिप्रचंड हिट चित्रपट.

सध्या वाचत असलेले पुस्तक - बाईकवरचं बिह्राड

लेखक चिम् चिम् मामा यांनी मंगळवार, 28/02/2012 13:36 या दिवशी प्रकाशित केले.
"बाईकवरचं बिह्राड" मी सध्या वाचत असलेले पुस्तक... काही तरी वेगळे वाचावे म्हणुन मागच्या आठवड्यात क्रोसवर्ड मध्ये पुस्तके पहायला गेलो होतो... आणि एक पुस्तक नजरेस पडले... सह़ज चाळले.... आणि माझ्या सारख्या बाईक वेड्याला हे पुस्तक वाचायचा मोह झाला. डॉ.अजित हरिसिंघानी यांनी one life to ride लिहिलेले आणि सुजाता देशमुख यांनी अनुवादित केलेले हे पुस्तक. पुणे ते लेह प्रवास डॉ.अजित हरिसिंघानींनी बुलेट वर केला... त्याचेच हे प्रवास वर्णन. मी सुद्धा असे काही प्रवास...(पुणे- मुंबई, पुणे-कोल्हापुर, ....