Skip to main content

समीक्षा

तुकाराम... हे राम !

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी सोमवार, 11/06/2012 13:21 या दिवशी प्रकाशित केले.
तुकारामांची बेअब्रू झाली किंवा नालस्ती झाली तर आपल्याला केस गुदरता येते का हो ? का तुकोबांचे नातेवाईक असणे कंपल्सरी आहे ? तुकोबांच्या बाबतीत मानवी हक्क संघटना मदत करू शकेल काय ? बराच गाजावाजा झालेला आणि चालू असलेला तुकारामा हा चंद्रकांत कुलकर्णी ह्यांचा चित्रपट पाहून (खरेतर पहिल्या ४ मिनिटातच) पडलेले हे काही प्रश्न. खरंच सांगतो, एक..फक्त एक थप्पड किंवा बुक्का तुकारामांना कोणालातरी मारताना दाखवले असतेना तर हा चित्रपट सौथ स्टाइल म्हणून आरामात खपवता आला असता.

प्रोमीथीयस (Prometheus)

लेखक सोत्रि यांनी रविवार, 10/06/2012 22:06 या दिवशी प्रकाशित केले.
प्रोमीथीयस नावाचे एक भव्य अंतरा़ळ यान पृथ्वीपासून करोडो मैलांवर असलेल्या एका आकाशगंगेतल्या सुर्यमालिकेतील एका ग्रहावर एका मिशनसाठी चालले आहे. त्यात सर्व अंतराळवीर दीर्घकाळीन (दोन वर्षांहून अधिक) झोप घेऊन तो ग्रह जवळ आल्यामुळे उठुन त्या ग्रहावर उतरण्यासाठी तयार होत आहेत. सर्वजण उठून तयार झाल्यावर वेलॅन्ड कॉर्प.

विज्ञानातील चमत्काराकडून चमत्काराच्या विज्ञानाकडे

लेखक शशिकांत ओक यांनी शनिवार, 09/06/2012 01:14 या दिवशी प्रकाशित केले.
विज्ञान आणि बुद्धिवाद प्रकरण 2
विज्ञानातील चमत्काराकडून चमत्काराच्या विज्ञानाकडे
प्रकरणाचे शीर्षक वाचून कोणाला ही असे वाटण्याची शक्यता आहे की, विज्ञानातही चमत्कार आहेत आणि चमत्काराचे ही विज्ञान आहे असे असेल तर ज्या विज्ञानात चमत्कर आहेत त्याला विज्ञान कसे म्हणावे व ज्या चमत्कारांचे विज्ञान आहे त्याला चमत्कार कसे म्हणावे असा साहजिकच प्रश्न उपस्थित होईल.

रद्दड राठोड (Rowdy Rathore - Review)

लेखक रसप यांनी गुरुवार, 07/06/2012 17:25 या दिवशी प्रकाशित केले.
काल ऑफिसात फारच पकलो. जाम बोअर झाल्यावर मला अत्यंत टुकार, बंडलबाज, फालतू सिनेमे बघायला आवडतं. आजकाल बहुतेक हिंदी सिनेमा च्यानल्सवर संध्याकाळी टिपिकल दक्षिण भारतीय सिनेमे हिंदीत डब करून माझ्यासारख्यांसाठीच असतात! पण, काल जरा जामच पकलो होतो म्हणून म्हटलं आज काही तरी वेगळं करू. आज पैसे देऊन फालतू सिनेमा बघू! पेपर बघितला. त्यातल्या त्यात 'फिल्मी' सिनेमा निवडला. शोचं टायमिंगही सोयीस्कर होतं. बास्स.. बाईकवर टांग टाकली आणि थेट थेटरात पोहोचलो ! ती संध्याकाळ होती 'राउडी राठोड' ची..

रावडी राठोड

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी गुरुवार, 07/06/2012 12:45 या दिवशी प्रकाशित केले.
रावडी राठोड ह्या चित्रपटाच्या नावातच फक्त दम आहे. हे येवढे वाक्य सांगून खरेतर चित्रपटाचे परीक्षण मांडता येईल इतका हा चित्रपट डोक्याला शॉट आहे. सध्या आपल्याकडे साऊथच्या चित्रपटांच्या रिमेकची एक लाटच आली आहे, त्यातले काही चित्रपट चांगला पैसा मिळवण्यात यशस्वी देखील झाले आहेत. ह्याच वाहत्या गंगेत हात धुऊन घ्यायचा प्रभुदेवा आणि संजय लीला भन्साळीचा प्रयत्न म्हणजे रावडी राठोड. हा चित्रपट रवी तेजा च्या गाजलेल्या विक्रमार्कूडू चा हिंदी रीमेक आहे.

एन डी तिवारींची सत्वपरीक्षा

लेखक आशु जोग यांनी मंगळवार, 29/05/2012 21:18 या दिवशी प्रकाशित केले.
कॉग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री, आंध्रचे माजी राज्यपाल एन डी तिवारी (वय ८६) यांची आग्नि परीक्षा होते आहे. याबाबतची हकीकत अशी रोहित शेखर यांच्या पितृत्वाच्या वादावरून डीएनए चाचणीस नकार देणारे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते एन. डी. तिवारी यांच्या रक्ताचे नमुने आज (मंगळवार) डीएनए चाचणीसाठी घेण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाने तिवारी यांना डीएनए चाचणीसाठी आजपर्यंत रक्‍ताचे नमुने देण्याचा आदेश दिला होता.

काकस्पर्श: अस्फुट नात्याची कथा

लेखक रमताराम यांनी सोमवार, 21/05/2012 13:59 या दिवशी प्रकाशित केले.
सात-आठ वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. शाहरुखचा नवा 'देवदास' आला होता. आमच्या ऑफिसमधे जेवणाच्या टेबलवर गप्पाटप्पांमधे अपेक्षेनुसार त्याचा विषय निघालाच. नेहमीप्रमाणे मतमतांतरे होतीच पण चित्रपट न आवडलेल्यांची संख्या अधिक होती. का आवडला, का आवडला नाही वगैरे मते हिरिरीने मांडली जात होती. 'पण मला तर आवडला बुवा' एक कन्या म्हणाली. 'काय आवडले तुला?' असा प्रश्न विचारताच 'कॉस्चुम्स काय भारी आहेत नै.' कन्या उत्तर देती झाली. हे ऐकून त्या टेबलवर आपसात चर्चा करणारे वेगवेगळे गट आपले सारे मुद्दे विसरून अवाक् झाले. काही मिनिटे भयाण शांतता होती नि पुन्हा कल्लोळ सुरू झाला.

अजिंठा

लेखक निखिल देशपांडे यांनी शनिवार, 12/05/2012 23:24 या दिवशी प्रकाशित केले.
अजिंठा झाडांचा...झाडांच्या झुलत्या प्रवाही पाण्यातला... लेनापूर फर्दापूरच्या गावंढळ गर्दीतला... बंजारा वस्तीच्या होळीच्या थाळीवर थिरकत गेलेला...अजिंठा
नितीन चंद्र्कांत देसाई अजिंठ्यावर चित्रपट काढताहेत म्हणजेच काहीतरी भव्यदिव्य असणार असे अजिंठाचे ट्रेलर पाहिल्या पासुन वाटायला लागले होते. त्यामुळे हा चित्रपट पहावा असे मनात होतेच. पारो आणि मे.रॉबर्ट गिल यांची प्रेमकहाणी. ना. धो महानोरांचे अजिंठा हे महाकाव्य आणि डोक्यात बसलेले अजिंठा.