Skip to main content

प्रतिक्रिया

मराठी बाणा...!

लेखक विसोबा खेचर यांनी बुधवार, 12/11/2008 17:17 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, आमच्या ब्लॉगवर गुगलच्या ऍडसेन्सकरता आम्ही अर्ज केला होता. तो अर्ज नामंजूर करणारे आम्हाला आलेले त्यांचे पत्र खालीलप्रमाणे.. Hello Chandrashekhar Ramchandra Abhyankar, Thank you for your interest in Google AdSense.

आनंद मना!

लेखक मनोजवम् यांनी मंगळवार, 11/11/2008 09:46 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो तसा मी या संकेतस्थळावर नवीनच! म्हणजे येउन बरेच आठवडे झाले...पण नुसतंच वाचन झालं...ते ही कधी कधी...सबबी भरपूर आहेत. पण त्यात वेळ न घालवता मुद्याचं सांगतो. आज ब-याच दिवसांनी पंडित कुमार गंधर्वांचे मनाला अल्लद भिडणारे आणि सुरांच्या हिंदोळ्यावर हेलकावे घ्यायला लावणारं अत्यंत तरल असं गाणं ऐकलं आणि जमेल तेवढयांना सांगावसं वाटलं. म्हणून हा खटाटोप. गाण्याचे बोलः "आज आनंद मना, मोरा जो पिया घर आया" मालकंसातली ही रचना. इथे गाण्याची फाइल जोडण्याची व्यवस्था असती तर जरुर पाठवली असती.

मराठीपणा

लेखक अरुण मनोहर यांनी रविवार, 26/10/2008 04:32 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या मिपामधे दोन विषयांवर भरपूर चर्चा वाचायला मिळाली आहे. पहिला विषय- राज ठाकरे ह्यांनी धसास लावलेला, मराठी प्रदेशात मराठी माणसांना नोकरी मिळण्यास प्राधान्य हवे हा. दुसरा शुद्ध, अशुद्ध भाषेचा. ह्या दोन्ही विषयांना जोडणारी एक बातमी इ सकाळवर वाचली. कर्नाटकात, मराठीपळ्या आणि कोननकल्ल गावात १७९७ सालापासून स्थायीक झालेली मराठी कुटूंबे. २०० वर्षे जुना बाज असलेली भाषा तिथे अजूनही वापरली जाते. मराठीपळ्यात १००% मराठी लोकसंख्या आहे.

मराठीपणा

लेखक अरुण मनोहर यांनी रविवार, 26/10/2008 04:31 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या मिपामधे दोन विषयांवर भरपूर चर्चा वाचायला मिळाली आहे. पहिला विषय- राज ठाकरे ह्यांनी धसास लावलेला, मराठी प्रदेशात मराठी माणसांना नोकरी मिळण्यास प्राधान्य हवे हा. दुसरा शुद्ध, अशुद्ध भाषेचा. ह्या दोन्ही विषयांना जोडणारी एक बातमी इ सकाळवर वाचली. कर्नाटकात, मराठीपळ्या आणि कोननकल्ल गावात १७९७ सालापासून स्थायीक झालेली मराठी कुटूंबे. २०० वर्षे जुना बाज असलेली भाषा तिथे अजूनही वापरली जाते. मराठीपळ्यात १००% मराठी लोकसंख्या आहे.

जागतिक मंदीवर अमेरिकेत २० देशांच्या नेत्यांची बैठक

लेखक घाशीराम कोतवाल १.२ यांनी शुक्रवार, 24/10/2008 12:32 या दिवशी प्रकाशित केले.
जगातील आर्थिक मंदीवर चर्चा करण्यासाठी २० देशांच्या नेत्यांची बैठक अमेरिकेत आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांनी आमंत्रित केली आहे. आमंत्रित 20 देशांच्या नेत्यांमध्ये पंतप्रधान मनमोहन सिंग यांचाही समावेश आहे. १५ नोव्हेंबरला वॉशिंग्टनमध्ये ही बैठक आहे. व्हॉईट हाऊसमध्ये ही बैठक होणार आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक ४ नोव्हेंबरला आहे. निवडणुकीनंतर या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे.

फक्त विचारच करा, खरे होवू नये अशी प्रार्थना करा

लेखक घाशीराम कोतवाल १.२ यांनी गुरुवार, 23/10/2008 13:56 या दिवशी प्रकाशित केले.
विचार करा (फक्त विचारच करा, खरे होवू नये अशी प्रार्थना करा) की जर महिला पुरुषांविरुद्ध आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर उतरल्या तर काय काय घडेल? त्याचा हा विनोदी आढावा.... पुण्यात महिलांची पुरुषांवर लाटणे फेक. अनेक पुरुष डोक्यावर टेंगुळ येवून जखमी. अनेक पुरुष घरी जायला घाबरत आहेत. अनेक दिवस ऑफिसातच मुक्काम ठोकून. काही पुरुषांना या आंदोलनाची आधीपासूनच कल्पना असल्याने ते पोळपाट बॅगेत लपवूनच ऑफिसला निघाले होते.

६० वर्षांची 'ड्रीम गर्ल'

लेखक विजुभाऊ यांनी गुरुवार, 16/10/2008 14:55 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रानो या गोष्टीवर विष्वास बसत नाहिय्ये. पण आपली ड्रीमगर्ल हेमा मालिनी चक्क ६० वर्षांची होत्येय. अजूनही ती तितकीच सुंदर दिसते. तिच्या वयाच्या तारका आत्ता आज्जी झाल्यात. त्यांच्याकदे पाहुनही असे वातत नाही की खंडहरों से पता चलता है के कभी इमारत बुलंद हुवा करती थी. ऐन उमेदीची ती सर्वार्थाने ड्रीमगर्ल होती. मध्यम वय तीने सहजतेने स्वीकारले. ( आठवा तिच्या मुलीबरोबर जेट सुगंधी मॅट्ची जहिरात ) बिजवर माणसाशी लग्न केले त्याने समाजात तीला कधीच स्वतःबरोबर वागवले नाही. त्याची कोणतीही तमा खन्त न ठेवता तीने आपल्या मुलीना मोठे केले.

मिसळपाव आणि साबूदाण्याची लापशी

लेखक आनंद घारे यांनी बुधवार, 15/10/2008 02:15 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबईहून न्यूयॉर्कला केलेल्या विमानप्रवासाबद्दल मी चार ओळी लिहिल्या होत्या तेंव्हा या लिखाणावर फारशी चर्चा होईल असे मला वाटले नव्हते. माझा तसा उद्देशही नव्हता. अमेरिकेला गेल्यानंतर तिथला एक मांडीवरला माझ्या तावडीत सापडला तेंव्हा तो कसा चालतो ते पाहण्यासाठी त्याच्याशी चाळा करता करता मिपाचे संकेतस्थळ हाती लागले. समर्थांच्या एका सुप्रसिद्ध ओवीच्या पहिल्या दोन चरणांवरून प्रेरणा घेऊन "जे जे आपणांसी कळावे, ते ते इतरांसी सांगून मोकळे व्हावे" असा विचार मनात आला आणि गारठलेली बोटे कीबोर्डावर बडवून घेतली.