Skip to main content

समीक्षा

शिवाय

लेखक समीर_happy go lucky यांनी रविवार, 30/10/2016 17:46 या दिवशी प्रकाशित केले.
अभिनेता अजय देवगण हे आता दिग्दर्शक बनले असून कारकिर्दीतील या नव्या टप्प्यात प्रेक्षकांसाठी एक नवीन कलाकृती घेऊन आले असून, शिवाय हे त्याचे नाव. कोणत्याही नवीन दिग्दर्शकाची पहिली कलाकृती जेंव्हा प्रेक्षक बघायला जातात तेंव्हा दिग्दर्शकांचे मूळ कल्पनेशी\कहाणीही\कन्सेप्टशी एकनिष्ठ राहण्याच्या प्रयत्नात कहाणीची होणारी वाताहत हा एक कॉमन सिन असतो.

ये दिल है मुश्किल - रिव्यू (स्पॉईलर सहित)

लेखक साहना यांनी रविवार, 30/10/2016 14:01 या दिवशी प्रकाशित केले.
मी नवीन हिंदी चित्रपट पाहत नाही पण एका आप्ताने दिवाळी निमित्त प्रायव्हेट स्क्रीनिंग साठी बोलावले असल्याने जावे लागले. म्हणून हा चित्रपट पहिला गेला. रेड सिग्नल तोडल्यावर जसे काही वेळ वाईट वाटते तसे वाटत आहे. चित्रपटाची सुरुवात रणबीर कुणाशी तरी मुलाखत देत आहे असे वाटते. नंतर एका क्लब वर फोकस. क्लब मध्ये अनुष्का पाहिली आणि थेट दुसरा सिन पलंगावर प्रणयकीडा करताना. हा क्लीशे इतका मूर्खपणाचा आहे ! पण असुदे. पण थोडक्यांत रणबीर चा प्रणय प्रसंग फेल ठरतो आणि अनुष्का त्याची फार थट्टा उडवते.

(ओम नमः) शिवाय

लेखक तिमा यांनी शनिवार, 29/10/2016 21:00 या दिवशी प्रकाशित केले.
हिन्दी चित्रपट बघायच्या बाबतीत मी फार चोखंदळ आहे. सहसा परीक्षण वाचल्याशिवाय पहात नाही. तरीही कित्येकदा अपेक्षाभंग होतोच. तर नेहमीच्या पद्धतीला फाटा देऊन एकतरी अ‍ॅक्शन चित्रपट, परीक्षण न वाचता, कुठलाही पूर्वग्रह न ठेवता पहायचा असे ठरवले होते. त्यामुळे 'शिवाय' ची जाहिरात बघितली आणि सरळ तिकीटेच बुक केली. नरकचतुर्दशीच्या सुमुहूर्तावर थेटरात स्थानापन्न झालो. रिकाम्या खुर्च्या मनांत धडकी भरवत होत्या. पण एकदा चित्रपट सुरु झाला आणि आम्हाला, दर क्षणाला, साक्षात त्या भगवान शंकराचे दर्शन होऊ लागले. अजय देवगण हा साक्षात 'शिवाय' म्हणजे शंकराच्या रुपात हिमालयाच्या उंच शिखरांमधे लीलया बागडत होता.

'संघ' टन - एक प्रवास

लेखक नर्मदेतला गोटा यांनी गुरुवार, 27/10/2016 14:04 या दिवशी प्रकाशित केले.
मनुष्य संघटना का स्थापन करतो याचे कारण साधे आहे. त्याला त्याच्या किंवा आपल्या समाजाच्या कमकुवतपणाची जाणीव होते म्हणून. चार लोक जोडल्यानंतर एक शक्ती निर्माण होइल अशी त्याची अपेक्षा असते. हे संघटन समाज लगेच स्वीकारेल अशी स्थिती नसते. त्याला स्वतःसाठी लोकांच्या हृदयात जागा निर्माण करावी लागते. प्रसंगी इतरांना "थोडे सरकून घ्या" असे सांगावे लागते. तरच जागा निर्माण होते. सुरुवातीच्या काळातली आव्हाने वेगळी आणि नंतरच्या काळातली आव्हाने वेगळी असतात. सुरुवातीला संघर्ष इतरांबरोबर असतो. प्रतिकूलतेबरोबर असतो. निधी आणि साधनांचा अभाव असतो.

उंबरठा!

लेखक आदित्य कोरडे यांनी रविवार, 23/10/2016 21:32 या दिवशी प्रकाशित केले.
उंबरठा! गंजल्या ओठांस माझ्या, धार वज्राची मिळूदे आंधळ्या आत्म्यात माझ्या सूर्य सत्याचा जळू दे ... चांगला सिनेमा कोणता ? मनोरंजन हाच एक निकष मानला तर कुठलाही तद्दन गल्लाभरू सिनेमा चांगला असू शकतो. तसा तो खिडकीवर मोठा गल्ला जमा करून सिद्ध करत असतोच आणि याच कारणावरून बहुसंख्य सिने-निर्माते अशाच प्रकारचे सिनेमे बनवत असतात . पण म्हणून अशा सिनेमांना आपण हिट सिनेमे म्हणतो, चांगले म्हणतोच असे नाही. चांगला सिनेमा हिट असो नसो एक गोष्ट खरी कि त्याने उत्तम मनोरंजन केलेच पाहिजे. पण मला असं वाटतं कि तेवढेच पुरेसे नाही.

धोनी - ऐसी न कोई होनी

लेखक विअर्ड विक्स यांनी गुरुवार, 20/10/2016 00:48 या दिवशी प्रकाशित केले.
सतीश राजवाडेंचा प्रेमाची गोष्ट चित्रपट पहिला असेलच !!! त्यात राजवाडेंचा एक संवाद आहे चित्रपटाचे शीर्षक कसे क्लिअर पाहिजे त्यातून लोकांना कोडी घालत बसू नयेत. " एम. एस . धोनी - the untold story " हे शीर्षक चित्रपटाला साजेसेच आहे. ह्या चित्रपटात " मेरे नाम में भी महम्मद है " वा " किसीको इतना भी मत डराओ ....

जाऊं द्याना बाळासाहेब : वेगळ्या वाटेवरच्या माणसाची अर्धवट गोष्ट

लेखक महासंग्राम यांनी रविवार, 09/10/2016 20:31 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, रसिक मायबापहो चित्रपट हे कायम समाजाचं प्रतिबिंब दाखवतं असं कोणत्या तरी महान माणसाने म्हंटल आहे आणि काही प्रमाणात हे खरंही आहे. 'देऊळ', 'वळू' मधून ग्रामीण जीवनाची झलक दाखवत वेगळे विषय हाताळणार्या गिरीष कुलकर्णीनी यावेळेस थोडा वेगळा पण गावाशीच निगडित असणारा असाच विषय 'जाऊं द्याना बाळासाहेब' मधून मांडला आहे . पैशामुळे येणारी बेफिकीर प्रवृत्ती , गावमधली जाती पातीची उतरंड, फ्लेक्स संस्कृती यासर्वांवर केलेलं खुसखुशीत भाष्य म्हणजे 'जाऊं द्याना बाळासाहेब'.

Please, Look After Mom!

लेखक शिव कन्या यांनी मंगळवार, 20/09/2016 22:49 या दिवशी प्रकाशित केले.
Please, Look After Mom ही Kyung-sook Shin या कोरियन लेखिकेची कादंबरी नुकतीच वाचनात आली. कादंबरीच्या नावातच तिचा कथा विषय, आई, ठळकपणे सूचित होतो. खरंतर आई या विषयावर विपुल लेखन झालेले आहे.

'सोनाली केबल'..

लेखक अनिरुद्ध प्रभू यांनी मंगळवार, 20/09/2016 15:25 या दिवशी प्रकाशित केले.
कमी बजेटच्या, जास्त मोठे चेहरे नसलेल्या चित्रपटांमधे बर्‍याचवेळा काहिना काही वेगळं बघायला मिळालयं. मग यारा सिलि सिली असेल किंवा डिअर डॅड. असे बरेच चित्रपट, त्यांचे विषय, त्यांना मांडणारे लेखक-दिग्दर्शक अगदीच नवखे असल्यानं त्यांच बजेट किंवा त्यांची जाहीरात, प्रसिद्धी या सर्व बाबतीत इतर बड्या बॅनर्सपेक्षा बर्‍याच मोठ्या प्रमाणात मागे राहतात. पण त्यांच्यामधे एक वेगळेपण असतं. याच पठडीतला गेल्या वर्षी प्रदर्शीत झालेला चित्रपट म्हणजे...'सोनाली केबल'.. मुंबईत आपला केबलचा व्यवसाय सांभाळताना अचानक शायनिंग केबल सारखी मोठी कंपनी आपला व्यवसाय गिळु पाहतेय हे कळल्यानंतरचा प्रवास म्हणजे सोनाली केबल.

रंजीश ही सही ...

लेखक ज्याक ऑफ ऑल यांनी रविवार, 18/09/2016 23:11 या दिवशी प्रकाशित केले.
आज खूप दिवसांनी "रंजीश-ही सही " ही मेहंदी हसन साहेबांची अजरामर गज़ल ऐकायचा योग आला . "गज़ल" .. खरं तर हा असा गायन प्रकार आहे की हा न आवडणारा प्राणी विरळाच सापडेल . मग ती जगजीत ची "तुम इतना जो मुस्कुरा रहे हो " असो किंवा अगदी अलिकडची हरिहरन ची "मरीज-ए- इश्क " असो . गज़ल हा प्रकारच गारुड करणारा आहे . तर अश्या अनेक गझलांपैकी एक अत्यंत आवडणारी गज़ल म्हणजे अहमद फराज साहेबांची "रंजीश ही सही ". अहमद फराझ यांच्या तशा खूपश्या गज़ल , रचना अत्यंत सुरेख आहेत. पण अत्यंत लोकप्रिय अशी म्हणावी ती ही गज़ल. ओघवतं काव्य अत्यंत सोपी सुरेख मांडणी , समजायला सोपं आणि एक "कशीश” असलेलं लेखन म्हणजे अहमद फराज.