Skip to main content

प्रतिक्रिया

यालाकमो हिदा श्यादि

लेखक दशानन यांनी सोमवार, 02/03/2009 16:26 या दिवशी प्रकाशित केले.
लेतेसनि रसु नतुलिन्जओ ते लम तव्निकु हेआ सवशा त्तोघे लेकमो की मी त्ताअ तरुविनि हेआ कुए द्या जम रिसबा त्य्य न्च्याबुबा तुताबे नी न्धगदुम्रु कहमो क्दाए द्याउरभ लाम नितुसवशा च्यत्रिर मरमिति तिहो लीलधा जी वेसआ न्दुबिवद नौहो लितभे जम त्यामलत्या वेसश्पापु नतुलाफुनापा नतुरर्झनि चीश्तिश्रु ही नेन्दस्प न्गतुउ ताला रावानरा तीदे जम ही नेन्त्रमआ च्गलूह ते गध निम्बचु तीजा चेलाफु वेतता थओऔ ल्याओअ चेल्याकपा न्दधु नअउहो वेराथरथ लेरव्हेअ ते ख्यसौ मी की चेरीकनो शपा तेहो हीसजातिक्शि झ्ह्यामा चेनाम सेदवक कौथा तेहो मयनि नीआ च्यानासशानुअ नतुतीकचौ क्तमु लोझा लेहअओस चेतुक्रु याघाब हा हाप मी लोलचा शकाआ लेझा नेन्गथे नअ

सन्मान! एका रानातल्या कवीचा..!

लेखक विसोबा खेचर यांनी शनिवार, 28/02/2009 00:19 या दिवशी प्रकाशित केले.
एक अतिशय आनंदाची बातमी..! शेतकरी कवी, रानकवी, ना धो महानोर यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानातर्फे दिला जाणारा जनस्थान हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे असे समजते.. महानोरांसारख्या अस्सल मराठी मातीतल्या एका कवीचा साक्षात कुसुमाग्रजांनीच केलेला हा गौरव आहे असेच म्हणावेसे वाटते..! कवीवर्य ना धो महानोरांचे मिसळपाव परिवारातर्फे मन:पूर्वक अभिनंदन..! -- तात्या अभ्यंकर.

वळण !!

लेखक अनिल हटेला यांनी बुधवार, 25/02/2009 14:59 या दिवशी प्रकाशित केले.
बराच वेळ वाजत असलेल्या डोअरबेल ने श्री ला जाग आली.डोळे चोळत आणी कोण तडमडलये हा विचार करत दरवाजा उघडला.समोर अरुण उभा. "काय बे , ११.०० वाजलेत.अजुन अंथरुणातच आहेस होय ?" "हम्म !" "आरे काय हे? आज १४ फेब्रुवारी ! सारी दुनिया आजचा दिवस एंजॉय करतीये आणी तु ?" "छोड ना यार ! चहा घेणारेस का ?

इंदुरात 'लिटिल चॅम्प्स'

लेखक भोचक यांनी मंगळवार, 24/02/2009 19:21 या दिवशी प्रकाशित केले.
इंदुरातील मराठी माणसांची सांस्कृतिक चळवळ म्हणून ख्यात असलेल्या सानंद या संस्थेतर्फे सोमवारी (ता.२३) लिटिल चॅम्प्सचा सुंदर कार्यक्रम इंदुरमध्ये झाला. महाराष्ट्रातील मोजक्या शहरात कार्यक्रम झाल्यानंतर लगेचच या चॅम्प्सना इंदुरात आणले होते. सानंद या संस्थेने या कार्यक्रमाचे नेटके आयोजन केले होते. संस्थेचे अध्यक्ष सुधाकर काळे आणि सचिव जयंत भिसे ही दोन माणसे 'सांस्कृतिक' दृष्ट्या झपाटलेली आहेत. त्यांनी या कार्यक्रमासाठी खूपच कष्ट घेतल्याचे जाणवत होते. या कार्यक्रमात या लिटिल चॅम्प्सने यापूर्वीच सादर केलेली गाणी सादर केली. पण लोकांना त्यांच्या गाण्यांपेक्षाही त्यांना डोळ्यात साठवून घ्यायचे होते.

श्रद्धांजली - व्हराडकार डॉ लक्ष्मणराव देशपांडे..

लेखक विसोबा खेचर यांनी सोमवार, 23/02/2009 12:27 या दिवशी प्रकाशित केले.
ज्येष्ठ रंगकर्मी, नाट्यशास्त्राचे गाढे अभ्यासक, 'व्हराड निघालंय लंडनला' ही अफलातून कलाकृती रंगभूमीवर आणणारे आणि गाजवणारे प्रा डॉ लक्ष्मणराव देशपांडे आज आपल्यात नाहीत. मिसळपाव परिवाराची लक्ष्मणरावांना भावपूर्ण आदरांजली...! -- तात्या अभ्यंकर.

हागणदारी मुक्त खेडे

लेखक विशाल कुलकर्णी यांनी गुरुवार, 19/02/2009 08:49 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवसांपुर्वी वर्तमानपत्रात एक बातमी वाचली होती. रायगड जिल्ह्यातल्या खेड्यांमधुन हागणदारी मुक्त खेडे ही योजना राबवायचा निर्णय सरकारने घेतला. त्याच्या अंमलबजावणीसाठी गावा गावातल्या अंगणवाडी शिक्षिकांना वेठीस धरण्यात आले. कल्पना अशी होती की गावातील अंगणवाडी सेविका पहाटे हागणदारीपाशी जावुन उभ्या राहतील आणि येणार्‍या स्त्री पुरुषांचे गुलाबाचे फ़ुल देवुन स्वागत करतील. नंतर त्या गावकर्‍यांचे फोटो काढुन वर्तमानपत्रात प्रकाशित केले जातील.

सखे ठोठावते आहेस कुठले दार देहाचे?

लेखक ॐकार यांनी सोमवार, 16/02/2009 05:30 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्यावाचून संध्याकाळ माझी लांबली होती तुझ्या पदरात सोनेरी उन्हे मी बांधली होती सुखाची काळजी काही करावी लागली नाही मुळी दु़:खेच माझी दीनवाणी, गांजली होती भले झाली असावी वेळ झोपेची, कसा झोपू? तुझ्या डोळ्यांतली स्वप्ने मगाशी भांडली होती सखे ठोठावते आहेस कुठले दार देहाचे? अशी ही कोणती इछा? कुठे मी डांबली होती? सुदैवाने तिला प्रेमात हे कळलेच नाही की बरा होतो जरासा मी, तशी ती चांगली होती खरे तर चंद्र केव्हाचा मला विसरून गेलेला कधीची चांदणी दारात माझ्या टांगली होती तुझ्या सोईप्रमाणे हातचे धरलेस तू मजला स्वतःची आकडेवारी कुठे मी मांडली होती?

सारेगमप आणि प्रजासत्ताक दिन

लेखक माझी दुनिया यांनी गुरुवार, 29/01/2009 14:46 या दिवशी प्रकाशित केले.
या वर्षीचा प्रजासत्ताक दिन सोमवारी आला. नुकत्याच मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर बर्‍याचश्या भारतीयांना ही नुसतीच सुट्टीची मजा उपभोगण्यापलीकडे जाऊन देशप्रेम व्यक्त करण्याकरीता योग्य संधी वाटली. देशप्रेमाची ज्योत तेवत ठेवण्याचे काम या वेळी झी मराठी ने सारेगमप लिटिल चॅम्प्स च्या माध्यमातून केले. एक तर या कार्यक्रमाने लोकप्रियतेचा उच्चांक गाठला आहे. लहानच काय पण मोठेही या कार्यक्रमाच्या आधीन झालेले आहेत. त्यातूनही दुग्धशर्करा योग म्हणजे या कार्यक्रमाची संकल्पना प्रत्यक्ष बाळासाहेब मंगेशकरांनी मांडली आणि प्रत्यक्षातही आणली.

सावरकर आणि आपण

लेखक ए. प्रशांत यांनी बुधवार, 28/01/2009 10:48 या दिवशी प्रकाशित केले.
लेखक - अभिनय कुलकर्णी सावरकर नाव घेताच 'स्वातंत्र्यवीर' ही पदवी आठवते त्यांची ती प्रसिद्ध गाजलेली उडी आठवते. त्यांची सशस्त्र क्रांती आठवते. मग त्यानंतरची हिंदूत्ववादी भूमिका आठवते. आणि मग फार तर जातीनिर्मुलनासाठी केलेलं काम आठवतं. कधी कधी भाषाशुद्धी चळवळ आठवते. पण समग्र सावरकर आपण समजून घेण्याचा प्रयत्न कधी केलाय? हे सगळं आणि याहूनही बरंच काही करणारी, मांडणारी एकच व्यक्ती होती. तिला वेगवेगळे आयाम होते आणि त्यातले अनेक आपल्याला पटणारे आणि न पटणारेही होते. पण म्हणून ते समजून न घेता त्याकडे दुर्लक्षच बरेच झाले.