आज रात्री अन् उद्या सकाळी मी नेटवर येऊ शकणार नाही.
म्हणून एक दिवस आधीच हा (कविता) प्रपंच!!
प्रकाशाशी जुळावं नातं,
अंधारातही प्रकाश व्हावा,
क्षितिजावरल्या उषेसमवे,
अंधार सारा दूर सरावा!
पानांवरले दवबिंदू ते,
प्रकाशानं तेजाळावेत,
जीवनात तुम्हा सगळ्यांच्या,
त्या दवबिंदुंसम,
लक्ष-लक्ष सूर्य उजळावेत!!
पणत्यांच्या शांत, संयमी अन् मंगल तेज सगळ्यांस स्फुर्तीदायी-आनंददायी व्हावे हीच सदीच्छा! तुम्हा सगळ्यांस दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!!
आपला,
मुमुक्षु