Skip to main content

समीक्षा

अमर फोटो स्टुडिओ - युवा कलाकारांची अफलातून फँटसी

लेखक श्रीगुरुजी यांनी गुरुवार, 26/01/2017 18:31 या दिवशी प्रकाशित केले.
अपूर्व (सुव्रत जोशी) आणि तनू (सखी गोखले) रिलेशनशिपमध्ये आहेत. तो पीएचडी साठी अमेरिकेला निघाला आहे. तनू इथेच राहणार आहे. लाँग डिस्टन्स रिलेशनशिप वर्क होत नाहीत असा तिचा विश्वास आहे. त्यामुळे अपूर्व अमेरिकेला गेल्यावर आपली रिलेशनशिप संपुष्टात येईल अशी तिची खात्री आहे. तो अमेरिकेला जाण्यापूर्वीच आपली रिलेशनशिप संपवून टाकावी असे तिने ठरविले आहे. रिलेशनशिप संपविणे त्याला मान्य नाही. त्यामुळे दोघांमध्ये किरकोळ स्वरूपाचे खटके उडत राहतात. अपूर्व अमेरिकेला जायचे या उद्देशाने उत्तेजित होण्याऐवजी नर्व्हस झालेला आहे.

ट्रेलर समिक्षा : गौतमीपुत्र सातकर्णी.

लेखक संदीप डांगे यांनी गुरुवार, 12/01/2017 20:26 या दिवशी प्रकाशित केले.
गौतमीपुत्र सातकर्णी. चित्रपटाचा ट्रेलर समिक्षा. दुसर्‍या शतकात होऊन गेलेल्या सातवाहन राजघराणातल्या गौतमीपुत्र सातकर्णी ह्याच्या जीवनावर आधारित ऐतिहासिक-काल्पनिक घटनांचा समावेश असलेला चित्रपट येत आहे. गौतमीपुत्र सातकर्णी म्हटल्यावर मला सर्वात आधी प्रचेतसभौ उर्फ वल्लीदा यांची आठवण झाली. केवळ त्यांच्यासाठी म्हणून हा धागा काढत आहे. ट्रेलरमधे दिसत असलेल्या कथानक, वेशभूषा, शस्त्रास्त्रे, वास्तुकला, ऐतिहासिक खुणा यांचा उहापोह करुयात. ट्रेलर आवडला.

एक शून्य तीन ..... नक्की पहावे असे रहस्य....

लेखक विजुभाऊ यांनी मंगळवार, 10/01/2017 21:03 या दिवशी प्रकाशित केले.
नाटकाचा सफाईदार प्रयोग म्हणजे काय हे जर अनुभवायचे असेल तर सुदीप मोडक लिखीत " एक शून्य तीन " हे मराठी नाटक आवर्जून पहावे. सदानंद केळकर हे आंबोली गावातील एक वयस्कर उद्योजक. त्यांच्या वाढदिवशी दर वर्षी येणारे ते एक पत्र या वर्षी का आले नाही म्हणून चिंतेत आहेत अनिता या त्यांच्या पुतणीचा अपहरणकर्ता हे पत्र पाठवत असावा आणि त्यातून पुतणी अजून जिवंत आहे हा संदेश तो देत असावा असे त्याना वाटतय .

कोड मंत्र - अत्यंत प्रभावी सादरीकरण

लेखक श्रीगुरुजी यांनी मंगळवार, 10/01/2017 15:00 या दिवशी प्रकाशित केले.
लष्कराचे सैनिकांसाठी अत्यंत कठोर प्रशिक्षण सुरू आहे. मराठा रेजिमेंटच्या सैनिकांची एक मोठी तुकडी अत्यंत कठोर प्रशिक्षणाची वेगवेगळी प्रात्यक्षिके करून दाखवित आहे. परंतु या तुकडीतल्या रवी शेलार नावाच्या प्रशिक्षणार्थीला हे कठोर प्रशिक्षण झेपत नाहीय्ये. इतरांच्या तुलनेत तो मागे पडतो. त्यांच्या अधिकार्‍याला, कर्नल प्रतापराव निंबाळकरांना त्याचे मागे पडणे अजिबात सहन होत नाही.ते स्वतः अत्यंत कर्तव्यकठोर आहेत. नक्षलवाद्यांशी समोरासमोर लढताना स्वतःला गोळ्या लागलेल्या असताना सुद्धा त्यांनी नक्षलवाद्यांचा बीमोड केलेला आहे.

भारतातल्या दोन क्रांतीकारक आर्थिक कारवाया : एक विश्लेषण

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी शुक्रवार, 30/12/2016 23:50 या दिवशी प्रकाशित केले.
स्वतःचा व पक्षाचा स्वार्थ बाजूला सारून देशाला पुढे नेणारा खंबीरपणा दाखविणे जगभरच्या भल्या भल्या नेत्यांना जमलेले नाही. मात्र, स्वतंत्र भारताच्या सात दशकांच्या इतिहासात हे दोनदा घडले आहे. सन १९९१ मध्ये उदार वित्तव्यवस्थेची पायाभरणी केली गेली तेव्हा आणि सद्य निश्चलनीकरणाच्या कारवाईच्या वेळी. मात्र, या दोन्ही कारवायांत "स्वतःचा व पक्षाचा स्वार्थ बाजूला सारून देशाला पुढे नेणारा खंबीरपणा दाखविणे" हा मूळ मुद्दा असला तरी या दोन कारवायांत जमीन-अस्मानाचा फरक आहे. त्यामुळे, या दोन वेळांच्या परिस्थितीचे तुलनात्मक विश्लेषण करण्याचा मोह झाला आहे.

अर्थ- शबानाचा... आणि रोहिणीचाही !

लेखक आदित्य कोरडे यांनी रविवार, 25/12/2016 08:47 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या वडलांना जुने मराठी हिंदी इंग्रजी चित्रपट पाहण्याचा षौक फार. त्याकाळात त्यांनी खास त्यासाठी घरी VCR घेतला होता जेव्हा tv च काय फोनसुद्धा अक्ख्या चाळीत मिळून १-२ घरात असे व तो सार्वजानिक मालकीचा मानला जात असे. ते स्वतः निरनिराळे जुने सिनेमे आणून बघत आणि मलाही दाखवत, त्यांच्यामुळे मला खूप चांगले चांगले सिनेमे बघायला मिळाले . एकदा त्यांनी असाच " अर्थ" हा महेश भट्ट चा सिनेमा आणला ८ वी मध्ये असेन मी त्यावेळी. सिनेमा बरा वाटला. बाबा म्हणाले,काय कळलं हा सिनेमा पाहुन.

कर्मयोगी श्री एकनाथजी रानडे- भाग २ कार्य

लेखक आर्या१२३ यांनी शनिवार, 19/11/2016 21:31 या दिवशी प्रकाशित केले.
एकनाथजी रानडे यांचे कार्य शिलास्मारकाची कथा एकनाथजींच्या आत्मचरित्रापासून वेगळी करणे अशक्य आहे. ज्यांनी प्रत्येक अडथळा संधीमध्ये परिवर्तित केला, प्रत्येक आव्हानाचे रूपांतर विजयात केले, अश्या असामान्य व्यक्तित्वाचे गुण सांगणे एका छोट्या लेखात शक्य नाही. तरीही हा छोटासा प्रयत्न: अशी कोणतीही समस्याच नव्हती त्यावरचा उपाय त्यांच्याजवळ नव्हता, त्यांचे स्वतःचे शब्दच द्यायचे तर ," प्रत्येक डावपेचाला प्रति-डावपेच, प्रत्येक शस्राला प्रतिशस्त्र असतेच ", या सत्याने समग्र दर्शन, निवारण होणारच अशा अडचणीतून एकनाथजींनी कसा मार्ग काढला यातून होते.

व्हेंन्टीलेटर

लेखक नाखु यांनी सोमवार, 07/11/2016 09:35 या दिवशी प्रकाशित केले.
स्थळः बागेच्या दाराशी असलेली नेहमीची भेळेची गाडी.

{मोस्ट एलिजिबल संपादक...२०१७ }

लेखक अभ्या.. यांनी मंगळवार, 01/11/2016 13:00 या दिवशी प्रकाशित केले.
पेर्णा "याड लागलं, याड लागलं" अशा फॉरिन ऑर्केस्ट्रासहीत मोबाइलची रिंग वाजली. नंबर कोणाचा असावा असा विचार करीत असतानाच लक्षात आलं, सुरवातीला‘०७१५२’ आणि शेवटी डबल झीरो… अरे हा तर वर्ध्यावरुन आलेला, म्हणजे विदर्भातील दिसतोय. सोन्याबापू तर आला नाही ना सुट्टीवर? का कुणा विदर्भवासीवर अन्याव झाला आता? ‘हॅलो…’ आता कुणा टिपिकल वर्‍हाडी हेल कानावर पडणार म्हणून आनंद झाला. ‘हॅलो, आभ्या बोलून राह्यला का बे?’ – नावाची एवढी वाट लावली म्हणजे रिलेटिव्हपैकी कोणीच नाही.