Skip to main content

समीक्षा

कविता व भावगीत

लेखक शरद यांनी रविवार, 15/07/2012 09:33 या दिवशी प्रकाशित केले.
मागील एका लेखात विषय आला होता " कविता व भावगीत यात फरक करता येतो का ? आणि तसा फरक असेलच तर तो कशामुळे उद्भवतो ? आता हे शक्य आहे की चांगला कवी सुरेख भावगीत लिहू शकेल आणि श्रेष्ठ भावगीतकार सुरेख कविताही लिहून जाईल. दोन उदाहरणे म्हणजे मंगेश पाडगावकर आणि शांताबाई शेळके. उलटे उदाहरण म्हणजे आरती प्रभूंचे. त्यांच्या अनेक सुन्दर कविता रसिकांच्या मनात घर करून असतात पण भावगीत ? लक्षात आले का मला काय म्हणावयाचे आहे ? पण हा फरक अधोरेखित करावयास आज एक छान उदाहरण देतो. काळ साधारणत : साठ एक वर्षांपूर्वीचा.

गँग्ज ऑफ वासेपुर

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी बुधवार, 04/07/2012 18:40 या दिवशी प्रकाशित केले.
'अनुराग कश्यप डोक्यावर पडला आहे' इथपासून ते 'येवढा चित्रपट लोकांनी का नाकारला?' अशा दुसर्‍या टोकाच्या प्रतिक्रियेपर्यंतच्या गप्पा 'गँग्ज ऑफ वासेपुर' ह्या चित्रपटाबद्दल ऐकत होतो. स्वतः अनुराग कश्यप आणि ज्यांना चित्रपटातले नक्की कळते (आसे आम्हाला वाटते) अशा दोन चार समीक्षकांनी देखील वासेपुरचे कौतुक केल्याने, आता नक्की भानगड आहे तरी काय हे बघणे आलेच होते. काल मग एकदाचा हा चित्रपट पाहिला. चित्रपटाची कथा म्हणाल तर एका वाक्यात संपणारी आहे.

प्रयास

लेखक अमृत यांनी गुरुवार, 28/06/2012 14:05 या दिवशी प्रकाशित केले.
त्याचे खरे नाव वैभव आम्ही त्याला प्रेमाने 'सोन्टुल' म्हणतो. गोड निरगस चेहर्‍याचा सदा हसतमुख छोकरा, पण दुर्दैवाने जन्मतः मुकबधिर. वैभव आमचे दुसरे आणि शेवटचे अपत्य. मोठा मुलगा सर्वसामान्य अव्यंग. आम्हा उभयता पती पत्नीच्या तिसर्‍या पिढीपर्यंत कुणी मुकबधीर नव्हते. त्यामुळी अनुवंशिकता म्हणता येणार नाही. मात्र तो गर्भात असताना त्याच्या आईने दोन मुलांत अंतर असावे म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने गर्भपात करण्यासाठी अ‍ॅलोपॅथिक गोळ्या घेतल्या होत्या. औषधीस दाद न देता तो आमच्या कुटुंबात दाखल झाला. बाळंतपण सुलभतेने न होता विलंबामुळे सिझेरीन पद्धतीने करण्यात आले.

गँग्स ऑफ वासेपूर - गेट वेल सून, अनुराग!

लेखक श्रीरंग यांनी शनिवार, 23/06/2012 21:41 या दिवशी प्रकाशित केले.
स्किझोफ्रेनिया नावाचा एक आजार असतो. यात म्हणे रुग्ण मधूनच स्वत:च्या मूळ स्वभावाशी एवढा विसंगत वागतो, की "हाच का तो?" असा समोरच्याला प्रश्न पडावा. शिवा, सरकार, सत्या, कंपनी, बनवणारा रामगोपाल वर्मा पुढे RGVकी आग, जेम्स, डिपार्टमेंट बनवेल असं स्वप्नात तरी वाटलं होतं का? हिंदी चित्रसृष्टीत रामू हा या आजाराचं सर्वात ठळक व एकमेव उदाहरण आहे.... असा मझा कालपर्यंतचा भ्रम होता.

देव,धर्म,श्रद्धा आणि विवेक-विचार

लेखक शरद यांनी शुक्रवार, 15/06/2012 10:43 या दिवशी प्रकाशित केले.
देव,धर्म, श्रद्धा आणि विवेक-विचार सामान्य जनातील अंधश्रद्धा नाहिशी करण्याचा प्रयत्न म. ज्योतिबा फुले यांच्यापासून श्री. दाभोळकर यांच्यापर्यंत अनेकांनी केला. "बुडती हे जन " हे न बघवून त्यांना वाचविण्याकरिता पोटतिडिकेने लिखाणही केले. त्यांचा वसा चालविणारे एक लेखक म्हणजे प्रा. य. ना. वालावलकर. उपक्रमसारख्या संस्थळावर व वर्तमानपत्रात नियमितपणे त्यांचे लेख-पत्रे प्रसिद्ध होत असतात. प्रा. वालावलकरांचे वरील नावाचे पुस्तक नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. पुस्तकाचे दोन भाग आहेत. पहिल्या भागात ६२ लेख आहेत.

एलियन आणि प्रॉमिथियसच्या निमित्ताने ...

लेखक विनीत संखे यांनी बुधवार, 13/06/2012 15:18 या दिवशी प्रकाशित केले.
चित्रपट बघणं हा कधीकधी त्या चित्रपटापेक्षा त्याच्या कथादुनियेत रमवणारा एक अनोखा अनुभव असू शकतो. म्हणजे ज्या इहलोकात तो घडतो, ज्या जगाचे परिमाण त्या चित्रपटाशी आणि त्याच्या पटकथेशी निगडीत असतात तेच कित्येकदा आपणास अत्यंत समाधानकारक अनुभव देऊन जाऊ शकतात. सायन्स फिक्शनचे काल्पनिक जग हे एका कलाविष्कारापुरताही सीमित असू शकते जसे "वॉर ऑफ द वर्ल्ड"चे जग; म्हणजे आधी कॉमिक्स आणि नंतर स्टिवन स्पीलबर्गने टॉम क्रुसला घेऊन बनवलेल्या चित्रपटात दाखवले गेलेले.

शांघाय

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी बुधवार, 13/06/2012 12:28 या दिवशी प्रकाशित केले.
विकांताला मेंदूला झालेला त्रास बघता ह्या वेळी मेंदूचा वापरच करावा लागणार नाही असा एखादा मसालापट बघायचे ठरवले आणि पावले चालली 'शांघाय'ची वाट. 'पोलिटिकल थ्रिलर' असा गाजावाजा झालेला हा चित्रपट ना पोलिटिकल थ्रिलरच्या अपेक्षा पूर्ण करतो ना नुसत्या थ्रिलरच्या. हान काही काही प्रसंगात थिल्लर वाटण्यात मात्र तो यशस्वी झाला आहे हे नक्की.

जानी दुष्मन एक अनोखी प्रेम कहानी

लेखक मृत्युन्जय यांनी मंगळवार, 12/06/2012 17:56 या दिवशी प्रकाशित केले.
साधारणपणे वाईट चित्रपटांच्या काही कॅटेगर्या असतात. वाईट, खुप वाईट आणि अशक्य वाईट. याच्या व्यतिरिक्त एक क्याटेगरी आहे जी केवळ २-४ चित्रपटात संपु शकते. जानी दुष्मन त्यापैकी एक. चित्रपटाचे नाव खुप जालीम आहे. तुमचा एखादा जानी दुष्मन असेल तर त्याला खुर्चीला बांधुन ठेवुन हा चित्रपट दाखवावा. त्याला अजुन टॉर्चर करायचे असेल तर याच चित्रपटातले "जावेद भाई सो रह्यले है" हे गाणे चालीवर पाठ म्हणुन दाखवायची शिक्षा द्या. एकतर तो दुष्मनी सोडुन देइल किंवा दुनिया. दोन्ही तुमच्या साठी चांगलेच आहे.

5 रायफल्स.. एक १००% हिंदी सिनेमा...

लेखक मुक्त विहारि यांनी सोमवार, 11/06/2012 17:19 या दिवशी प्रकाशित केले.
कधी-कधी डोके अगदीच कामातून जाते.कुठलेही काम करावेसे वाटत नाही.अशावेळी मन परत शांत करायला , मी सडाफटिंग असतांना (म्हणजे भारतात रहात नसतांना) काही गोष्टी करतो.तसाही मी १००% डोंबिवलीकर असल्याने चित्रपट,नाटक. वाचन इ, बैठा विरंगुळा मला जास्त आवडतो.चेस खेळणे,ब्रिजचे २-४ डाव खेळणे,मोझार्ट्चे संगीत ऐकत पेपर वाचणे किंवा एखादा मस्त सिनेमा बघणे.