Skip to main content

समीक्षा

सायको-रहस्यपटांचा मुकुटमणी

लेखक प्रचेतस यांनी गुरुवार, 10/11/2011 14:47 या दिवशी प्रकाशित केले.
आल्फ्रेड हिचकॉकचा बहुचर्चित सायको पूर्वीपण खूप वेळा बघितला होता, नुकतीच त्याची डीव्हीडी पण हाती लागल्याने परत एकदा पाहण्याचा आनंद घेता आला. प्रियकर सॅम लुईसशी(जॉन गेविन) लग्न करण्यासाठी पैशाची आत्यंतिक जरूरी असलेली मरियन क्रेन (जेनेट लाय) तिच्या ऑफिसमधून चाळीस हजार डॉलर्सचा अपहार करून स्वतःच्या कारने पसार होते, वाटेत एका पोलीस डिटेक्टीव्ह द्वारे पाठलाग होत असल्याचे लक्षात आल्यावर जुनी कार विकून ती दुसरी कार विकत घेते. अंधार्‍या रात्री तूफान पावसात कार चालवण्याऐवजी ती एका आडबाजूला असलेल्या बेट्स मॉटेलमध्ये उतरायचे ठरव

!! मोरया !!

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी बुधवार, 09/11/2011 12:07 या दिवशी प्रकाशित केले.
बहुचर्चित (?) असा मोरया चित्रपट परवा पाहण्यात आला. झेंडा ह्या सो कॉल्ड वादग्रस्त चित्रपटानंतर अवधूत गुप्ते ह्यांचा हा पुढला चित्रपट. बर्‍यापैकी कथा, तरुणाईचा फ्रेश लुक आणि दमदार अभिनय ह्यामुळे एकूणच झेंडा आवडून गेला होता. काही काही पंचेस आणि संवाद दाद देण्याजोगे होते, तर काही प्रसंग वाखाणण्याजोगे. एकुणात काय तर झेंडामुळे 'मोरया' बद्दलच्या अपेक्षा थोड्या का होईना उंचावलेल्या होत्या.

Acacia

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी शनिवार, 05/11/2011 12:52 या दिवशी प्रकाशित केले.
हॉरर आणि थ्रिलर चित्रपटांमध्ये कोरिअन चित्रपट हे कायमच स्वतःचा असा एक वेगळा दर्जा टिकवून राहिलेले आहेत. ह्या चित्रपटांच्या यादीतलाच एक अप्रतिम चित्रपट म्हणजे अकॅशिआ. अकॅशिआ म्हणजे छोटी छोटी पिवळी फुले येणारा एक वृक्ष. डॉक्टर किम आणि त्यांची पत्नी मी-सूक हे विनापत्य दांपत्य.

नटरंग

लेखक शिल्पा ब यांनी शनिवार, 05/11/2011 09:32 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी सिनेमात काय तो अभिनय, काय ती कथा, अन गाणी तर अहाहा!!! यापेक्षा जीव दिलेला बरा...पटकथा, नाविन्य वगैरे तर फार म्हणजे फार्फारच दूरच्या गोष्टी...अशीच काही दशके गेली..नाही का?? मराठी सिनेमात पैसा नाही म्हणून चांगले लेखक, दिग्दर्शक, अभिनेते इकडे फिरकत नाहीत वगैरे आक्षेप तर जुनेच...अरे पण अगदी ऐंशीच्या दशकात सुद्धा मराठी सिनेमा छान होतं...मग अचानक काय झेंडू फुटले? अचानकपणे काहीतरी चमत्कार व्हावा तसं दोन हजार सालापासून जरा नवीन , उत्तम दर्जाचे सिनेमे यायला सुरुवात झाली...चूकभूल द्यावी घ्यावी. दुकानात चांगल्या मराठी सिनेमांच्या सीडी विकत घ्यावा म्हणून गेले अन तिथल्या मुलाने "वळू" सुचवला.

एका द्वयर्थी गीताचे रसग्रहण

लेखक चेतन सुभाष गुगळे यांनी गुरुवार, 03/11/2011 19:48 या दिवशी प्रकाशित केले.
जेव्हा एखाद्या वाक्यरचनेतून एकाहून अधिक अर्थ ध्वनित होतात तेव्हा श्लेष अलंकार साधला जातो. या गाण्यातही अशाच प्रकारे वाक्यरचनेतून दोन अर्थ आपण काढू शकतो.

"द जर्नी होम - ऑटोबायोग्राफी ऑफ अ‍ॅन अमेरिकन स्वामी"

लेखक प्रास यांनी बुधवार, 02/11/2011 15:34 या दिवशी प्रकाशित केले.
तसं मी फारसं इंग्रजी वाचन करत नाही. वाचनाचा वेग कमी पडतो हे कदाचित कारण असेल पण मुद्दाम इंग्लिश साहित्याचं वाचन होत नाही हेच खरं.

येद्या मुग्या

लेखक भास्कर केन्डे यांनी मंगळवार, 01/11/2011 23:01 या दिवशी प्रकाशित केले.
लोकमान्य टिळकांच्या झंझावाताने देश प्रेरीत झाल्याचा तो काळ होता. १९१७-१९१९ याकाळात कधितरी लोकमांन्यांचा मराठवाड्याचा दौरा होता. त्यात काही दिवस त्यांनी बीड जिल्ह्याला दिले. बीडजवळील महुज या गावी लोकांना मार्गदर्शन करुन टिळक लोकांशी संवाद साधत होते. त्या दरम्यात भारावलेले दोन तरुण त्यांच्या जवळ जाऊन त्यांच्याशी. त्या तरुणांची नावे येदू/यदुनाथ (आडणाव, बहुतेक खाडे) व मुग्या (याचे नाव खूप जणांना विचारले पण कुणी सांगू शकले नाही; आडनाव बहुतेक थोरात असावे). असे म्हणतात की भेटीत टिळकांनी या दोन रांगड्या तरुणांना शोषित-पिडीत समाजासाठी कार्य करायचा सल्ला दिला.

The Shadow Of The Great Game: The Untold Story Of India's Partition: ले. नरेंद्र सिंग सरीला

लेखक फारएन्ड यांनी सोमवार, 31/10/2011 22:24 या दिवशी प्रकाशित केले.
The Shadow Of The Great Game: The Untold Story of India's Partition, लेखक नरेंद्र सिंग सरीला प्रथम एक खुलासा: येथील (मराठी साईट्स) लेखांचा संदर्भ घेउन म्हणायचे झाले तर गांधी/नेहरू/काँग्रेस एका बाजूला व सावरकर्/संघ/हिंदुत्त्ववादी दुसर्‍या बाजूला असे धरून माझ्यासारखे अनेक लोक "मधे कोठेतरी" असतात व मिळालेल्या माहितीनुसार थोडेफार इकडेतिकडे होतात. हे परीक्षण साधारण अशाच माहितीनुसार लिहीलेले आहे :) लेखकाची माहिती: नरेन्द्र सिंग नरीला हे मूळचे सरीला संस्थानचे वारस, नंतर लॉर्ड माउंट्बॅटन यांचे सहाय्यक (Aide-de-camp) आणि पुढे १९४८ ते १९८५ इतकी - तब्बल ३८ वर्षे- भारतीय परराष्ट्र सेवेत अधिकारी होते.

RA _ONE

लेखक स्पा यांनी गुरुवार, 27/10/2011 10:23 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबईच्या लोकल मधून अचाट स्टनट्स करणारा शाहरुख उर्फ जी - वन,... भयानक वेगात फिरवलेले क्यामेरे ... ब्रेक्स नसलेली सुसाट सुटलेली लोकल .. हिरवीण चक्क मोटरमन च्या जागी .. शेवटी.. लोकल चे डबे वेगळे करून लोकांना वाचवण .. फक्त मोटरमनच्या डब्याच प्रचंड वेगाने CST स्टेशनात धडकण .. चक्क स्टेशनच्या बाहेर लोकल चा डबा येण.. त्या धक्क्याने जुन्या स्टेशनच्या इमारतीला तडे जाण, त्या वरची विक्टोरीयाची मूर्ती कोसळण....हळू हळू.. स्टेशन ची इमारतच खचण. अफाट सर्वच अफाट...