Skip to main content

समीक्षा

शुक्रतारा ....मंदवारा ... नाबाद ५० वर्षे

लेखक चौकटराजा यांनी बुधवार, 31/10/2012 19:18 या दिवशी प्रकाशित केले.
शुक्रतारा मंदवारा या गाण्याला जन्मून ५० वर्षे झाली. आज ही हे गीत आजच्या तरूण पिढीत लोकप्रिय आहे. आणि आठवण म्हणून म्हातार्‍या-कोतार्‍यातही. एक समर्थ भावगीत गायक म्हणून या गीताने अरूण दाते ( खरे अरविन्द दाते ) याना ओळख मिळवून दिली.सुधा मलहोत्रा यांचा मधाळ आवाज मराठी गानससिकाना परिचित झाला तो ही याच गाण्याने. त्यावेळी आकाशवाणी मुंब्ई केंद्रावर जे लोक नोकरीस होते त्यांची सांस्कृतिक चंगळच होती. नीलम प्रभू.

अरे माझ्या देवा... Oh My God..

लेखक केदारविदिवेकर यांनी रविवार, 28/10/2012 15:22 या दिवशी प्रकाशित केले.
ओह माय गॉड.. अरे देवा ... असे आपण कितीतरी वेळा, कितीतरी ठिकाणी, कितीतरी गोष्टीत सतत वापरत असतो. आता या मागील किंतु, हेतू, परंतु हा विविधांगी, माणसानुरूप, कालानुरूप बदलत असतो, हा भाग निराळा. अमुक काही झालं , कि हे देवा, अस्सं झालंच कसं? काय करणार देवाची करणी.. याच देवाच्या करणीवर आक्षेप घेणारा असा अभिनय मांडलाय 'परेश रावल' यांनी वरील "ओह माय गॉड" या चित्रपटात. उत्तम सादरीकरण, दिग्दर्शन, सर्वांचा आपापल्या वाटेला अभिनय. पण मूळ खांब म्हणजे परेश रावल. देवाची भूमिका साकारलीय दस्तुरखुद्द 'अक्की" म्हणजे आपला अक्षय कुमार याने. तर हि कथा एक हिंदी नाटक " किशन वि.

वासेपूर

लेखक आळश्यांचा राजा यांनी शनिवार, 13/10/2012 16:21 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ता पहायला मिळाला. गँग्ज ऑफ वासेपूर पाहताना त्यातील अनेक गोष्टी आपण प्रथमच पहात नसलो तरीही अंगावर येतात. शिवराळ बोली भाषा आणि मॅटर ऑफ फॅक्ट व्हायलन्स अनेक सिनेमांमधून पहायला मिळतो. वासेपूरचे ते काही यूएसपी नाही. प्रकाश झाच्या अपहरण, गंगाजल मधून व्यवस्था, गुन्हेगारी, राजकारण यांचे पद्धतशीर आकलन करवून देणारे दर्शन घडते. वासेपूर त्या बाबतीतही काही अगदी वेगळा, उठून दिसणारा किंवा पहिलाच सिनेमा नाही. कथानक म्हणाल तर खानदानी दुश्मनी, रोमिओ जुलिएट स्टाइलचे दुश्मन खानदानांतील प्रेमप्रकरण, माफिया धंदापद्धती या गोष्टीही नव्या नाहीत.

ओह माय गॉड - झणझणीत अंजन

लेखक समीरसूर यांनी मंगळवार, 02/10/2012 14:01 या दिवशी प्रकाशित केले.
माझी एक आत्या आहे. वय साधारण ७३ वर्षे! आयुष्याचा बहुतेक काळ एका लहान गावात व्यतित केलेला. घरचे वातावरण कर्मठ! एकदा माझ्या चुलत भावाचे लग्न आटोपून मी आणि माझी ही आत्या पुण्यास परत येत होतो. त्यादिवशी एकादशी होती. भूक लागली म्हणून आम्ही एका ढाब्याजवळ थांबलो. आत्याला म्हटले की आपल्याला पुण्याला पोहोचायला अजून ३-४ तास तरी लागतील; आताच व्यवस्थित जेवून घे. आत्याच्या उत्तराने मी आश्चर्यचकितच नाही तर पुरता हबकलो. "आत्या, पटकन जेवून घेऊ आणि मग पुन्हा निघू" "तू जेवून घे; मला जेवता नाही येणार. आज एकादशी आहे." "अगं आज काही कार्तिकी किंवा आषाढी एकादशी नाही. साधी मंथली एकादशी आहे.

काटकोनी त्रिकोण

लेखक तिमा यांनी गुरुवार, 20/09/2012 13:49 या दिवशी प्रकाशित केले.
'काटकोन त्रिकोण' हे नाटक साधारण वर्षापूर्वी बघायचे ठरवले होते. तिकिटेही काढून आणली होती. पण ऐन वेळेस सभागृहावर पोचलो आणि, डॉ. मोहन आगाशे' यांची तब्येत बरी नसल्याने प्रयोगच कॅन्सल झाला. त्यानंतर, या ना त्या कारणाने बेत लांबणीवरच पडत गेला. अचानक, गणेशचतुर्थीलाच, शिवाजी मंदिर ला प्रयोग लागल्याचे कळताच फोन बुकिंगवर प्रयत्न केला. ते फक्त दोनशेचीच तिकिटे ठेवतात हे कळले. पण गणपतीच्या गडबडीत सगळे असल्याने आयत्या वेळेसही तिकीट मिळेल असा विचार करुन गेलो.

हायटेक चितळे बंधू

लेखक आनंद भातखंडे यांनी शुक्रवार, 31/08/2012 15:38 या दिवशी प्रकाशित केले.
एका शनिवारी भाच्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सहकुटुंब पुण्याला जायचा योग आला. पुण्याला गेलं की येताना काय खाऊ आणायचा असा प्रश्नच पडत नाही. चितळ्यांची बाकरवडी तर ठरलेली.मस्त कप भर चहा बरोबर १०-१२ बाकरवड्या कधी फस्त होतात तेच कळत नाही. माझी बहिण कोथरूडच्या Happy Colony मध्ये राहते.तिच्या घराजवळच चितळे बंधूंची शाखा आहे. संध्याकाळी ५ वाजता वाढदिवसाची सगळी तयारी झाली होती आणि वाढदिवस साजरा करण्यासाठी ६:३० वाजायच्या सुमारास सगळ्या बालगोपाळ मित्र मंडळीना बोलावले होते.

लबाड सभ्य

लेखक सृष्टीलावण्या यांनी शनिवार, 25/08/2012 06:30 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या सत्तालोभी र्‍हस्व दृष्टि राजकारणी मंडळींनी काही स्वयंघोषित इतिहासकारांना हाताशी धरून जातीचे राजकारण चालवले आहे. विशेषकरून ब्राह्मणद्वेष हा त्या गलिच्छ खेळीचा पाया झालेला आहे. अफझलखानाला पिता मानणारी मंडळी सध्या कृष्णाजी भास्कर ह्या अफझलखानाच्या वकिलावर चिखलफेक करताना आढळतात. ह्यात त्यांनी आनंद मानायला कोणाची हरकत असायला काहीच कारण नाही. कारण कोणीतरी (बहुदा विनोबाजींनी) म्हटले आहे की श्रोते कीर्तनाचा लाभ घेत असताना पालीचा आनंद मात्र किडे मटकवण्यात असतो. पण आश्चर्याची बाब म्हणजे ह्या सर्व स्वघोषित विद्वज्जनांना महाराजांचे वकील श्री. गोपीनाथपंत बोकील ह्यांचा अनायास विसर पडलेला दिसतो.

"प्रे (सावज)" एक थरकापवून टाकणारी विज्ञान कादंबरी

लेखक सागर यांनी शनिवार, 18/08/2012 22:10 या दिवशी प्रकाशित केले.
पुस्तकाचे नावः प्रे (सावज) मूळ लेखकः मायकल क्रायटन अनुवादकः प्रमोद जोगळेकर प्रकाशकः मेहता पब्लिशिंग हाऊस किंमत : रु. ३००/- मायकल क्रायटन हे नाव आता मराठी वाचकांना अपरिचित राहिलेले नाहिये. जुरासिक पार्क, लॉस्ट वर्ल्ड, डिस्क्लोजर, काँगो अशा कित्येक कादंबर्‍या मायकेल क्रायटनने लिहिल्या आहेत व त्याच्या कादंबर्‍यांवर बेतलेले हॉलिवूड मधील हे इंग्रजी चित्रपटही अतिशय गाजलेले आहेत. अतिशय थरारक अशी कथानकाची रचना करणारा लेखक म्हणून मायकल क्रायटन सर्वांना परिचित आहेच.

संगीत समीक्षण : गँग्स ऑफ वासेपुर २

लेखक प्रेरणा पित्रे यांनी शनिवार, 11/08/2012 22:57 या दिवशी प्रकाशित केले.
गँग्स ऑफ वासेपुर हा चित्रपट अनुराग कश्यपच्या कारकिर्दितला बहुचर्चित हुकुमी एक्का. स्नेहा खानवलकर या प्रतिभाशाली मराठी मुलीने या चित्रपटाला संगीतबद्ध केले आहे. "हंटर" आणि "वुमनिया" च्या यशानंतर गँग्स ऑफ वासेपुर २ च्या संगीताकडुन अपेक्षा उंचावल्या होत्या ज्या बर्याच अंशी पुर्ण झाल्या आहेत. स्नेहा खानवलकरच्या वैविध्यपुर्ण आणि रचनात्मक प्रयोगांमुळे चित्रपटातील सर्वच गाणी श्रवणीय झाली आहेत. १. ची चा लेदर : "दुर्गा" नामक १६ मुलीने हे गाणे गायले आहे. रेल्वेच्या डब्यात गाण्यापासुन ते ची चा लेदर पर्यतचा दुर्गाचा प्रवास रंजक आहे.

ज्यां दूधकि नदियां बाहे...

लेखक आळश्यांचा राजा यांनी शनिवार, 11/08/2012 01:41 या दिवशी प्रकाशित केले.
१९७६ साली, म्हणजे माझ्या जन्माच्या जवळपास प्रदर्शित झालेला "मंथन" मी आजवर पाहिला नव्हता. मला आता राहून राहून याचे आश्चर्य वाटतेय. म्हणजे गाजलेला प्रत्येक सिनेमा मी पाहिलेलाच आहे, किंवा पाहिलेला असायला हवा वगैरे काही मनात नाही; पण माझ्याच डोक्यात घोळत असलेल्या "प्रांतांच्या गोष्टीं" च्या अनेक बीजांपैकी एक जणू साकार होऊन चित्रपटरुपात आपल्या समोर येतंय असं वाटत राहिलं. म्हणून आश्चर्य. ही समीक्षा नाही. चित्रपट समजणे आणि तो समजाऊन सांगणे एवढी प्रगल्भता माझ्याकडे नाही. हे एक शेअरिंग आहे. चित्रपट गाजलेला तर आहेच.