यात्रा आणि सक्रिय सोहळे
अशात काही सण आणि उत्सवांच्या निमित्ताने सार्वजनिक पातळीवर काही कार्यक्रम, मिरवणुका, शोभा यात्रा पाहिल्या. गुढी पाडवा, शिवजयंती, आंबेडकर जयंती असे अगदी वेगवेगळ्या प्रकारचे निमित्त असले तरी एक साम्य होतं.
कार्यक्रमाची सुरुवात कितीही पारंपरिक वेशभूषा, पारंपरिक वाद्य, ज्या सण उत्सवाचं निमित्त आहे त्या महापुरुषाला किंवा देवाला वंदन करून झालं कि थोड्याच वेळात डीजेच्या भिंतीच्या भिंती लावुन गोळा झालेलं पब्लिक त्यात मुख्यत्वे अर्थातच तरुण टोळके वेडेवाकडे नाचूनच शेवट झाला. सुरुवातीची गाणी जरा निमित्ताला साजेशी असली तरी शेवटपर्यंत निमित्ताचं, औचित्याचं भान कोणालाही राहिलं नाही.
मिसळपाव
----
हिंदू नूतन वर्षाच्या मिपाकरांना हार्दिक शुभेछा .
------
चैत्र महिना सुरू होण्यापूर्वीच वैशाख वणवा जाणवू लागलाय.यावर्षी जरा लवकर उन्हाळा आलाय का? संक्रांती नंतर दुपार तापू लागली. होळी येण्या आगोदरच माठ, डेरे, पंखे सुरू झालेत.वातानुकूलित यंत्रांची खरेदी तपासणी, दुरूस्ती सुरू झाली आहे.कागदी लिंबू, काकड्या यांचे भाव कडाडले आहेत.टरबूज, खरबूज बाजारात मोठ्या प्रमाणात दिसत आहेत.मार्तंडाने आता पासूनच आग पाखडायला सुरूवात केली आहे.