Skip to main content

समीक्षा

शाळा : प्रत्येकाच्या मनातली

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी बुधवार, 25/01/2012 15:21 या दिवशी प्रकाशित केले.
मिलिंद बोकील ह्यांच्या शाळा कादंबरीने एका वाचक वर्गाला खरेच प्रेमात पाडले होते. 'शाळा' कादंबरी म्हणजे अजूनही जीव का प्राण अशी त्यांची अवस्था असते. ह्या वर्गाला सोडून इतर देखील अनेकांनी ही कादंबरी वाचली असणार हे नक्की. बर्‍याच वाचकांनी ती पसंतीला उतरल्याचे देखील मान्य केले असणारच. ह्या अशाच नितांत सुंदर कादंबरीवरती आधारित शाळा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. मिपावरती ह्याचे परीक्षण आले देखील आहे. आज ह्या चित्रपटाचे परीक्षण ब्लॉगवरती टाकणारच होतो, म्हणून लगे हाथ मिपावरती देखील टाकत आहे.

हस्ताक्षरातील अक्षर...

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी मंगळवार, 24/01/2012 12:16 या दिवशी प्रकाशित केले.
‘काही मान्यवर अन् प्रथितयश साहित्यिकांच्या हस्ताक्षरातलं एक अक्षर जरी कळत असेल तर शपथ.’ असे काही प्रकाशक आणि संपादक सदरहू साहित्यिकांच्या लिखाणाऐवजी ‘लेखना’वर टिप्पणी करताना जरूर बोलून जातात. याला काही माननीय अपवाद असतील, नाही असे नाही. तरीही यथातथा असलेल्या अक्षरातूनच ‘अक्षर’ वाङ्मय निपजते यात कुणाला शंका नसावी. हस्ताक्षर चांगले नाही वा संपादकांना वाचन सुलभ व्हावे म्हणून काही लेखक मंडळी चांगल्या हस्ताक्षराचे लिपिक पदरी बाळगून असत असेही ऐकिवात आहे. सुंदर विचार प्रसवणारे साहित्यिक अक्षरलेखनात मात्र कुडमुडे का? असा प्रश्न उपस्थित होण्याची दाट शक्यता आहे.

शाळा .. .... बरा जमलाय

लेखक राजघराणं यांनी शुक्रवार, 20/01/2012 21:52 या दिवशी प्रकाशित केले.
मिलिंद बोकील यांचं 'शाळा' आधी कैक वेळा वाचलं होतं . ज्याम आवडलं होतं... ह्या कादंबरीवर चित्रपट येणार ... येणार असे ऐकत होतो... आज तो आला... फस्ट डे फस्ट शो बघीतला ....... (टीप : या समिक्षेत चित्रपटाचा शेवट समजणार आहे... पण येथे शेवट महत्वाचा नाही, नववीत्ल्या मुलाच्या अनुभव विश्वाचे हे चित्रण आहे. आणी चित्रपटाने मूळ कादंबरी एवढी नसली तरी बर्यापैकी मजल मारली आहे) ही गोष्ट आहे १९७५ ( आणीबाणी फेम ) सालच्या आसपास ९ वीत शिकणार्या मुलाची. त्याचं नाव जोश्या. चौकोनी कुटंब .

मगधीरा

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी सोमवार, 26/12/2011 12:51 या दिवशी प्रकाशित केले.
काजल अगरवाल हिच्यावरती आजकाल आमचा भारी जीव. तिच्यावरती चित्रित केलेले मगधीरा मधील ' धीर धीर..' हे आमचे अत्यंत आवडते असे गाणे.

धमाल ऍनिमेशनपट : पुस इन द बुट्स

लेखक सोत्रि यांनी शनिवार, 17/12/2011 23:51 या दिवशी प्रकाशित केले.
आज मुलांबरोबर एक ऍनिमेशनपट बघितला, पुस इन द बुट्स. हा जेव्हा येणार अशा जाहिराती चालू झाल्या तेव्हा मला काही खास आकर्षक वाटत नव्हता हा. श्रेक चित्रपटातून लोकप्रियता मिळालेले एक प्राणीचित्र. त्यावर काय चित्रपट काढणार असे वाटत होते. मुलांच्या आग्रहामुळे बळंच गेलो हा चित्रपट बघायला, तेही 3D मध्ये. मागचा 3D (रा-वन) अनुभव अतिशय भयानक होता. पण चित्रपटाला गेल्याचे सार्थक झाले.

breaking dawn part 1

लेखक snowy यांनी सोमवार, 12/12/2011 18:25 या दिवशी प्रकाशित केले.
नुकताच आम्ही ब्रेकिंग डॉन हा चित्रपट बघितला. ट्वाइलाइट आणि हॅरी पॉटर फन्स मधे नेहमीच जुंपलेली असते. जे के रोलिंग ने स्नेप आणि लिली ची लव स्टोरी एका चॅप्टर मधे जशी सांगितली ते स्टेफनी मेयर ला चार पुस्तकांत ही जमले नाही असेही काहींचे मत आहे.

'डर्टी पिक्चर' : उलाला...उलाला...उलाला...उलाला

लेखक सोत्रि यांनी शुक्रवार, 02/12/2011 23:39 या दिवशी प्रकाशित केले.
बराच गाजावाजा करत आज एकदाचा ’डर्टी पिक्चर’ झळकला. फ़र्स्ट डे फ़र्स्ट शो असला भक्तीभाव कधीच नव्हता. सध्या जास्त काही कामधाम नाही त्यात शुक्रवार, त्यामुळे फ़र्स्ट डे फ़र्स्ट शो नाही पण फ़र्स्ट डेला पिक्चर टाकता आला. एका सी ग्रेड अभिनेत्री, सिल्क स्मिता, हीची शोकांतीका पडद्यावर दाखवली. पिक्चर मधे विषेश तसे काही नाही. तसे काही नाही म्हणजे, चांगली पटकथा, उत्कृष्ट दिग्दर्शन, उच्च निर्मीतीमुल्य वगैरे असले काही. साधी सरळधोपट कथा आहे. तसा 'आंबटशौकीन' मसाला भरपूर आहे. एका खेड्यातली लहान मुलगी जीला मोठ्या शहराचे आकर्षण आहे आणि तीची आई तीला शहरात नुसता झगमगाट आहे जो तिच्यासाठी चांगला नाही हे सांगत असते.

फरिश्ते

लेखक फारएन्ड यांनी मंगळवार, 29/11/2011 19:39 या दिवशी प्रकाशित केले.
भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर खालसा करायचे राहून गेलेल्या एका संस्थानातील ही कथा आहे. सदाशिव अमरापूरकर तेथील राजा असतो. त्याचा रथ, ड्रेस आणि हेअरस्टाईल पाहून जे कोण त्याच्याशी वाटाघाटीला आले असतील ते बहुधा "नॉट वर्थ इट" शेरा मारून तेथून निघून गेले असतील. हा राजा जनतेवर कसलेही मोटिव्ह नसलेले अन्याय करत असतो. त्यात तो तेथे भारताचा झेंडा लावू देत नसतो. एका अन्यायानंतर तेथील जनता - म्हणजे ए के हनगल- खुदाकडे कोणीतरी पाठवण्याची विनंती करते. मग दोन रोलर स्केट आकाशातून खाली पडतात. नंतर हवेतून तरंगत विनोद खन्ना व धर्मेन्द्र येतात.