Skip to main content

प्रतिक्रिया

इकडची तिकडची खादाडी, अर्थात, अन्न हे पूर्णब्रह्म..!

लेखक विसोबा खेचर यांनी शुक्रवार, 23/01/2009 08:53 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मिपाकरहो, आंतरजालावर उत्तमोत्तम पाककृतींचे आज अनेक ब्लॉग्ज उपलब्ध आहेत. तिथे मुशाफिरी करतांना विविध पाककृतींनी नटलेला, खाद्य संस्कृतीची सुंदर उधळण करणारा असा एखादा ब्लॉग सहजच दृष्टीस पडतो आणि डोळ्याचं पारणं फिटतं, जीव तृप्त होतो! हे सदर केवळ अश्या ब्लॉगांसाठीच!

लेखकांचे मानधन (लेखाचा दुवा)

लेखक लिखाळ यांनी शुक्रवार, 09/01/2009 18:33 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, आजच साप्ताहिक सकाळ मध्ये एक लेख वाचला. श्री सुनील कर्णिक यांनी लिहिलेल्या लेखकाचं मानधन ४४ लाख रुपये या लेखात भारतीय लेखकांसाठी काही उत्साहवर्धक बातमी आहे. आंतरजालावर अनेक मराठी लेखक त्यांच्या कसदार आणि बहारदार लेखणीने लेखन करताना आपण पाहतो. त्यांना ही बातमी वाचून उत्साह यावा अश्या सदिच्छेने त्या लेखाचा दुवा दिला आहे. पुढेमागे आपल्या माहितीतल्या कुणाला असे लाखो रुपये लेखनासाठी मिळाले तर आपल्याला आनंदच होईल नाही का ? :) या लेखात लिटररी एजंट असा जो उल्लेख आहे, त्या बद्दल कुणाला माहिती आहे का?

भेट

लेखक प्रविनमौति यांनी गुरुवार, 08/01/2009 12:16 या दिवशी प्रकाशित केले.
आज अचानक ती भेटली, नेहमी सारर्खीच हसली, डोळ्यातूनच सारे काही बोलली, जाताना मात्र दुसर्याचे नाव लावणर्या , तिच्या डोळ्यातले माझेच पाणी लपवत गेली.

अण्णांना मानवंदना..

लेखक विसोबा खेचर यांनी शनिवार, 03/01/2009 17:12 या दिवशी प्रकाशित केले.
अण्णांना मानवंदना..! इच्छुकांनी वरील संस्थळावर येऊन अण्णांना लेखी मानवंदना देण्याचे करावे.. राष्ट्रपतींच्या हस्ते अण्णांना भारतरत्न हा किताब मिळाल्यावर वरील मानवंदनांचे संकलन करून त्या पुस्तकरुपाने अण्णांना देण्याची सदर संस्थळ चालकांची योजना आहे.. आपला, (भीमसेनभक्त) तात्या.

अंड्याची टरफले आणि बुटाची लेस

लेखक लिखाळ यांनी बुधवार, 24/12/2008 01:35 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतीच फुटलेली अस्ताव्यस्त पसरलेली अंड्याची टरफलं आपले अनुभव असेच काहीसे निष्कर्ष आणि ज्ञान बाहेर यायच्या आधीच... पाहतो आहे.. पडलेली टरफले अस्ताव्यस्त.. टिप्पणी : मुक्तछंद आणि नवकाव्य नक्की काय याचा विचार करताना काही कल्पना मांडव्याशा वाटल्या. मला नक्की काय म्हणायचे आहे ते छंदोबद्ध रचना न करता किंवा लेखात असतात तश्या पूर्ण वाक्यात भावना न मांडता, तुटक तुटक वाक्यांत भावना मांडल्याने वाचकाला त्या कशा भावतात? ते पाहण्यासाठी ही रचना केली आहे.

काही सुधाराव्याशा वाटणार्‍या ( प्रसिद्ध) सिनेमांच्या कथा... भाग २

लेखक भडकमकर मास्तर यांनी मंगळवार, 16/12/2008 16:28 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.misalpav.com/node/1844 भाग १... काही सिनेमे असतात त्यांवर अवांतर गप्पा ठोकता येतात.. त्यासाठी हा धागा काढला होता, आधीच्या धाग्याचे पान भरल्याने नवीन भाग २ काढला आहे.... ______________________________ रब ने बना दी जोडी हा आदि चोप्राचा सिनेमा मी पाहिला ... नवरा मिशी काढून केस फेंदारून टाईट टी शर्टमध्ये आला म्हणून बायको त्याला ओळखत नाही असे एक गृहितक मान्य केले तर सिनेमा पाहता ये ईल.... त्या नव्या माणसाच्या भूमिकेची शाहरूखने अत्यंत ओव्हरऍक्टिंग करून वाट लावली आहे... पण आधीचा सुरिंदर साहनी त्याने अप्रतिम उभा केलाय....

-सकाळवरील "गुगलच्या' जाहिरातींबद्दल निवेदन

लेखक ईसकाळ यांनी शनिवार, 13/12/2008 21:50 या दिवशी प्रकाशित केले.
मागील एक दोन दिवसांत "ई-सकाळ' वाचत असताना जगातील काही भागातील काही वाचकांच्या पाहण्यात आक्षेपार्ह जाहिराती आल्या. मूळच्या "गुगल ऍडसेन्स'मार्फत प्रसिद्‌ध करण्यात येणाऱ्या या जाहिराती आमच्या वाचकांच्या सूचनेनंतर काढून टाकण्याचा निर्णय "ई सकाळ' व्यवस्थापनाने घेतला असून त्याची तातडीने अंमलबजावणी करण्यात आली आहे. मुळात आक्षेपार्ह जाहिराती प्रसिद्ध करणे ही गोष्ट सकाळ किंवा "ई-सकाळ'च्या जाहितरातविषयक धोरणात नाही असे आम्ही नम्रपणे सांगू इच्छितो. म्हणूनच या सारख्या जाहिराती भविष्यात "ई-सकाळ'वर झळकणार नाहीत या बाबत अधिक काळजी घेण्याचा ई-सकाळचा प्रयत्न राहिल.

"ओळख ना पाळख"... जबरदस्त नाट्यानुभव... !!

लेखक भडकमकर मास्तर यांनी मंगळवार, 09/12/2008 17:39 या दिवशी प्रकाशित केले.
इतके दिवस आवडलेल्या नाटकांवर लिहिले. आता न आवडलेल्या नाटकाबद्दल लिहितो.. ओळख ना पाळख.. लेखक : सुरेश जयराम दिग्दर्शक : मंगेश कदम निमिर्ती : प्रशांत दामले फॅन फाऊंडेशन प्रशांत दामले यांची निर्मिती असलेल्या या नाटकाबद्दल उत्सुकता होती..."ओळख ना पाळख' या नाटकाचे महाराष्ट्रात एक हजार प्रयोग होणारच असं ते मुलाखतीत म्हणाले होते...होउदेत बापडे.... भारतातच काय जगभर होऊदेत...

अजुन मी...

लेखक राघव यांनी बुधवार, 03/12/2008 09:43 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबईवर झालेल्या हल्ल्याच्या दिवसापासूनच खूप अस्वस्थ होतो. काहीतरी लिहावे असे सारखे मनात येई पण शब्दच सुचत नव्हते. शेवटी काल ते स्फुरले अन् खालील कविता झाली. पण वाचून झाल्यावर माझेच मला फार विषण्ण वाटले. श्रावणदांना विचारले कि काही बदल करू का म्हणून, पण त्यांनीही तशीच असू देत असे सांगीतले आणि काही मौलिक सुचनाही केल्या.

शारदा साहित्य संमेलन रद्द हा निर्णय कौतुकस्पद..!

लेखक विसोबा खेचर यांनी मंगळवार, 02/12/2008 23:26 या दिवशी प्रकाशित केले.
नुकत्याच मुंबईत घडलेल्या अतिरेकी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर, त्या घटनेमागचे गांभिर्य जाणून रत्नांग्रीत होऊ घातलेले शारदा साहित्य संमेलन रद्द करण्यात आले असून त्या पैशांतून जखमींची आणि शहिदांची मदत केली जाणार आहे असे कळले.. मंगेश पाडगावकर हे या संमेलनाचे संकल्पित अध्यक्ष होते.. माझ्या मते ही घटना खरंच कौतुकास पात्र आहे! महाराष्ट शासनाच्या २५ लाखांवर अमेरीकावारीची फुक्कटची पोळी भाजण्याचे स्वप्न रंगवीत असलेले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे संकल्पित अध्यक्ष पानतवणे आणि इतर पदाधिकारी यावरून काही धडा घेतील अशी अपेक्षा आहे, अर्थात ती व्यर्थ आहे! तात्या.