बॅचलरांच्या मेळ्यामध्ये
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
बॅचलरांच्या मेळ्यामध्ये
आम्ही वैवाही भाबडे.
तुम्हा रुचेल का हो हे
माझे मोडके तंगडे.
तुम्ही शाल मखमली,
आम्ही फाटके घोंगडे.
का हो बायको घरात
आम्हा म्हणते फावडे.
जन्म स्वैपाकात गेला,
अमुचे भांड्यांशी वाकडे.
जशी समजून चाले
ती आम्हांसी बोकडे.
जरा चालवूद्या हात,
जुळवितो माझे शब्द.
लव्हमॅरेज अमुची कथा
अगदिच नाही निर्बुद्ध.
- बिनडोक बनी
प्रेरणास्थान : अंकुश चव्हाण यांचा ज्ञानियांचा मेळ
वाचने
2569
वाचनखूण
प्रतिक्रिया
7
हा हा हा
In reply to हा हा हा by आनंदयात्री
-
In reply to - by प्राजु
प्राजुताई,
:)
मस्त सर्कि
जमलय गो बने !
प्राजू, तूही आलीस का गोतावळ्यात?