बदमाश अँथनी स्मिथ भाग २
शिवाजी महाराजांच्या सुरतच्या लुटीच्या कारवाईची मोहीम
पाद्री रेव्हरंड एल इस्कालियट एका पत्रात म्हणतो, 'अँथनी स्मिथ सुटून आल्यावर सांगत असे कि काय आणि किती लूट केली होती शिवाने. तो म्हणाला, मी पाहिलं ना, अश्शा थप्प्या लागल्या होत्या पैशांच्या राशींच्या! २० - २५ (हंड्रेड थाउजंड) लाख तरी रोकड लुटले रोकड! शिवाय ३०० हमालांकरवी मोठ्या पिशव्यात, पोत्यात हिरे, मोती, माणके, असे जड जवाहिरे गच्च भरायच्या कामाला लागले होते त्यांचे सैनिक. विरजी व्होरा, जो त्या वेळी जगातला सर्वात श्रीमंत व्यापारी होता त्या एकट्या कडून ८० लाखाचा माल जप्त केला होता.
मिसळपाव