Skip to main content

समीक्षा

ही आगळी कहाणी : एक आगळावेगळा कथासंग्रह

लेखक अॅस्ट्रोनाट विनय यांनी बुधवार, 19/04/2017 10:24 या दिवशी प्रकाशित केले.
जेवणात गुलाबजाम अन वाचनात लघुकथा आवडत नाहीत असा व्यक्ती सापडणे अवघड. नारळीकर, धारप, वपू, मिरासदार, मतकरी वगैरे कथाकारांच्या लिखाणाने कित्येक पिढ्यांची वाचनभूक भागवली आहे. मराठी वाचक नेहमीच उत्तमोत्तम कथांच्या शोधात असतो. आजच्या धकाधकीच्या अन तणावग्रस्त आयुष्यात काही खुसखुशीत वाचायला मिळालं तर ! हीच गरज निलेश मालवणकर यांचा 'ही आगळी कहाणी' हा नवीन कथासंग्रह पुर्ण करतो. सहज म्हणून मी पुस्तक हाती घेतलं आणि संपेपर्यंत हातातून सुटलं नाही. इतक्या सहजपणे आणि विनोदी शैलीत कथाविषय मानण्याचं कसब फार कमी लेखकांकडे असतं. पुस्तकाचं रुपडं चित्ताकर्षक आहे.

दांडी मारणे - एक विलक्षण कला

लेखक किसन शिंदे यांनी शुक्रवार, 24/03/2017 17:43 या दिवशी प्रकाशित केले.
खासगी किंवा सरकारी कार्यालयात काम करताना इतर चांगल्या-वाईट अनुभवांसोबत एका वेगळ्या गोष्टीचा अनुभव सगळ्यांनाच असतो, तो म्हणजे दांडी मारण्याचा आणि त्यासाठी अफलातून अशी कारणे देण्याचा वा शोधण्याचा. दोन्ही ठिकाणी वरिष्ठ पदावर काम करत असलेल्या व्यक्तीला त्याच्या हाताखाली असलेल्या कर्मचार्‍याकडून अचानकपणे दांडी मारण्याची अनेक कारणे दिली जातात. काही वेळेला ती खरी असतातही, तर काही वेळेला ती निव्वळ खोटी आणि मजेशीरही असतात.

इजाजत!

लेखक आदित्य कोरडे यांनी रविवार, 19/03/2017 09:51 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्याला गुलजारचे चित्रपट आवडतात बुवा. आता त्याचे सगळेच चित्रपट आवडतात, अशातला भाग नाही पण साधारण १९९५ च्या आधीचे म्हणजे माचिसच्या आधीचे चित्रपट मला आवडतात. इतर दिग्दर्शक आणि गुलझार यांच्या बाबत असं जाणवत कि इतर दिग्दर्शकांचे चित्रपट आवडले तरी त्याचित्रपटातले सगळे आवडतेच असे नाही. म्हणजे कदाचित गाणी आवडणार नाहीत किंवा climax आवडणार नाही पण गुलझार चा चित्रपट मलातरी एकतर सगळा च्या सगळा अवडतो किंवा अजिबात आवडत नाही उदा. हुतुतू हा मला अजिबात आवडला नाही अगदी गाण्यांसकट.

मरासिम

लेखक मिडास यांनी सोमवार, 13/03/2017 09:05 या दिवशी प्रकाशित केले.
अजून पण ती रात्रं लख्ख आठवतोय मला. बाबांनी walkman घेतला होता. आणि त्याच दुकानातून जगजीत सिंग ची एक कॅस्सेट. दुकानातून बाहेर पडल्या पडल्या मी त्यांच्या हातातून walkman काढून घेतला होता. इअर प्लग कानात सारून मी प्ले चं बटण दाबलं. गिटार ची जीवघेणी सुरावट कानातून सरळ मेंदूत घुसली होती. पाठोपाठ जगजीत सिंग चा आवाज मनात हळूच शिरला. कोई ये कैसे बतायें के वो तनहा क्यू है. त्या वेळेला शब्द समजले नाहीत. पण काहीतरी लक्कन हललं होतं आतपर्यंत. मुळात उर्दू हि भाषाच तशी आहे. प्रियकराने प्रेयसीबद्दल बोलावे तर फक्त उर्दूमधूनच हा माझा ग्रह आजतागायत कायम आहे.

मुलगी झाली

लेखक शेवटचा डाव यांनी शुक्रवार, 10/03/2017 09:21 या दिवशी प्रकाशित केले.
गावाच्या बाहेर मोरीवर बसलो होतो .तोच खट खट बुलेट चा आवाज करीत पांडुभौ आला . त्याच तोंड उतरेल व्हत . "कायर काय झाल पांडुभौ "आर तुझी वहनीची वटी भरली" "काय सांगतुस मग काय करायच ठरवलय तुला ध्यानात हाय ना शेवटाला पुजीच्या अन आर्चीच्या टायमाला शिजर केलय विहनीच " "हो ठाव हायर पण आय काय ऐकणार नाय अस वाटतय " अन मी पुन्हा सिता वहीनीच्या विचारात गुंतलो .आकरा वर्षे झाली पांडुभौ अन सिता वहीनी यांच्या लग्नाला, तशी पांडुभौ अन काकु काका (पांडुभौ चे आई वडील)यांची देखरेख ,शेतीतील कामे, घरात आल्या गेल्याची निट ठेप ,सगळ हसत मुखाने करानारी सिता वहीनी .

पुस्तकांविषयी सर्वकाही...

लेखक मोदक यांनी सोमवार, 27/02/2017 13:39 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकर्स.. सर्वप्रथम जागतीक मराठी दिनाच्या भरपूर शुभेच्छा..!! आपल्यापैकी बहुतांश लोक पुस्तकप्रेमी आहेत आणि सतत कांहीना कांही वाचत असतात. आपल्यापैकी अनेक दिग्गजांना पुस्तकांविषयी भरपूर गोष्टी माहिती असतात आणि अनेक वैविध्यपूर्ण माहिती / अनुभवही असतात.

शब्दप्रधान गायकी : यशवंत देव

लेखक संजय क्षीरसागर यांनी मंगळवार, 21/02/2017 21:54 या दिवशी प्रकाशित केले.
आनंदाच्या क्षणी कुणाच्याही मनात उमटणारी पहिली गोष्ट म्हणजे गाणं. खरं तर आनंद म्हणजे मनाचं काही काळासाठी स्थिर होणं आणि मग आत चाललेल्या अविरत वार्तालापाचा एक सुरेल ध्वनी होणं. हे मनातल्या शब्दांचे सूर होणं म्हणजे गाणं. यशवंत देवांचं `शब्दप्रधान गायकी' हे पुस्तक गाणं तयार होऊन अभिव्यक्त होणं आणि त्याचा एक माहौल तयार होणं या सकल प्रक्रियेचा एक समग्र वेध आहे. देव स्वतः जानेमाने संगीत दिग्दर्शक आहेत, कवी आहेत, गायक आहेत आणि सुगमसंगीताच्या एका प्रदीर्घ कालावधीचे प्रत्यक्ष साक्षी आहेत. अनेक प्रतीभावंत कवी आणि नामवंत गायकांकडून त्यांनी सुरेल गाणी घडवून घेतली आहेत.

डॉ. गो. बं. देगलूरकर यांचे ‘प्राचीन भारत इतिहास आणि संस्कृती’

लेखक संदीप ताम्हनकर यांनी रविवार, 19/02/2017 11:15 या दिवशी प्रकाशित केले.
‘प्राचीन भारत इतिहास आणि संस्कृती’ डॉ. गो. बं. देगलूरकर यांचे ‘प्राचीन भारत इतिहास आणि संस्कृती’ हे पुस्तक नुकतेच वाचले. भारतासारख्या देशाचा मोहेंजोदडो - हडप्पा काळापासून मुसलमान आक्रमक भारतात येईपर्यंतच्या विशाल कालखंडाचा अतिशय अभ्यासपूर्ण इतिहास सरांनी या पुस्तकात मांडलाय. विशेषतः अतिशय तुटपुंज्या ऐतिहासिक साधनांची उपलब्धता आणि ऐतिहासिक काळापासूनच एकंदरीत भारतीय समाज इतिहासाविषयी आणि त्याच्या नोंदी करण्याविषयी उदासीन असताना परिश्रमपूर्वक, विविध संशोधनातील तुकडे जोडत जोडत, शक्य तेवढा एकसंध इतिहास मांडायचा हे फार महान काम आहे. पुस्तक वाचल्यानंतर काही गोष्टी मांडाव्याशा वटतात.

जनार्दन केशव म्हात्रे -व्यक्ति परिचय

लेखक माहितगार यांनी मंगळवार, 14/02/2017 14:38 या दिवशी प्रकाशित केले.
विकिपीडियाचे माध्यम गवसल्याच्या उत्साहात अनवधानाने काही विकिपीडियन्सकडून स्वतः बद्दल लेखन होत असते. ज्ञानकोशीय उल्लेखनीयतेची निश्चिती असेल तर ते ठेवले जाते. मराठी भाषेत विवीध क्षेत्रातील व्यक्तींची दखल घेण्या जोग्या पुरेशा नोंदींच्या अभावी ज्ञानकोशीय उल्लेखनीयता निश्चित करणे अवघड होते. किंवा सर्व व्यक्ति / विषय मराठी विकिपीडियनना परिचीत असतातच असे नाही. असाच एक लेख नवे मराठी विकिपीडियन जनार्दन केशव म्हात्रे यांच्या बद्दल लिहिला गेला आहे. ज्ञानकोशीय उल्लेखनीय पुरेसा मजकुर स्वतंत्र स्रोतातून दुजोरा मिळे पर्यंत ती माहिती दुजोरा मिळवण्यासाठी मिसळपाव डॉट कॉमवर स्थानांतरीत करीत आहे.

राजीव मल्होत्रा - हिंदूफोबिया

लेखक वडापाव यांनी सोमवार, 06/02/2017 01:31 या दिवशी प्रकाशित केले.
मी निरीश्वरवादी माणूस आहे. माझा देवावर विश्वास नाही. देवावर विश्वास नसण्याचं कारण काही सिनेमांत दाखवलं जातं तसं (अष्टविनायक, देऊळ बंद) देवावरच्या रागापोटी नाही, तर देव असल्याचा, मला स्वत:ला पटेल असा शास्त्रसिद्ध पुरावा उपलब्ध नाही म्हणून. देवाचं अस्तित्व असू शकतं, या थिअरीला (सिंद्धांताला) मान द्यायला माझी ना नाही. उद्या मानवजातीला काही पुरावा गवसलाच, तर मी आनंदाने (म्हणजे नाईलाजानेच, पण पद्धत आहे बोलण्याची) माझी मतं बदलेन. पण निरीश्वरवाद्यांमध्ये सुद्धा एकवाच्यता नसते, हे मला जाणवायला काही काळ गेला. आज परिस्थिती अशी उद्भवली आहे, की बहुतेक निरीश्वरवादी माझ्या डोक्यात जाऊ लागले आहेत.