Skip to main content

प्रतिक्रिया

*जालिंदर जलालाबादी :- आरती महास्पर्धा*

लेखक बाकरवडी यांनी शनिवार, 11/04/2009 20:06 या दिवशी प्रकाशित केले.
*जालिंदर जलालाबादी :- आरती महास्पर्धा* आजकाल जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी, अंतर्जाली, मनोमनी (आणि मिसळपाव वर)सगळीकडे जालिंदर बाबा यांची चर्चा चालू आहे. याकाळात लोकांना आलेले अनुभव आणि वाढत जाणारी भक्तसंख्या आपण सर्व जाणताच ! त्यामुळे आम्ही जालिंदर जलालाबादी बाबा यांची आरती लिहीण्याची स्पर्धा जाहीर करत आहे. तरी सर्व कवींनी , विडंबनकारांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे.
Taxonomy upgrade extras

सारेगमप- महाराष्ट्राचा आवाज (अद्ययावत)

लेखक बाकरवडी यांनी मंगळवार, 07/04/2009 18:34 या दिवशी प्रकाशित केले.
सारेगमपचे नवीन पर्व सुरू होउन आता २ आठवडे होतील. या पर्वात १० प्रसिद्धीच्या झोतात असलेले नव्या दमाचे तरूण गायक- गायिका आहेत. सर्वजण हा कार्यक्रम पहात असतील.परंतु ह्यावेळी कोणीच धागा सुरू केला नाही. का कोणी हा कार्यक्रम पहातच नाही? का little champs च्या अनपेक्षित निकालाने सगळे कंटाळले काय? असो, आपणास या नव्या पर्वाबद्दल काय वाटते ते सांगा.तसेच नवे परिक्षक असलेले पं.मंगेशकर आणि सुरेश वाडकर यांच्याबद्दलही सांगा

*सहल*

लेखक बाकरवडी यांनी गुरुवार, 26/03/2009 13:08 या दिवशी प्रकाशित केले.
सहल :- नेहमी मिपा कट्टे केले जातात, सर्व जण आनंदाने त्यात सहभागी होतात. पण त्यापेक्षा वेगळे काहीतरी म्हणून ह्यावेळी मिपाकरांची सहल काढूया का? एक दिवसाची सहल. तुम्हाला काय वाटते ? कोण कोण येणार ? आणि कुठे जायचे ते ठिकाणही सुचवा. मज्जा करूयात.चला तर मग.

आनंद यादवांचा राजीनामा...

लेखक अविनाश ओगले यांनी मंगळवार, 17/03/2009 21:34 या दिवशी प्रकाशित केले.
'कलेचे कातडे' पांघरुन सुद्धा 'संतसूर्या'ने चटका दिला 'माउली'शीच घेता 'झोंबी' वारकर्‍यांनी झटका दिला.

पार्थीव

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी गुरुवार, 12/03/2009 13:35 या दिवशी प्रकाशित केले.
येते एक बांग मशिदीतून चीरुन शांतीचा पडदा.. अन देवूळी, गोड भुपाळी दंग उठविण्या दगडा...!! अन इथे... परि माणुसकीचे पार्थिव येथे पडले हो बेवारस... कुत्रे एक परि,करुनी तंगडी वरी मुतले त्यावरी, फस..फस..! पंचम्रुतं स्नानं करिश्ये... पुरोहितांचा मंत्र गजर देवळातल्या मुर्ती वरती दह्या दुधाची संतत धार.. इथे.. घोंगवती प्रेतावरती असंख्य माशा किती अंग चोरुनी उभी माणसे. दुरुनच जरा बघती... तुळशी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान.. मंदिरात चाले किर्तन... आली आली पोलीसाची, गाडी आली कुठुन करुनी पंचनामा, माणुसकीचा नेले प्रेता उचलुन...!! मंदिरातले संत श
Taxonomy upgrade extras

(प्रातःध्वनि)

लेखक बिपिन कार्यकर्ते यांनी सोमवार, 09/03/2009 22:44 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळी उठल्यावर अंथरूणातून आरश्यासमोर तोंड धुताना ब्रश मला म्हणाला "घास रे मेल्या घास, लवकर घास" आळस देताना अंग मोकळं करताना चुकून पोट म्हणालं ढम ढम ढम... ट्रेनच्या बाकड्यावर शेजारच्या भय्याचा घामट दर्प घेताना चष्मा म्हणाला "तरी मी तुला सांगत होतो भलतीकडे बघू नको"
Taxonomy upgrade extras

मातिच्या मुंग्या

लेखक अडाणि यांनी शनिवार, 07/03/2009 11:16 या दिवशी प्रकाशित केले.
मातिच्या मुंग्या का मुंग्यांची माती मला कळले नाही आजपण... जाता जाता वेळ गेला कळले नाही कधी सरले बालपण... उचलली जीभ लावली टाळ्याला बोलू नका तूम्ही काहीपण... मूंग्या ही गेल्या आणि जीभ ही गेली हाती उरले फक्त वेडेपण... का म सु (काही महत्त्वाच्या सुचना) १. सदरची कविता आंतरजालावर इतरत्र आढळ्ल्यास (शक्यता कमी तरीपण) त्या कवी म्हणवणार्‍याने चोरली आहे असे समजावे. २. ज्यांना विडंबन करायची हौस आहे त्यांनी क्रूपया ह्या कवितेचा वापर करावा... म्हणजे इतरांना त्रास होणार नाही. ३. ज्यांना विडंबन करायची हौस नाही त्यांनी ही कविता विडंबित समजून मुळ कविता तयार करवी. ४.

पानाआडच्या कळ्या - १: "सति"

लेखक वाचक यांनी गुरुवार, 05/03/2009 10:26 या दिवशी प्रकाशित केले.
वास्तविक एखाद्या पुस्तकाने इतके झपाटून जाण्याचे वय (आणि मन) आता राहिलेले नाही. म्हणजे वय खूप झाले असे नव्हे तर आता नवथरपणा जाउन कशालाही पटकन दिलखुलास दाद देण्याची, शिफारस करण्याची खोड जाउन अंगी एक (उगिचच) शिष्टपणा आला आहे. पण ह्या पुस्तकाने मात्र झपाटून टाकले आहे. गेले कित्येक महिने, वाचल्यापासूनच, ह्यच्यावर कहीतरी लिहिले पाहीजे, दुसर्‍या कुणालातरी सांगितले पाहीजे असे तळापासून वाटत होते. एवढे काय आहे ह्या पुस्तकात ?

(कोण म्हणतो रात्र झाली )

लेखक बेसनलाडू यांनी बुधवार, 04/03/2009 08:56 या दिवशी प्रकाशित केले.
कोण म्हणतो रात्र झाली आताच अमुच्या जेवणाची आता कुठे सुरवात झाली बघुया चला - या फोडणीची नुकतीच टेट्रापॅकमधुनी डालड्याला जाग आली पदरही खोचला हिने अन् जिरे-मिरीची आग झाली प्रियेस माझ्या आजतर मी दगडफुले कित्येक वाहिली हिंग कुटला मी असा की धुंदी आजही राहीली त्याच गंधाने अजुनी जेवणाचा बहर आहे रात्र थोडी जाहली पण भूक बाकी - कहर आहे! समजून घ्या; खाण्याला, गाण्याला नि विडंबनाला वयाची अट नसते :)

पैशे महत्वाचे की, मित्र.

लेखक JayGanesh यांनी सोमवार, 02/03/2009 16:35 या दिवशी प्रकाशित केले.
माझा हा स्व-अनुभव आहे. क्रुपया वाचण्याठी वेळ द्यावा. ही. नम्र विनंती. मि. पा. करांनी / करींनी यावर आपली प्रतिक्रिया द्यावी.ही. (दुसरी )नम्र विनंती. माझ्या जवळ्च्या काही मित्रांना मी काहि रुपये उधार दिले आहेत. मागतांना अत्यंत गरज आहे, महत्वाचे काम आहे, असे काहिजण म्हणाले होते, मी पण मित्राला मदत म्हणुन रुपये दिले. सगळेजण २-३ महीन्याच्या आत परत करु असे म्हणाले होते. पण आज पर्यत्न कोणी सुध्दा परत केले नाहि. काहिना मी तर क्रेडीट काड वरुन रुपये काडुन दिलेले आहेत. (प्रोसेसिग फी, व्याज मीच भरले, भरत आहे) माझ्या मते, जसे रुपये मागायला हे आले होते, तसेच परत करण्यासाठी सुध्दा त्यांनिच यायला हवे.