मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

प्रतिसाद

पुनेरि पाथ्या

सुधिर ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
आज आपन सर्व पुनेकराचा आवदिच विशय इथे घेत आहोत तो मन्जे पुनेरि पत्या "हि इमारत रन्ग्वन्याचे काम कुनालाही दिलेले नहि तरिहि पिच्कारि मारुन आपन इमारत रन्गवलि तर त्याचे गाल आम्हि रन्गउ शकतो"

गणपती विसर्जन सोहळा - पुणे

मिंटी ·
लेखनविषय:
नमस्कार मंडळी..... आत्ताच काही दिवसांपुर्वी गणपती विसर्जन सोहळा पार पडला. आपण सर्वांनी आपल्या लाडक्या गणरायाला साश्रु नयनांनी भावपुर्ण निरोप दिला. पुण्यातला गणपती विसर्जन सोहळा हा सर्वश्रुत आहे तो त्याच्या भव्यतेमुळे. याच सोहळ्याची काही क्षणचित्रे मी आज इथे देत आहे. तुम्हाला ती आनंद देतील अशी आशा करते. मानाचा पहिला गणपती - कसबा गणपती मानाचा तिसरा गणपती - गुरुजी तालिम

जाम कोणी देइ

धनंजय ·
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
******************** * जाम कोणी देइ अव्हेरू नये चुंबनाला "ना" कधी सांगू नये * खाक जाळे दु:ख मोठे थेंबही एकही थेंबा कधी सांडू नये * भेटता तू स्वर्ग भेटे या इथे या क्षणाला दृष्ट मी लावू नये * काल 'हो' अन् आज 'नाही' सांगणे काळजाशी खेळ हे खेळू नये * घोट घेता घात करिते वारुणी तीत मेलेल्या पुन्हा मारू नये * वेगळी काही नशा होते जया जाहिदाचे नाव त्या देऊ नये * ********************

रॉक ऑन च्या निमित्ताने..

भडकमकर मास्तर ·
लेखनविषय:
हे खरंतर केवळ सिनेमाचं परीक्षण नव्हे..... मला आवडला , तुम्ही बघा असं आणि इतकंच ही नव्हे... सिनेमा पाहताना त्यापेक्षा काही जास्त जाणवत होतं ते सांगावंसं वाटतंय म्हणून हे थोडंसं लेखन. आधी गोष्ट सांगतो.... अगदीच थोडक्यात सांगायचं तर दिल चाहता है सिनेमामध्ये झंकार बीट्स सिनेमा मिक्स केला तर रॉकऑन तयार होतो. मॅजिक नावाचा रॉक बँड चालवणार्‍या चार मित्रांची ही गोष्ट .... आदित्य ( फ़रहान ) ,के.डी( पूरब) , रॉब ( ल्यूक केनी) आणि जो ( अर्जुन रामपाल) असे चौघे मित्र दहा वर्षांनंतर पुन्हा भेटतात.

आम्ही मराठी....

स्नेहश्री ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
नमस्कार आपण सर्वा मराठीप्रेमी नेहमी अभिमानाने सांगत असतो की आम्ही हे आणि आम्ही ते. पंण आपल्या बाबतीत हिंदी भाषा बोलण्याच्या बाबतीत मात्र आपण काहीवेळा मार खातो (अर्थात याला अपवाद असतात) आज सकाळी गाडी मध्ये एक-दोन किस्से ऍकायला मिळाले... तुमच्याकडे असतील तर तुम्ही ही सांगा... गीता नावाच्य मैत्रिणीने सांगितलेला किस्सा लै भारी होता... तिच्या येथे एका वाड्याचे इमारती मध्ये रुपांतर झाले होते. पण तिकडचे मालक मात्र एकदम साधेसुधे होते.त्यांचा रखवालदार एकदा आल्याआल्या झोपा काढत होता. तेव्हा ते त्याला बघुन चिडुन म्हणाले की "तुम आया बरोबर क्यो सोया था "......

हू एम आय!

प्राजु ·
"चांगला धुतला त्या शोएब ला धोनी ने" असे उद्गार बर्‍याच वेळेला ऐकायला वाचायला मिळतात. इथे हे उद्गार एक भारतीय एका पकिस्तानी बद्दल बोलत असतो. कित्येक वेळेला सहज गप्पांमधून जेव्हा जेव्हा आंतरराष्ट्रीय सिमा प्रश्न येतो तेव्हा तेव्हा पाकिस्तान बद्दल वाईटच बोललं जातं. पाकिस्तानातून होणारि घुसखोरी, मुशरर्फ सरकारचा ओसामाबीन लादेन ला असणारा पाठींबा, दाऊद इब्राहिम ला पाकिस्तानात राहण्यासाठी आश्रय देण्याच्या बातम्या यांनी भारतीय मनात पाकिस्ताना बद्दल एक अढी निर्माण झाली आहे. भारतीय सामान्य जनता ही पाक सामान्य जनतेचा विलक्षण तिरस्कार करते.

तांडव..

प्राजु ·
लेखनविषय:
दिव्य तांडव सुरू जाहले करूनी ललकार नित्य होती वार जैसे घुमे तलवार.. वीज नभी ची लखलख करिते ढगांवरी वार कडाडकडकड अभ्र कोसळे सोसूनी प्रहार जलौघ बरसे वायूसंगे होऊनी बेजार कडकड गडगड मेघ नादती करूनी चित्कार 'जलद' चालला बरसत धारा टाकीत फुत्कार कसा जाहला हिरवाईचा त्यासी साक्षात्कार युद्ध होते ग्रिष्माशी, तो होता ऐसा स्वार जाती धावूनी हाक देण्या, अवनीची पुकार रिक्त जाहले मेघ सारे गाऊनी मल्हार मृदगंधाने भारली सृष्टी देऊनी हुंकार जिंकले ते युद्ध ऐसे झाला जयजयकार मंतरलेल्या सृष्टीमधूनी घुमला ओंकार.. - प्राजु

सुरेखा..

प्राजु ·
"वयनी, स्वयंपाक काय काय करायची सांगा लवकर?" साधारण सकाळी ९.३० च्या दरम्यान अशी विचारणा झाली की ओळखावं सुरेखा बाई आलेल्या आहेत. ही आमची सुरेखा म्हणजे कर्नाटक आणि कोल्हापूर(कोल्लापूर) याचं एक अजब मिश्रण आहे. आडनावने म्हणजे जातीने ही ९६ कुळी बरं का. पण आवाजाचा हेल सगळा कर्नाटकी आणि त्यातही विशेष म्हणजे लिंग, वचन हे सगळं धाब्यावर बसवून मराठी बोलणार. अशिक्षित, अडाणी. मध्ये मध्ये इंग्रजीचा खून पाडणारी. मी कॉलेजात असताना आमच्या बंगल्याच्या बांधकामाच्या कामावर वॉचमन म्हणून ही आणि तिचा नवरा रहात होते. घर बांधून झालं .पण वॉचमनची टपरी तशीच होती. आम्ही फेब्रुवारी मध्ये त्या घरात रहायला गेलो.

एक शून्य ......

अरुण मनोहर ·
लेखनविषय:
कवड्या तुझी धाव आहे शुन्या कडून शुन्या कडे पंच्याऐंशी वाचनांनंतरही नि:शब्द जालाचे कडे ऐकून होतो मायाजाली दुर्लक्षील्या जातो जो नडे समजती अनुभवांती वेडे सरळास लाभती वाकडे प्रतीसाद आभास मायावी असतील काही सत्यही थोडे का अट्टाहास करशी भूलीचा जाणूनी पाखरू दूर जाया उडे

(माउस)

बेसनलाडू ·
ओट्यावरती तुझ्या किती बघ घुटमळला माउस..! झाडू घेऊन आलो तरि ना अडखळला माउस..! मला न जमले ठोकायाला तेव्हा मिश्किल हसला, मनीपुढे पण स्वतः कसा बघ डळमळला माउस..! कधी उगाचच रुसला, आणिक माळ्यावरती दडला. रॅट किलर च्या गोळ्यांनी ना विरघळला माउस..! अवचित ताज्या गरम भज्यांचा गंध पसरला तेव्हा मित्रांसोबत बिळाबिळांतुन तळमळला माउस..! नव्यानव्या कवितांची लागण, विडंबनांची बाधा, कळफलकाच्या जोडीने मग सळसळला माउस..! घराघरांतुन निरोप घेई गणरायांची स्वारी. भिजून गेले डोळे, रडला, कळवळला माउस..! प्रेरणा: वृत्तातील लहानमोठ्या स्पीड ब्रेकर्ससकटच्या जमिनीवर बरसलेला अभिजीत दात्यांचा