Skip to main content

प्रतिक्रिया

रॉक ऑन च्या निमित्ताने..

लेखक भडकमकर मास्तर यांनी मंगळवार, 02/09/2008 01:21 या दिवशी प्रकाशित केले.
हे खरंतर केवळ सिनेमाचं परीक्षण नव्हे..... मला आवडला , तुम्ही बघा असं आणि इतकंच ही नव्हे... सिनेमा पाहताना त्यापेक्षा काही जास्त जाणवत होतं ते सांगावंसं वाटतंय म्हणून हे थोडंसं लेखन. आधी गोष्ट सांगतो.... अगदीच थोडक्यात सांगायचं तर दिल चाहता है सिनेमामध्ये झंकार बीट्स सिनेमा मिक्स केला तर रॉकऑन तयार होतो. मॅजिक नावाचा रॉक बँड चालवणार्‍या चार मित्रांची ही गोष्ट .... आदित्य ( फ़रहान ) ,के.डी( पूरब) , रॉब ( ल्यूक केनी) आणि जो ( अर्जुन रामपाल) असे चौघे मित्र दहा वर्षांनंतर पुन्हा भेटतात.

भीती वाटे कुणाला?

लेखक देवदत्त यांनी बुधवार, 27/08/2008 20:42 या दिवशी प्रकाशित केले.
'फूंक' चित्रपट थियेटर मध्ये एकट्याने बघणार्‍याला रामगोपाल वर्माने ५ लाख रूपये देण्याचे आव्हान दिले होते असे वाचण्यात आले. अशीच एक पैज एका इंग्रजी सिनेमाकरीता ठेवली होती असे लहानपणी ऐकले होते. तो कोणता सिनेमा त्याचे नाव आठवत नाही. त्यावेळीही सिनेमागृहाच्या बाहेर एक ऍम्बुलन्स ठेवली होती असेही सांगण्यात आले होते. आणखी एक चित्रपट, बहुधा 'The Exorcist'. ह्या सिनेमाबद्दलही असे ऐकले होते की हा सिनेमा बनवून झाल्यानंतर पाहताना ९ जण भीतीने मेलेत, त्यात स्वत: त्या सिनेमाच्या दिग्दर्शकाचाही समावेश आहे.

मसाज ... एकपात्री शब्दखेळ

लेखक भडकमकर मास्तर यांनी बुधवार, 27/08/2008 17:01 या दिवशी प्रकाशित केले.
मसाज ...विजय तेंडुलकरांचं हे नाटक.. रूढार्थानं हे नाटक नाही, किंवा एकपात्री प्रयोग म्हणावं तर तसाही नाही हा... ( याला एकपात्री शब्दखेळ असे नाव दिले आहे) हे नाटक पहायचा योग नाही आला, पण पुस्तक सापडलं म्हणून घेऊन आलो.... ज्या माणसाची ही कैफ़ियत तेंडुलकर मांडतात तो त्यांना खरंच भेटला होता आणि त्याचं आयुष्य पाहून त्यांना हे लिहावेसे वाटले....

सिंग इज किंग : शुद्ध व निखळ मनोरंजन नव्हे तर "फसवणुक" !!!

लेखक छोटा डॉन यांनी सोमवार, 25/08/2008 23:25 या दिवशी प्रकाशित केले.
. समजा तुम्ही अतिशय पट्टीचे खवय्ये आहात. चवदार व लजीज अन्न हा तुमचा विक पॉइंट आहे. बाजारात आलेली नवी "चटपटीत डिश" चाखण्यासाठी तुम्ही पैशाचा विचार करत नाही. तुम्ही स्वतःच्या खिशातले पैसे टाकुन खास "हॉटेलात" जाऊन त्या डिशचा आस्वाद घेता, कुठेतरी नेटवरुन त्याची पाककॄती उतरवुन हेऊन त्याचे घरगुती प्रयोग करुन पैसे वाचवण्याचा नतद्रष्टपणा तुम्ही करत नसता. योग्य मालाच्या व लायकीच्या पदार्थासाठी पाहिजेतेवढा पैसा मोजण्याची तुमची दानत व तयारी असते. पण तुम्ही सध्या आयुष्याच्या कंटाळवाण्या कालखंडातुन मार्गक्रमण करत आहात. काहीच तुमच्या मनासारखे होत नाही. जाईल तिकडे निराशा पदरी पडत आहे.

फाळणी

लेखक सौरभ वैशंपायन यांनी सोमवार, 25/08/2008 22:04 या दिवशी प्रकाशित केले.
११ जुलै रोजी मुंबईत रेल्वेमध्ये जे स्फोट होऊन २०० पेक्षा जास्त माणसं मारली गेली होती त्या नंतर दोन दिवसांनी मला ही कविता सुचली आहे. शक्य तितकं वास्तव मांडण्याचा प्रयत्न केलाय. दुर्दैवाने गेल्या २०-२५ दिवसांत अश्या घटाना घडात आहेत कि सुभाषबाबुंचे ३रे कडवे आपण खरच खुप सिरीअसली घ्यायला हवे. ----------------------------------------------- परवाच एका स्फोटात मेलो, पहिल्याच झटक्यात स्वर्गात गेलो, स्वर्गात जाण्याचा एकच कायदा होता, सरळ जगण्याचा हाच एक फायदा होता.

जे.के.रोलींग यांचे हार्वर्ड विद्यापिठातील अभिभाषण

लेखक लिखाळ यांनी बुधवार, 13/08/2008 20:02 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार ! अपयशाचे आनुषंगिक फायदे आणि कल्पनाशक्ती http://www.saptahiksakal.com/sapsakal/sapsakal/rightframe.html साप्ताहिक सकाळ मध्ये अनुवादित स्वरुपात आलेले, 'हॅरी पॉटर' या पुस्तकमालिकेच्या लेखिका जे. के. रोलिंग यांनी जगद्विख्यात हार्वर्ड विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात नुकतेच म्हणजे ५ जूनला केलेले, अभिभाषण माझ्या आजच वाचनात आले. ते भाषण अतिशय आशयपूर्ण आणि सुंदर आहे. मला ते परत परत वाचावे असे वाटले. आपण सर्वांनी ते वाचावे आणि आनंद घ्यावा.

बॅचलरांच्या मेळ्यामध्ये

लेखक बिनडोक बनी यांनी बुधवार, 13/08/2008 17:53 या दिवशी प्रकाशित केले.
बॅचलरांच्या मेळ्यामध्ये आम्ही वैवाही भाबडे. तुम्हा रुचेल का हो हे माझे मोडके तंगडे. तुम्ही शाल मखमली, आम्ही फाटके घोंगडे. का हो बायको घरात आम्हा म्हणते फावडे. जन्म स्वैपाकात गेला, अमुचे भांड्यांशी वाकडे. जशी समजून चाले ती आम्हांसी बोकडे. जरा चालवूद्या हात, जुळवितो माझे शब्द. लव्हमॅरेज अमुची कथा अगदिच नाही निर्बुद्ध. - बिनडोक बनी प्रेरणास्थान : अंकुश चव्हाण यांचा ज्ञानियांचा मेळ