Skip to main content

प्रतिक्रिया

नटवर (लोकल गोष्टी-१)

लेखक स्वाती फडणीस यांनी शनिवार, 12/07/2008 14:56 या दिवशी प्रकाशित केले.

नटवर
.

लोकल मधला २ क्लासच्या डबा तुमच्या पैकी बर्‍याच जणांना परिचित असेल.
सेकंड क्लास आणि तो ही लेडीज सेकंड क्लास म्हणजे ...गडबड- गोंधळ, भांडण बाचाबाची, सड्या-डागांची चौकशी व घर, नवरा, मुलं यांच्याशी जोडलेली गार्‍हाणी. त्यात मधून फिरणारे फेरी वाले आणि गोंधळामुळे बावचळून गेलेल्या लहान मुलांची चिरचिर, :D या सगळ्याला छेदणारी एक हास्याची लकेर हे त्याचं वरवर दिसणार रूप, पण या वातावरणात आपला प्रवेश झाला की मग आपल्याला त्यांतील आणखीनं पात्रे कळू लागतात. त्यांच्या भूमिका पाहताना सगळ्या गर्दी गोंगाटाचा विसर पडतो, निदान मला तरी!.

पौराणिक कथांवरील नवीन मालिकांविषयी थोडंसं...

लेखक देवदत्त यांनी मंगळवार, 08/07/2008 02:07 या दिवशी प्रकाशित केले.

सध्या वेगवेगळ्या वाहिन्यांची पौराणिक कथांवर मालिका दाखविण्याची स्पर्धा सुरू आहे असे दिसते. साईबाबा, वैष्णोदेवी, हनुमान, रामायण ह्या मालिका (आणि इतर भरपूर) सुरू आहेत. पुर्वी ह्या सर्व मालिकांची वेळ रविवार सकाळ असायची. त्याला पहिले कारण म्हणजे रविवारी सर्वांना सुट्टी असते आणि सकाळपासून लोक टीव्ही बघत असतात. तसेच दुसरे कारण म्हणजे आधी दाखविलेल्या रामायण, महाभारत, श्रीकृष्ण ह्या मालिकांचे यश असेल. असो, सध्या तरी त्या मालिका इतरवेळीही पुन्हा दाखविणे चालू होते.

सस्नेह निमंत्रण (ऋचा)

लेखक ऋचा यांनी सोमवार, 07/07/2008 11:04 या दिवशी प्रकाशित केले.

प्रति,
समस्त मिसळपाव.कॉम कुटुंबीय,

सप्रेम नमस्कार,

येत्या जुलै महिन्याच्या १२ तारखेस तुमचा मैत्रिण "ऋचा" विवाहबध्द होत आहे.
वैयक्तिकरित्या सर्वांनाच व्यक्तिशः भेटून निमंत्रण पत्रिका देणे केवळ अशक्य असल्याकारणे,इथेच आमंत्रण देत आहे.
कृपया हेच आग्रहाचे निमंत्रण समजुन ह्या विवाहसोहळ्यास उपस्थित राहून आम्हांस आपले शुभाशिर्वाद द्यावेत ही नम्र विनंती.

आपलीच,
ऋचा उपाख्य क्षितिजा

विवाहस्थळ : कोहीनूर मंगल कार्यालय, एरंडवणा
प्रभात रस्ता,गल्ली क्र. ८,
गरवारे कॉलेज समोर
पुणे-४

मुहुर्तः १२ जुलै-२००८
वेळः स. १० वा. १८ मि.

सस्नेह निमंत्रण

लेखक ऋचा यांनी सोमवार, 07/07/2008 10:39 या दिवशी प्रकाशित केले.

प्रति,
समस्त मिसळपाव.कॉम कुटुंबीय,

सप्रेम नमस्कार,

येत्या जुलै महिन्याच्या १२ तारखेस तुमचा मैत्रिण "ऋचा" विवाहबध्द होत आहे.
वैयक्तिकरित्या सर्वांनाच व्यक्तिशः भेटून निमंत्रण पत्रिका देणे केवळ अशक्य असल्याकारणे,इथेच आमंत्रण देत आहे.
कृपया हेच आग्रहाचे निमंत्रण समजुन ह्या विवाहसोहळ्यास उपस्थित राहून आम्हांस आपले शुभाशिर्वाद द्यावेत ही नम्र विनंती.

आपलाच,
ऋचा उपाख्य क्षितिजा

नको म्हणू रे मनुजा!

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शनिवार, 28/06/2008 23:36 या दिवशी प्रकाशित केले.

हाच ब्लॉग बरा का तोच ब्लॉग बरा ही कविता बरी की ती कविता बरी हा ज्याचा त्याचा चॉईस असतो. निर्मिती ही निसर्गाची मानवाला दिलेली देणगी आहे.निसर्गात सुद्धा व्हरायटी असते.पण कॉपी कधीच आढळणार नाही.दोन जुळ्या भावंडात सुद्धा किंचीत असा फरक असतो.हे निसर्गाकडून शिकण्यासारखं आहे.
अनुवाद झाल जरी तरी तो कॉपी कॅट नसावा. मराठीतला शब्दभांडार उघडून आपल्याला हवे तेव्हडे शब्द वापरायला-जसं माळावर बोंब मारायला पाटलाची परवानगी नको-तसं कहिसं इथे पण असावं नाही काय?
म्हणूनच म्हणतो,

वळु

लेखक राजस यांनी शुक्रवार, 27/06/2008 22:15 या दिवशी प्रकाशित केले.

वळु

बर्‍याच दिवसांनी मराठी चित्रपट बघण्याचा योग आला. खरे तर मराठी चित्रपट बघायला मला आवडते. मध्यंतरीच्या काळात सचिन व महेश कोठारे चे चित्रपट छान असायचे. परंतु त्यानंतर मराठी चित्रपट एकाच साच्यात अडकला तेंव्हापासुन तो नकोसा व्हायला लागला होता. श्वास पासुन ही परिस्थीती बदलायला लागली आहे.

लूज कंट्रोल...दीर्घांक ... एक परीक्षण / अनुभव

लेखक भडकमकर मास्तर यांनी बुधवार, 18/06/2008 17:25 या दिवशी प्रकाशित केले.

लूज कंट्रोल...

२००५ च्या सुदर्शन रंगमंचावर महाराष्ट्र कल्चरल सेंटर आयोजित दीर्घांक स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवणारं नाटक..

लेखक : हेमंत ढोमे
दिग्दर्शक : निपुण धर्माधिकारी
कलाकार : अमेय वाघ,हेमंत ढोमे,निपुण धर्माधिकारी, सुषमा देशपांडे
निर्मिती : समन्वय पुणे.

या नाटकाचा दीर्घांक मी जुलै २००६ मध्ये पाहिला. त्याचे नंतर दोन अंकी नाटक आले, पण ते जास्त काळ टिकले नाही. ते नाटक मी पाहिले नाही.मी आत्ता बोलणार आहे ते दीर्घांकाविषयी..

गंध ओला..

लेखक प्राजु यांनी शुक्रवार, 13/06/2008 13:22 या दिवशी प्रकाशित केले.

रानातल्या पाखरांची रूणझुण किलबील
वारा ओल्या गंधासवे घुमवीतो गूढशीळ

वळवाचा नादधुंद, मोतियांची गारपीट
धरा जणू मुग्धावते, वैशाखाचा आला वीट

दिप्तीमान वीजधार , मेघांचीही धडपड
दडे पाऊस भिजुनी, तुझ्या पदराच्या आड

निथळते रूप तुझे, रोमांचित देहसारा
केसातूनी वाहताती वितळल्या शुभ्र गारा

थेंब वेडा ओघळतो गालावरूनीया ओठी
ओठ माझे अधिर हे , तया टिपण्यासाठी

आसमंती वाहीला गं, सूरसाज पावसाचा
ओली तू अन ओला मी, क्षण हा संयमाचा