Skip to main content

समीक्षा

पुस्तकपरिचय: 'भय इथले...' - आतिवास सविता.

लेखक एस यांनी रविवार, 18/09/2016 15:13 या दिवशी प्रकाशित केले.
‘भय इथले... तालिबानी सावट : प्रत्यक्ष अनुभव’ लेखिका – आतिवास सविता. आतिवास यांच्या या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर नजर जाताच वाचकाला आतील शब्दानुभवांमध्ये भरलेल्या ताणाचे दडपण जाणवायला सुरूवात होते, इतके हे मुखपृष्ठ भेदक झाले आहे. आणि याचे श्रेय अर्थातच ‘रविमुकुल’ यांना आहे. एका भिंतीवर गोळीबाराच्या असंख्य खुणा आणि शेजारी एक बंद खिडकी. सेपिया रंगसंगतीवर खरवडल्यासारखं शुभ्र रंगातील शीर्षक. जणू भीतीचं सावट पुसण्याचा, जिवंत राहण्याच्या अनिवार ओढीतून केला गेलेला आकांत.

बार बार देखो

लेखक समीर_happy go lucky यांनी बुधवार, 14/09/2016 21:17 या दिवशी प्रकाशित केले.
निर्माता धर्मा प्रोडक्शन्स (जोहर फॅमिली) आणि रितेश सिधवानी, फरहान अख्तर नवीन चित्रपट घेऊन आलेले आहेत, बार बार देखो. काही वर्षांपूर्वी करण जोहरच्याच सुपरस्टार शाहरुख खानच्या “कभी अलविदा ना केहना” मध्ये पण एका चांगल्या कन्सेप्टची निरर्थक हाताळणी मुळे वाट लागली होती, त्या अनुभवाची आठवण धर्मा प्रोडक्शन्सला ‘बार बार देखो’ करून देणार हे नक्की. वास्तविक बघता comparatively वेगळी कल्पना होती. प्रेमात पडलेले जोडपे लग्न करण्याचा निर्णय घेते आणि या निर्णयात नवरदेवाची महत्वाकांक्षा आड येऊन लग्न तुटते. या कथेला भूत-भविष्य-वर्तमान या तिन्ही काळात निर्माता-दिग्दर्शकाने फिरवण्याचा प्रयत्न केलेला आहे.

बाप ------- हवा आहे पण कशाला?

लेखक मी कोण यांनी शनिवार, 10/09/2016 18:41 या दिवशी प्रकाशित केले.
खरे तर हा विषय अनेक दिवसांपासुन मनात होता परंतु राहुन जात होता. आज पुरुष -- हवा पण कशाला? ही चर्चा वाचल्यानंतर रहावले गेले नाही म्हणुन लगेच शुभस्य शीघ्रम!

मोहोन्जो- दारो: एक हुकलेली संधी (स्पॉयलर अलर्ट: हाय!!!)

लेखक ए ए वाघमारे यांनी मंगळवार, 23/08/2016 10:54 या दिवशी प्रकाशित केले.
स्पॉयलर अलर्ट लेवल: हाय !!!) आशुतोश गोवारीकर हा एक प्रामाणिक सिनेमाकार आहे. तो जीव तोडून मेहनत करत सिनेमे काढतो. पण त्याचं दुर्दैव म्हणा किंवा प्रयत्नांची- अभ्यासाची कमतरता म्हणा, कुठेतरी कमी पडतो. त्याचा नवा 'मोहोन्जो-दारो'ही या लौकिकाला अपवाद नाही. लगान, जोधा अकबर यासारखं प्रत्येकवेळी मोठ्या कॅनव्हासवर चित्र काढायाची हौस कितीही असली तरी चित्राच्या विषयात आणि ते चितारणार्‍या कुंचल्यात तेव्हढा दम हवा नाहीतर 'गवत खाणारी गाय' या चित्रासारखी त्याची गत होते आणि पाहाणार्‍याला गवतही दिसत नाही अन् गायही.

YZ (परिक्षण दुरुस्ती)

लेखक तर्राट जोकर यांनी रविवार, 21/08/2016 01:09 या दिवशी प्रकाशित केले.
(समीर_happy go lucky हे मिपावर नेहमी चित्रपट परिक्षण लिहित असतात. दर्जाच्या बाबतीत थोडंफार हुकत असले तरी त्यांची चिकाटी व आवड पाहून मला फार छान वाटले. त्यांच्या नुकत्याच आलेल्या http://misalpav.com/node/37050 ह्या वायझेड मराठी चित्रपटाच्या परिक्षणामधे बरेच काही खटकले. एक उत्तम चित्रपट परिक्षक होण्याची योग्यता असलेल्या लेखकास केवळ हुर्यो उडवून पळवुन लावावे हे मला योग्य वाटले नाही. त्यापेक्षा त्यांच्या परिक्षणातल्या खटकलेल्या बाजू वगळून, शब्दरचना सुधारून तेच परिक्षण संपादित केले तर कसे वाटेल अशी कल्पना मनात आली.

YZ (मराठी चित्रपट)

लेखक समीर_happy go lucky यांनी शनिवार, 20/08/2016 22:30 या दिवशी प्रकाशित केले.
YZ असे विचित्र टायटल का असा प्रश्न टायटल बघून रसिकांना पडू शकतो आणि ते योग्यही आहे कारण YZ हे दोन लेटर्स एका मराठी शिवीचा अपभ्रंश आहेत ज्याचा एक अर्थ साध्या शब्दांत होतो "बावळट". कल्पक लेखक क्षितिज पटवर्धन आणि दिग्दर्शक समीर विद्वांस यांचे हि जगावेगळी हिंमत दाखवल्याबद्दल अभिनंदन आणि नंतर या टायटलचे समर्पक एक्सप्लेनेशन कथेत दिल्याबद्दल कौतुक. कधी कधी जाणवणारी एक मानसिक सणक जेंव्हा "किक" या नावाने हिंदीत येते आणि आमचेच मराठी लोक उचलून धरतात तेंव्हा आम्ही मराठी जनांनी असा प्रयत्न करायला काय हरकत आहे? असाच काहीसा विचार या जोडीने केला असेल आणि जन्माला आला YZ.

मदारी...

लेखक अनिरुद्ध प्रभू यांनी शुक्रवार, 12/08/2016 16:15 या दिवशी प्रकाशित केले.
व्यावसायिकतेला धरुन उत्तमोत्तम प्रयोग करणारे, काहिना काही वेगळं देण्याच्या प्रयत्नात असणारे दिग्दर्शक भारतात कमी आहेत पण आहेत. नावच घ्यायची झाली तर शूजित सरकार आहे, प्रवल रमण,निरज पांडे आहे ई...... त्यात एक नाव अजुन येतं....निशिकांत कामत. डोंबिवली फास्टपासुन त्याचा सुरु झालेला प्रवास ४०४ असेल, लय भरी असेल असे वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट करत पुढे जातोय. याच प्रवासातला त्याचा नविन चित्रपट म्हणजे मदारी... मदारी...देश सो रहा है.... नावावरुन एक गोष्ट लक्षात येते चित्रपट बहुदा राजकिय वा शासकिय व्यवस्थेवर भाष्य करणारा असवा..मुळात तसच आहे.

(आरोळ्या जालीय फेरीवाल्यांच्या)

लेखक खेडूत यांनी शनिवार, 30/07/2016 12:31 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा (सदर धाग्याच्या लेखिका आदरणीय आणि सिनियर मिपाकर आहेत. आम्ही त्यांच्या लेखनाचे पंखा आहोत - त्यामुळे धागा टाकताना दोन दिवस विचारच करत होतो - पण आशा आहे की त्या स्वतः आणि ज्यांच्याकडे कळत नकळत निर्देश होते ते सगळेही ह.च घेतील.) पूर्वी निवडक संस्थळे सोडली तर इतर चेपू समूह , संस्थळांवर आतासारखी जिलब्यांची बाजारपेठ खूप कमी होती. मिपा तर अस्तित्वातच नव्हते. पण एकदा मिपा सुरु झाल्यावर मग काही नित्य गप्पांसाठी मिपावर येणार्‍या फेरीवाल्यांची - आय मीन आयडींची आतुरतेने वाट पाहिली जायची.

कबाली

लेखक समीर_happy go lucky यांनी शनिवार, 23/07/2016 23:36 या दिवशी प्रकाशित केले.
दक्षिण भारतीय चित्रपट तुम्ही बघता तेंव्हा एक तर ते बाय डिफॉल्ट नायक प्रधान असतात आणि कथा\पटकथा एक अतिशय जास्त "हे समजून घ्या, ते समजून घ्या" टाईपची असते. एखादी कथा नीट उलगडून सांगण्यात किंवा नीट एक्सप्लेन ऑन स्क्रीन करण्यात काय काठिण्य असते देव जाणे!! पण असं असते खरं. हे बहुतेक अति-जास्त नायकप्रधान वळण कहाणीला दिल्यामुळे असं होत असावं, अर्थात असं मला वाटते. कबाली हा सुपरस्टार (शब्दश:) रजनीकांत चा असल्यामुळे हा अपवाद असण्याचा प्रश्नच उठत नाही. साध्या शब्दात "सब कुछ रजनीकांत" या तीन शब्दांत कबालीची कहाणी सांगता येते.

पॉल पॉट : कंबोडियाचा क्रूरकर्मा

लेखक अभिजीत अवलिया यांनी शनिवार, 23/07/2016 02:13 या दिवशी प्रकाशित केले.
जन्माच्या वेळचे नाव सलोथ सार. ह्या क्रूरकर्म्याचा जन्म 19 मे 1925 रोजी 'Prek Sbauv ' ह्या कंबोडियाची राजधानी नाम पेन्ह पासून 100 मैल दूर असलेल्या खेड्यात झाला. 'पेन सलोथ' आणी 'सोक नेम' हे त्याचे आईवडील त्या वेळच्या मानाने बऱ्यापैकी सुखवस्तू दाम्पत्य होते. 1934 साली पॉल पॉट कंबोडियाची राजधानी नाम पेन्ह इथे शिक्षणासाठी गेला आणी तिथे एक वर्ष त्याने बुद्धिस्ट मॉनेस्ट्री मध्ये घालवले. त्यानंतर त्याने एका फ्रेंच कॅथॉलिक शाळेत प्रवेश घेतला आणी 1949 साली आपले शिक्षण पूर्ण केले. तिथून 1949 ला पॅरिस गाठले आणी 1953 सालापर्यंत रेडिओ टेक्नॉलॉजीजचे शिक्षण घेतले.