Skip to main content

समीक्षा

मी पाहिले ..मी पाहिले

लेखक सिरुसेरि यांनी मंगळवार, 22/05/2018 21:40 या दिवशी प्रकाशित केले.
मी पाहिले ..मी पाहिले या कथेतील एक नायक एके काळी भारतीय सैन्यात मेजर पदावर असलेला . एका धाडसी मोहिमेच्या वेळी स्फोटात जखमी झाल्याने त्याला आपला एक पाय गमवावा लागतो . नाईलाजाने आपल्या गावात परत येउन तो शेती व्यवसायात जम बसवतो. तरिही मनात कुठेतरी मुख्य प्रवाहापासुन वेगळे पडल्याचे दु:ख त्याच्या मनात आहेच . हे दु:ख आपल्या शेती कामातुन , तर कधी पिण्यातुन तो झाकुन टाकत असतो . पण कधी ना कधी त्याच्या बोलण्यातुन मनातला कडवटपणा बाहेर पडतोच . अजुनही त्याला बरेचजण आदराने मेजर या नावानेच ओळखतात . कथेतील दुसरा नायक आहे मनोहर . शहरातील प्रसिद्ध उद्योजक असलेल्या श्रीमंत आई बाबांचा एकुलता एक मुलगा .

न्यायाधीश बरखास्ती आणि राज्यसभेची जटील अव्यवस्था

लेखक माहितगार यांनी मंगळवार, 24/04/2018 13:09 या दिवशी प्रकाशित केले.
राज्य सभा , बरखास्ती प्रस्ताव आणि काही वेगळे प्रश्न या महिन्यात भारताच्या सर्वोच्च न्यायाधिशां विरुद्ध बरखास्तीचा प्रस्ताव राज्यसभेतील जवळपास ६५ खासदारानि राज्यसभा अध्यक्ष (उपराष्ट्रपती) व्यंकय्या नायडू यांच्या कडे पाठवला तो राज्यसभा अध्यक्षांनी फेटाळला आहे तूर्ततरी दिसते . एकंदर प्रकाराबद्दल मला काही जरासे वेगळे प्रश्न पडले . राज्यसभा हे भारतीय संसदेच वरीष्ठ सभागृह.

आम्ही दोघीच्या निमित्ताने

लेखक पारा यांनी मंगळवार, 17/04/2018 18:20 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्ण बघताना कंटाळा आला नाही म्हणजे चित्रपट आवडला असं समजायचं का? की चित्रपटाच्या व्यक्तिरेखांच्या आयुष्यात जे घडतं त्याने तुम्हाला फरक पडला तर त्या चित्रपटाचा प्रभाव पडला असं म्हणता येईल? आम्ही दोघी तसं काहीच करत नाही. कुठल्याच व्यक्तिरेखेशी मी समरस होऊ शकलो नाही. प्रिया बापट आणि तिच्या बाबांमधला असंवाद मला कुठेच स्पर्श करून गेला नाही. त्या दोन्ही व्यक्तिरेखा कोरड्या आणि प्लास्टिकच्या वाटल्या मला. नाही म्हणायला मुक्ता बर्वेचा संयत अभिनय थोडा कुठे मनाला भिडतो, पण तिचा रोल तसा फार नाहीच. गावाकडच्या एका मुलीचं बेअरिंग ती पहिल्या सीनला जे पकडते ते अगदी शेवटपर्यंत.

फापटमुक्त तर्कसुसंगत रामायण , चर्चा भाग -१

लेखक माहितगार यांनी बुधवार, 04/04/2018 14:18 या दिवशी प्रकाशित केले.
* लेखात मांडलेले काही विचार तर्कसुसंगत असले, आणि लेखनाचा उद्धेश चांगला असला तरीही गैरसमज करून घेण्यास वेळा लागत नाही, त्यामुळे दोन्ही टोकांच्या व्यक्तींना काही मांडणी अवघड जाऊ शकतात. ज्यांच्या भावना वगैरे दुखावणारा नाहीत, आणि विचाराला विचाराने प्रतिवादावर विश्वास असेल अशांनीच पुढे वाचण्याचा विचार करावा इतरांनी टळावे हि नम्र विनंती . . * ज्यांना लेखाची लांबी खुपते त्यांच्यासाठी माझा लेखनाचा उद्देश संक्षेपाने शेवटच्या परिचछेदात दिला आहेच .

माध्यमांतर– "एपिक" धर्मक्षेत्र: द्रौपदी एपिसोड!

लेखक निमिष सोनार यांनी मंगळवार, 06/03/2018 17:04 या दिवशी प्रकाशित केले.
सूचना: आरंभ या जानेवारी २०१८ पासून सुरु झालेल्या ई-मासिकातील फेब्रुवारी अंकातील माझा हा अभिनव प्रयोग - माध्यमांतर! खास येथे मिसळपाव वाचकांसाठी देत आहे!) टीव्ही एपिसोड लिखित स्वरूपात म्हणजे माध्यमांतर!

श्रीदेवी जाते जिवानिशी

लेखक कुमार जावडेकर यांनी सोमवार, 05/03/2018 14:52 या दिवशी प्रकाशित केले.
श्रीदेवीच्या आणि आमच्या वयात तसं बर्‍यापैकी अंतर होतं. आम्ही महाविद्यालयात प्रवेश करेपर्यंत श्रीदेवीचा 'मिस्टर इंडिया' आणि (आपल्या) माधुरीचा 'तेज़ाब' येऊन गेले होते. त्यामुळे तिच्या घडलेल्या 'जुदाई'मुळे आम्हीं जरी हळहळलो असलो, तरी त्याचा फारसा 'सदमा' आम्हांला पोहोचला नाही आणि जखम भळभळली नाही. नव्वदीत श्रीदेवीला सोडून (किंवा धरून) अनिल कपूरनं (आपल्या) माधुरीला हिरॉईन केलं याचा मात्र राग आम्हीं मित्रा-मित्रांमधे चांगलाच आळवला / चघळला होता. एकीकडे श्रीदेवीचे 'लम्हें', 'खुदागवाह',लाडला' वगैरे बघणं न थांबवता...

रावणायन कादंबरीचा थोडक्यात आढावा

लेखक निमिष सोनार यांनी गुरुवार, 22/02/2018 11:36 या दिवशी प्रकाशित केले.
इंद्रायणी सावकार यांचे रावणायन नुकतेच वाचून झाले. मला आवडले. खूप छान आहे. आपण सुध्दा जरूर वाचावे. एक वेगळीच अनुभूती आपल्याला हे पुस्तक वाचून मिळेल. रावणाबद्दल एरवी माहिती नसलेल्या गोष्टी तर कळतीलच पण वाली सुग्रीव आणि तारा यांच्यातील खूपच पराकोटीच्या गुंतागुंतीच्या प्रेम त्रिकोणाचे अद्भुत आणि सतत दोलायमान होणारे खेळ यात वाचायला मिळतील. तसेच तारा आणि मंदोदरी यांच्यातील मैत्रीची कथा या यात प्रकर्षाने पुढे येते. रावण मंदोदरी यांची प्रेमकथा आणि प्रेम विवाह कसा झाला हे सुध्दा यात आपल्याला कळते.

मराठी मालिकांची लेखनकृती

लेखक वनफॉरटॅन यांनी मंगळवार, 20/02/2018 15:57 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वतयारी: १. अगदी हार्डकोर ममव असणं, आणि मराठी मालिकाविश्वात लागेबांधे असणं गरजेचं. चांगला शब्दसंग्रह, चांगली भाषा इत्यादी फुटकळ गोष्टी नसल्या तरी चालतील. फ्रेशर्सना प्राधान्य. आधी काही दर्जेदार लिहीलं असेल तर ह्या वाटेला जाऊ नये. हा लेखप्रकार फक्त मधल्या वेळचं/संध्याकाळचं ह्यात येतो. विचारप्रवर्तक वगैरे हवं असेल तर स्वत:चा कल्ट पहिले काढावा. तुमचे अनुयायी आपोआप तुमच्या लेखनाला 'युगप्रवर्तक' पर्यंत नेऊन पोहोचवतील. २. लक्ष्य रसिकवर्ग निवडावा. महाराष्ट्रात दोनच असतात. एक म्हणजे मुंबईपुणेकर आणि दुसरे नॉन-मुंबईपुणेकर.

पुस्तक परीक्षण: "असा होता सिकंदर"

लेखक निमिष सोनार यांनी गुरुवार, 01/02/2018 18:52 या दिवशी प्रकाशित केले.
पुस्तक परीक्षण: "असा होता सिकंदर" लेखिका: इंद्रायणी सावकार रिया पब्लिकेशन अजब डीस्ट्रीब्युटर्स सूचना: अलेक्झांडर = सिकंदर पोरस = पुरू = पुरुषोत्तम = पौरव देशाचा राजा चाणक्य = कौटिल्य = विष्णुगुप्त परीक्षण: नुकतेच "असा होता सिकंदर" हे पुस्तक मी वाचून पूर्ण केले. लेखिका "इंद्रायणी सावकार" यांची "लेखनशैली" काय वर्णावी? एकदम अद्भुत अशी शैली! कठीण आणि क्लिष्ट असलेला इतिहास विषय आणि त्यातल्या त्यात अलेक्झांडर सारख्या जगप्रसिद्ध प्राचीन ग्रीक व्यक्तिमत्वाबद्दल लिहायचे म्हणजे एक आव्हान होते पण इंद्रायणी यांनी कमाल केली आहे.

काही चित्रपटीय व्याख्या

लेखक फारएन्ड यांनी सोमवार, 29/01/2018 21:22 या दिवशी प्रकाशित केले.
हे एक आमचे संशोधन, खास जनहितार्थ. गाणी, संवाद वगैरे ऐकताना लोकांना असे प्रश्न पडतात की तेरी मैफिल मे म्हणजे नक्की कोठे. तेथे ही माहिती उपयोगी पडेल. गेल्या काही दिवसांत वाचकांनी "प्रेमात पडल्यावर सजदे नक्की कधी करतात?", "तिच्या मैफिलीत जायचे आहे. काय तयारी करून जाऊ?", "जानेजा जास्त भारी की जानेजहॉ?" असे अनेक प्रश्न विचारले. म्हणूनच हा लेखप्रपंच. तर काही गाण्यांमधून व डॉयलॉग्ज मधून नेहमी ऐकू येणार्‍या शब्दांच्या व्याख्या. फूटी कौडी: प्रत्यक्षात जी देणार्‍याकडे नसते. घेणार्‍याला नको असते. तरीही ती मिळणार नाही अशी देणारा धमकी देतो, अशी जगातील एकमेव गोष्ट.