साखर खाल्लेला माणूस - एक शुगरकोटेड ब्लॅक कॉमेडी अर्थात एक प्रसन्न नाट्याविष्कार
विलास व माधवी देशपांडे हे एक मध्यमवर्गीय जोडपं. यांना २२-२३ वर्षांची ऋचा ही एकुलती एक मुलगी. ती जाहिरात क्षेत्रात पाय रोवण्यासाठी धडपडतेय. विलास एका खाजगी विमा कंपनीत व्यवस्थापक आहे. जास्त वेतनाच्या अपेक्षेमुळे सरकारी नोकरी सोडून तो खाजगी क्षेत्रात आला आहे. लठ्ठ वेतनाबरोबरच तिथे असलेले विक्रीचे चढते लक्ष्य, व्यवसायवृद्धीची जबाबदारी, त्यामुळे येणारे ताणतणाव या सर्वांचा त्याच्या प्रकृतीवर व वागणुकीवर परीणाम झाला आहे. त्यामुळे त्याचा स्वभाव बराचसा चिडचिडा व उतावळा झाला आहे. कामाबरोबरच येणार्या दारू पार्ट्या, धूम्रपान, जागरणे याने तो त्रस्त आहे.
मिसळपाव
एखाद्या चित्रपटाचे परीक्षण लिहिताना आपण दोन प्रकारे ते काम करू शकतो
१. त्या चित्रपटाची कथा, त्यातली कला, दिग्दर्शन, त्यातल्या नटांचे अभिनय इ. ह्यांचे विश्लेषण, रसग्रहण किंवा अगदी चिरफाडही आणि
२. त्या चित्रपटात आलेल्या विषय वस्तूचे, मांडलेल्या विचार, तत्वज्ञानाचे - ऐतिहासिक, सामाजिक. धार्मिक किंवा तदनुषंगिक इतर प्रकारे विश्लेषण.