मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

प्रकटन

चांगल्या बातम्या - एक उपक्रम!

राघव ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
नमस्कार मिपाकर्स! खूप दिवसांपासून मनात एक विचार घोळतोय. येथे त्याबद्दल थोडी चर्चा कराविशी वाटली. आपल्याकडील मिडिया अट्टाहासानं नकारात्मक बातम्या देतांना आढळतो. टीव्ही पाहणं बंद करून टाकावं इतकं ते नकारात्मक असतं, मनांवर वाईट परिणाम करणारं असतं. खासकरून जेव्हा आपण आपल्या परिवारासमवेत टीव्ही पाहत असतो त्यावेळेस हे ठळकपणे जाणवतं. अगदी वर्तमानपत्रातून देखील एखादी सकारात्मक, सर्जनशील बातमी शोधून काढावी लागते. आणि बर्‍याचशा बातम्या आपल्यापर्यंत पोहोचतच नाहीत हेही तेवढंच खरं. म्हणून एक उपक्रम सुरु करावासा वाटला. चांगल्या, सकारत्मक, सर्जनशील बातम्या/माहिती पुढे आणण्याचा.

आव्वाज कुणाचा?

राजेंद्र मेहेंदळे ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
नमस्कार मंडळी हे शीर्षक वाचून तुम्हाला जर असे वाटले असेल की हा काहितारी राजकीय रणधुमाळीविषयक धागा आहे तर तसे मुळीच नाही. काही दिवस हा विषय मनात घोळत होता तो कागदावर (पक्षी मिपावर) उतरवत इतकेच. तर (शिरीष कणेकरांना स्मरून--तुम्ही फिल्लमबाजी ऐकलेच असेल ) "माझ्या प्रदीर्घ आणि दैदिप्यमान " कारकिर्दीची सुरुवात नेटवर्किंग मध्ये झाली आणि ती कंपनी व्हॉइस ओव्हर आय पी या विषयात काम करत असल्याने मलाही व्हॉइसचे ट्रेनिंग आणि अनुभव अनायास मिळत गेला. तो २००१ चा काळ होता आणि "कर लो दुनिया मुठ्ठीने " अजून यायचे होते. त्यामुळे लांबचे कॉल करण्यासाठी टेलिफोन आणि त्यातही एस टी डी कॉल हाच एक पर्याय होता.

कवडसे-२

राजेंद्र मेहेंदळे ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
कवडसे पद्मावतीला दादा गोडसेंना भेटायला गेलो होतो. दादा म्हणजे तलवारीची धार.श्रीधर स्वामींचे शिष्य. त्यांच्याबरोबर कितीतरी वर्ष राहिलेले. आयुष्यभराची साधना. मिनिटा मिनिटाला परीक्षा घ्यायचे. त्यांच्याशी वागताना बोलताना फार जपून राहावे लागे. बहुतेकदा मी फक्त ऐकायचेच काम करायचो. अशा गप्पातून खूप शिकायला मिळायचे. ======================== तर दादा सांगत होते. अरे रायगडावर राज्याभिषेक सोहळा होता. इंदिरा गांधी आल्या होत्या. मला त्यांच्यासमोर पोवाडा म्हणायचा होता. पण भाषणे खूप लांबली. मला चान्स मिळेल का नाही माहीत नव्हते.

मानस- अनंतकोटीब्रम्हांडनायक

आर्या१२३ ·
लेखनविषय:
मानस- अनंतकोटीब्रम्हांडनायक "हे पहा, आम्हाला अशी माहिती मिळाली आहे, की तुम्हाला चुकून इथे आणले गेले. त्यावेळी तुमच्या पत्रिकेतील आणि आकाशातील ग्रहयोग जुळून आला होता आणि अतिगंड योग होता. पण नुकतेच तुमचे गुरु प.पु. श्री गोंदवलेकर महाराज यांनी शिफारस केल्यावरून वैकुंठातून श्रीरामांचा निरोप आला आहे की हा जीव चांगला आहे, आणि अजून नामस्मरण करू शकतो. यास्तव तुम्हाला परत पृथ्वीवर पाठवण्यात येणार आहे. " परलोकातील मोठ्या दालनात सिंहासनाधिष्ठित व्यक्तीने तिला जवळ बोलावून सांगितले. ती सुन्न होऊन ऐकत होती. हॉस्पिटलमध्ये त्या कुठल्याश्या क्षणी घेतलेल्या नुसत्या नामाचा हा परिणाम होता तर!

क्विक कॉमर्स आणि आपण

आकाश खोत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
फार फार वर्षांपूर्वी कोणे एके काळी घरपोच फक्त पत्र आणि बिलं यायची. मग डॉमिनोज आणि पिझ्झा हट मुळे अर्ध्या तासात घरी पिझ्झा यायला लागला. फ्लिपकार्ट वरून पुस्तकं आणि मग एक एक करत सगळंच यायला लागलं. झोमॅटो, स्विगी यावरून जेवण मागवणं आता फार जुनी गोष्ट झाली. प्रत्येक लोकप्रिय हॉटेल बाहेर बघितलं तर या डिलिव्हरी वाल्यांची येजा सुरु असते. पण आता गेल्या २-४ वर्षात आणखी एक प्रकार सुरु झाला तो म्हणजे "क्विक कॉमर्स".

डीग्री!

अमरेंद्र बाहुबली ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
माझी डिग्री अर्धवट राहिलीय मी तळमळतोय, नेहमी, रोज. कधी होईल पूर्ण? का होत नाहीये? का राहताहेत विषय? मी रोज झोपतोय आणि तळमळत जागा होतोय. डिप्लोमा झाल्यावर मी डिग्रीला अ‍ॅडमिशन घेतलं. जॉब करत डिग्री करायची म्हटली, पण डिग्री सोपी नव्हती. माझे विषय राहिले, ते मी काढतच गेलो. इकडे पगार वाढला, "डिग्री करायची गरज नाही" असे सल्ले मिळू लागले. पण मी डिग्री पूर्ण करतच राहिलो, पण ती पूर्ण होत नाहीये. कधी मी पेपरला वेळेत पोहोचत नाहीये, तर कधी पोहोचूनही मला काही लिहिता येत नाहीये. लिहूनही पास होत नाहीये. तर कधी भलतंच काहीतरी आचरट घडतंय — सगळं जग जणू माझी डिग्री होऊ नये म्हणून तुटून पडलंय. डिग्री पूर्ण होत

असावा सुंदर चॉकलेटचा बंगला - Chocolate Cha Bangla | Marathi Rhymes & Balgeet ए० आय० ने बनवलेले दुसरे पूर्ण मराठी गाणे

स्वरुपसुमित ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
नोंद जुना धागा संपादक मंडळाने क्रुपया उडवावा,त्यातले दुवे बदलले गेले आहे मित्रानो दुसरे पूर्ण गाणे mfa व्हर्जन ज्यात फक्त लहान मुलांसाठी व्हिडिओ ची लिंक,ह्यात तुम्हे कॉमेंट करू शकत नाही https://youtube.com/shorts/mOcvDaEZBoE?feature=share साधी लिंक https://youtube.com/shorts/1nhbGOBGvOM?feature=share आता काही दिवस विश्रांती पुढचा ये रे येरे पावसा वर करायचा विचार आहे पण काही अनिमेशन सुचत नाही ए० आय० मध्ये काही गोष्टी जमल्या नाही खारिचे शेपुट मुले साफ सफाई जमली नाही छतावर मोरे नाचवता नाही आला चोकलेट चे कारंजे नाही जमले पोपटाचा पिंजरा नाही जमलं ज्यात माझा काही कंट्रोल नाही तुमच्या प्रतीक्र

मामाच्या गावाला जाऊ या ए० आय० ने बनवलेले पहिले पूर्ण मराठी गाणे

स्वरुपसुमित ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
नोंद - हे गाणे बनव्हायला सुरुवात मी केली पण त्याच्या ३ दिवस आधी तरी हेच गाणे ससे वापरून बनवले होते पण वीडेओ नव्हता शॉर्ट होते मी पूर्ण ३+ मिनिटाचा वीडेयो बनवला आहे ५ -५ सेकंदाचे व्हिडियो बनवणे आणि जोडणे खूप जिकिरीचे काम होते ,शेवटी शेवटी आधीचीच फुटेज थोडी वापरली (लहानपणी ऍनिमेशन गाणी बघतांना बर्याच वेळा एकाच क्लिप रिपीट का दाखवतात हे आज कळाले ) पण ना नफा तोटा वर बनवत असल्याने चूकभूल देणे घेणे कृपया हे गाणे सगळीकडे शेयर करा २००० views आरामात होतील ,मग पुढचे गाणे ,तसेच तुम्हाला अजून एखादे बालगीत बनवून पाहिजे असेल तर कंमेंट किंवा व्यनि करावा https://youtu.be/BkBI81Uu2Pw

पहिलीपासून हिंदी निर्णय की राजकीय हत्यार ?

कपिलमुनी ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
तुम जिस स्कूल मे पढते हो उसके देवाभाऊ हेडमास्टर है.. सध्याचा राजकारणातील महत्त्वाची खेळी म्हणजे "देवाभाऊ" ने रचलेली रणनीती, ज्याने उद्धव ठाकरे यांच्या सर्वसमावेशक प्रतिमेला धक्का देत विरोधी आघाडीला कमकुवत केले आहे. या रणनीतीने हिंदी आणि उत्तर भारतीय मतदारांना प्रभावित करत दोन पक्षी एकाच दगडात मारले आहेत. मास्टर स्ट्रोक काय आहे? ही खेळी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाविकास आघाडी (MVA) यांना कमकुवत करण्यासाठी रचण्यात आली.

हिंदी सक्तीबद्दल

आकाश खोत ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
सध्याच्या हिंदी सक्तीच्या वाजत गाजत असलेल्या विषयावर आपले दोन आणे टाकण्याचा मोह मला आवरला नाही. माझे सर्व शिक्षण मी महाराष्ट्रात पूर्ण केले. पहिली ते सातवी मराठी माध्यम आणि आठवीनंतर सेमी-इंग्लिश. आम्हाला हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषा पाचवीपासुन होत्या. हिंदी भाषा हा विषय म्हणुन मी फक्त पाचवी ते सातवी शिकलो. आठवी ते दहावी त्याची जागा संस्कृतने घेतली. अकरावी बारावीमध्ये विज्ञान शाखेत आम्हाला फक्त एकच भाषा होती ती म्हणजे इंग्रजी. इलेक्ट्रॉनिक्स विषय निवडल्यामुळे इतर कोणताही भाषेचा विषय नव्हता. अभियांत्रिकीनंतर अभ्यास केलेली भाषा फक्त संगणकांची, माणसांची नाही.