"ओळख ना पाळख"... जबरदस्त नाट्यानुभव... !!
लेखनप्रकार
इतके दिवस आवडलेल्या नाटकांवर लिहिले. आता न आवडलेल्या नाटकाबद्दल लिहितो..
ओळख ना पाळख..
लेखक : सुरेश जयराम
दिग्दर्शक : मंगेश कदम
निमिर्ती : प्रशांत दामले फॅन फाऊंडेशन
प्रशांत दामले यांची निर्मिती असलेल्या या नाटकाबद्दल उत्सुकता होती..."ओळख ना पाळख' या नाटकाचे महाराष्ट्रात एक हजार प्रयोग होणारच असं ते मुलाखतीत म्हणाले होते...होउदेत बापडे.... भारतातच काय जगभर होऊदेत... आम्हालाच फ़क्त का त्रास ना?
मुंबईच्या प्रथितयश निर्मात्यांनी म्हणे या नाटकाला मुंबईत चांगल्या तारखा मिळू नयेत अशी व्यवस्था केल्याचेही कोणत्यातरी वर्तमानपत्रात ( बहुतेक लोकसत्ता) वाचले होते तरीही त्याचे मुंबईबाहेर प्रयोग करून नाटक तगवायचं असं प्रशांत दामले यांनी ठरवलं होतं असं ऐकलं होतं...त्याबद्दलची परीक्षणेही काही उत्साहवर्धक नव्हती पण त्यामुळेच नाटकावर अन्याय होतोय असं उगीचच वाटलं होतं.. तरीही नाटकाकडून जास्त अपेक्षा न ठेवताच दीडशे ( :( का? का?का?) रुपयांची तिकिटे काढून गेलो होतो प्रयोगाला.
ही एक सस्पेन्स कॊमेडी आहे. हे असले डबल जॊनर निभावून नेणे कठीण असते असं का म्हणतात ते इथे कळते.
कथासूत्र ... एका इन्स्पेक्टरला ( प्रशांत) एक स्मृती गेलेला माणूस ( मंगेश कदम) पहाटे रस्त्यावर सापडतो, त्याच्या डोक्यावर मोठी जखम आहे. त्याला घेऊन तो पोलीस स्टेशनवर येतो.इथे नाटक सुरू होते.त्याच्या खिशातल्या वस्तूंवरून (पाकिट कार्ड्स वगैरे) तो उद्योगपती अशोक गरवारे आहे असं इन्स्पेक्टरला वाटतं म्हणून तो अशोकच्या उर्मट आणि आक्रस्ताळ्या बायकोला ( परी तेलंग) पोलीस स्टेशनवर बोलावतो...ती येऊन सांगते की हा माझा नवरा नाही..... काही काळाने परत येऊन सांगते की हा माझा नवरा आहे...मग असे दोन तीन वेळा करते.... प्रत्येक वेळी इन्स्पेक्टर तिच्यावर विश्वास ठेवून त्या अशोकला ती म्हणेल ते पटवून देत राहतो... या इन्स्पेक्टरची पत्नी सायकिऎट्रिस्ट असते ( पूर्णिमा तळवलकर) ती पोलीस स्टेशनला येऊन या पेशंटला पहायचे कबूल करते आणि त्याची तपासणी करते.... आणि मग एक माफ़क रहस्यभेद होऊन नाटक संपते...
स्पॊइलर ऎलर्ट.... ( या गरवारेचे झारापकराच्या बायकोशी लफ़डे असते, हा तो रहस्यभेद ).... नंतर प्रत्येकाचे भलेमोठे कन्फ़ेशन, आणि अट्टाहासाने शेवट गोड , त्यात इन्स्पेक्टर झारापकर आपल्या बायकोच्या विनंतीला मान देऊन पोलीस स्टेशनात नाट्यगीत म्हणायला लागतात आणि एकदाचा पडदा पडतो....
नाटक किती भयंकर आहे हे नुसते कथासूत्रावरून कळणार नाही.
हा इन्स्पेक्टर गरवारेची बायको सोडून इतरांना का बोलवत नाही ? तिच्यावरच विश्वास ठेवून नुसतं हो ला हो करत राहतो...आणि अशोक गरवारे हा स्मृतिभ्रंशाचं नाटक करतोय हे आधीच कळल्यावर बघताना असं वाटत राहतं की हा कोणीतरी डेंजर माणूस असणार तर अगदीच टुकार रहस्य निघते. शिवाय हा इन्स्पेक्टर जे इन्टेरोगेशन करतो ते अगदीच उथळ, आचरट... बर्याच वेळा रिपीटिटिव्ह....त्याच त्याच हालचाली...
प्रशांत दामले मन लावून काम करतात.... झारापकर या भोळ्या सरळमार्गी इन्स्पेक्टरचे काम उत्तम होते.... पण एकूणच लेखन इतके सुमार आहे की काही वेगळं करायला वाव नाही...( याच लेखकाचे कुठे ते डबलगेम नाटक आणि कुठे हे...!!) शाब्दिक विनोदाचे प्रमाण कमी..हशे मिळवायला मग उड्या मारणे, जमिनीवर गडाबडा लोळत लहान बाळासारखे हातपाय वर हलवणे असे प्रकार पुष्कळ करावे लागतात. खाकी कापड चढवलेला मोठा लोकरीचा गुंडा हातातून पडल्यावर ज्या लोभसवाण्या हालचाली करेल त्या सर्व हालचाली दामले करत होते त्यावर लोक अगदी खुर्चीतून उसळ्या मारून हसत होते....
.....साधारणपणे शाळेच्या स्नेहसंमेलनात ज्या प्रकारचे नाटक पहायला मिळते आणि जसे दिग्दर्शन असते तसे वाटत होते.... एक उदाहरण देतो...इन्स्पेक्टरला कोणीतरी म्हणते तुम्ही माझ्या किल्लीवर बसलाय... मग इन्स्पेक्टर बसल्या जागीच अंग हलवून खुललेल्या चेहर्याने म्हणतो ," मला काहीतरी फ़ील होतंय".. मग प्रचंड हशा वगैरे... कायिक विनोद हा एक महत्त्वाचा प्रकार असतो हे मान्य हो, पण सतत तेच ? त्याला काही प्रमाण आहे की नाही ?...
मी पाहिलेल्या प्रयोगात मंगेश कदम यांनी कंटाळलेल्या रिप्लेसमेंट टाकणार्या अभिनेत्याने तालमीत काम करावे तसा प्रयोग केला....त्यात प्रचंड फ़ंबल, बोलता बोलता अडखळणे, चुकीचे बोलून पुन्हा वाक्य म्हणणे अशा प्रकारांमुळे छान तालमीचा फ़ील आला....इतर पात्रे संवाद म्हणत असताना अशोक गरवारे मात्र नाटकात हजर नाहीत असे वाटत होते.किंवा दिग्दर्शकाच्या भूमिकेतून प्रत्येक कलाकाराकडे पाहत आहेत असे वाटत होते...
परी तेलंग यांचा आक्रस्ताळा सूर आणि टायमिंग मस्त जमलेलं आहे ... पूर्णिमा तळवलकरांचा अभिनय ठीक पण अत्यंत छोटी आणि आगापीछा नसलेली भूमिका त्याला त्या काय करणार?...
नाटकभर माझ्या मागे एक पाच वर्षांची मुलगी मन लावून नाटक बघत होती आणि लोक हसले की आपल्या आजोबांना विचारत होती की अशोक गरवारे कोण हो? मग तेही तिला सांगत होते... सुरुवाती-सुरुवातीला मी व्यत्ययामुळे वैतागलो मग मंचावरच्या नाटकापेक्षा हे मागचे संवाद अधिक रम्य वाटायला लागले... शिवाय आता ही पोरगी आजोबांना काय विचारणार असा एक सस्पेन्स टिकून राहिला..
एकूणच हे अजिबात न जमलेलं नाटक आहे.... मोठेमोठे हिंदी निर्माते वाईट कथा घेऊन खूप खर्च करतात आणि आपण प्रेक्षक म्हणून म्हणतो की अरे कथा नीट घ्या ना , नुसतं मार्केटिंग करून काय उपयोग आहे का?
तेच आता दामले यांना प्रेक्षकांकडून ऐकावं लागणार आहे... आत्ता नाटक जे काही चाललं आहे ते दामले कदम जोडीच्या पूर्वपुण्याईवर चाललं आहे...
हे असं नाटक घेऊन इतकी वर्षं अनुभव असलेले लोक नाटक करतात आणि रिलीजच्या आधीच हजार प्रयोग करणार अशा गर्जना करतात, हे किती धाडसी आहे..... शिवाय प्रत्येक नाटक चाललंच पाहिजे अशी काही वाक्यं मुलाखतीत फ़ेकतात तेव्हा त्याला जाहिरातीवरचा विश्वास म्हणावं का प्रेक्षकांच्या मूर्खपणाची खात्री म्हणावं ?
......पहा...
http://www.esakal.com/esakal/08092008/Saptarang6D6833BC27.htm
नाटक पाहिल्यावर ही मुलाखत परत वाचली .एकाच वेळी भलतीच ऍरोगंट आणि विनोदी वाटली...
असो..पण प्रेक्षक मूर्ख नसतात ....
२५ डिसेंबरला शंभरावा प्रयोग होणार आहे म्हणे....हे परीक्षण वाचूनही हिंमत असेल तर जरूर जावे.....
प्रशांत दामले यांना पुढल्या प्रयोगासाठी वाढदिवसाच्या शुभेच्छा...
वाचने
14623
वाचनखूण
प्रतिक्रिया
25
होतीलही कदाचित हजारावर प्रयोग!
In reply to होतीलही कदाचित हजारावर प्रयोग! by विसुनाना
यदाकदाचित???
In reply to यदाकदाचित??? by रामपुरी
सहमत ....
In reply to सहमत .... by छोटा डॉन
यदा कदाचित
In reply to यदा कदाचित by आपला अभिजित
***
In reply to *** by आपला अभिजित
अरेरे
In reply to अरेरे by टायगर
आणखी
In reply to आणखी by विसोबा खेचर
ही तर दादागिरी
In reply to *** by आपला अभिजित
:)
In reply to *** by आपला अभिजित
.
In reply to *** by आपला अभिजित
यदा-कदाचित..
In reply to यदा-कदाचित.. by भडकमकर मास्तर
मास्तर,
In reply to यदा कदाचित by आपला अभिजित
माझ्या मनातले बर्यापैकी ...
In reply to माझ्या मनातले बर्यापैकी ... by छोटा डॉन
डॉन,
वाईट!
In reply to वाईट! by आपला अभिजित
याच्या
...तरीही
मास्तर, चांगली 'ओळख' करुन दिलीत!
छान
In reply to छान by लिखाळ
नेटवरही
परीक्षण
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
प्रेक्षक
असेच म्हणते...
स्पेशलायझेशन
In reply to स्पेशलायझेशन by भडकमकर मास्तर
>> आणि चार