वेडा कुंभार
लेखनप्रकार
हे प्रकटन सर्व मिपा सद्स्यांच्या मागणीवरुन. हा लेख सर्व सदस्यानी वाचावा अशी प्रामाणिक इच्छा. ह्या वरचे प्रतिसाद आणि चर्चा तुमची मर्जी.
There will be times when people whom you help will turn you into God, Allah,Christ all rolled into one. Be careful of this situation because you are only human being.
हे आमच्या साहेबाचे वाक्य मी कधीच विसरत नाही. आजही नाही. त्या सात वर्षात मी माणुस कमी घाणुस जास्त बाघितले. त्यापैकी एक अनुभव.
आई, वडिल आणि मुलगी समोर खुर्चीवर बसले होते. मुली करिता आले होते. अगदीच लहान मुलगी होती. ११ वर्षाची असावी.
मी: बोला, काय त्रास आहे.
आई: पोटात दुखते आहे मुलीच्या.
मी: वय काय?
आई: कालच दहावा वाढदिवस झाला.
मी: पाळी सुरु झाली का?
आई: नाही हो,अजुन लहान आहे. फॅमिली डॉक्टर म्हणतात कि पोटात कसला तरी गोळा आहे.
मुलगी निरागस दिसत होती. अवयवाची वाढ दिसत नव्हती. संशय यायचे काही कारणच नव्हते. गायनॅक डॉक्टर चे केस पेपर वर नाव घालुन त्यांना बसायला सांगितले. मुलगी खुर्चीवरुन उठली आणि उठ्ण्याची पद्धत बघुन डोक्यात कळ आली. वेड्या कुंभाराची आळ्वणी केली,नको रे बाबा नको-दुसरे काहीतरी असु दे. पटकन डॉक्टरचे नाव बदलले,
आणि असल्या किचकट केसेस च्या स्पेशालिस्ट चे नाव घातले. ह्या डॉक्टरची आणि माझी वेवलेंग्थ चांगली जुळायची. सगळी नजरेची भाषा. त्यामुळे बरेच अनर्थ टळायचे.तपासणी झाली. डॉक्टर बाहेर आला. नजरेनेच ती मुलगी गर्भार असल्याचे सुचविले. तोंडाने १०+ (अडिच महिने) म्हणाला आणि पुढच्या ऑपरेशन साठी निघुन गेला.
आता पोटात गोळा आला माझ्या. आता त्या आईचे सांत्वन करायचे तरी कसे. अगदीच सात्विक दिसत होती आई . शेवटी मनाचा हिय्य्या केला आणि परिस्थिती कळवली.
आईने लगेच हंबरडा फोडला. सर्व हॉस्पिटल स्तब्ध. बाबा लगेच हायपर. कुठे शेण खाल्लेस चे स्टँडर्ड डायलॉग. वर उचललेला हात मी मधेच धरला. तमाशा लगेच थांबवायचे माझ्यावर बंधन होते. ठेवणीतला आवाज काढून हिंसाचार तिथेच थांबवला.
आता हीच केस कुठे दुसरी कडे गेली असती तर हे घर सुमारे २०००० रुपयाला नाडले गेले असते. ७० च्या दशकात ही रक्कम फार मोठी होती. मुलीला एडमिट करुन दुस-या दिवशी गर्भपात करायचे ठरले. तसे एडमिट करायची गरज नव्हती. सकाळी बोलवता आले असते. पण मुलीचा घरी जाउन पडणारा मार मला वाचवायचा होता.
दुस-या दिवशी सगळे निट पार पडले. पेशंट घरी जायची वेळ आली. आता प्रष्न हा होता की हे कोणी केले? कायद्याने हा प्रष्न गर्भपात व्हायच्या आधी विचारायची परवानगी नसे. पण परत हा प्रसंग येउ नये ह्याची काळजी पण घ्यायला हवी होती. आई बाबाना मी समजाउन सांगितले की आपण हे ५ दिवसानंतरच्या विझिट मधे सोडवू.
अशा गुंतागूतीच्या केसेस फक्त माझ्याकरिता राखून ठेवल्या जात. ५ दिवसानंतरची तपासणी झाली. सर्व काही ठीक होते. मी सांगुन सुद्धा ५ दिवस त्या मुलीचा कोण ह्या प्रष्नावरुन खूप छ्ळ झाल्याच्या खूणा मला स्पष्ट दिसत होत्या. पण मुलीने नाव सांगितले नव्हते. ती जबाबदारी माझ्यावर आली. साधारण १ तास वेगवेगळ्या प्रकारानी विचारणा झाल्यावर मुलीने शेवटी नाव का सांगु शकत नाही ते सांगितले. तीला देवावर हाथ ठेवुन आईची शपथ घालण्यात आली होती. नाव फोडलेस तर आई मरेल ची धमकी. भोळा जीव घाबरला आपल्या आईकरिता. आता काय करायचे. मी शक्कल लढवली. चल तू तोंडाने सांगु नकोस. मी नावे घेतो. हो असेल तर पापण्या हलव. तुझी शपथ पण राहिली आणि तुला परत असा त्रास होणार नाही. मुलगी तयार झाली. साधारणपणे ह्या परिस्थितीला कोण जबाबदार असते ते मला बरोबर माहित होते. मी रांगेने नावे घेतली.
१. घरगडी.
२. काका
३. मामा
४. शेजारी मुलगा
५. भावोजी.- आणि मुलीने पापण्या हलवल्या.
ताईला माहिती आहे का? परत पापण्या हलल्या.
ह्या मुलीला आपले काय चुकले ते कधी कळलेच नाही. सुट्टीला ताईच्या सासरी गेली असताना ३ वेळा भावोजीने गुदगुल्या केल्या एवढेच. भावोजी ने सांगितलेले अयकायचे ही सुचना होती ना. आणि मी वेड्या कुंभाराला हात जोडले.
आज ३० वर्षानी सुद्धा हा अनुभव पाठ सोडत नाही. जीव कालवतो. आजही परिस्थिती बदलली आहे असे मला नाही वाटत. झालेच तर वर सांगितलेले नंबर बदलत असतील.
साली आधी घरवाली हे मी विनोदाने सुद्धा म्हणत नाही.
जाता जाता: आईने जावयाला संशय येउ न देता मुंबईला बोलवून घेतले. आणि त्याची अक्षरशः चपलानी पुजा केली. ह्या पूजेला मला आमंत्रण होते. आणि मी साहेबांची परवानगी घेउन गेलो होतो. मला इच्छा असुन सुद्धा हाथ धुवायला मिळाले नाहीत एवढी सांग्रसंगित पुजा झाली.
वाचने
16679
वाचनखूण
प्रतिक्रिया
60
निशब्द ....
In reply to निशब्द .... by छोटा डॉन
सुन्न
शिट्ट शिट्ट
+१
In reply to +१ by मुक्तसुनीत
+१
खरंय
In reply to खरंय by सुमीत भातखंडे
वाच्यता
In reply to वाच्यता by मुक्तसुनीत
मुक्तराव,
वाचले. सुन्
लहानग्या
साहेब
ह्म्म..
In reply to ह्म्म.. by चतुरंग
+१
In reply to +१ by मुक्तसुनीत
बाप
In reply to बाप by विनायक प्रभू
अगदी अचूक!
In reply to बाप by विनायक प्रभू
ओह !
In reply to बाप by विनायक प्रभू
अशा केसेस मधे बाप पण असतो.
In reply to +१ by मुक्तसुनीत
हो तेही येते हे मला माहीत आहे!
लेख तर
भयानक आहे.
सुन्न करणारे
सुन्न झाले
भयानक आहे.
त्या वयात
वाटेवरती काचा गं!
In reply to वाटेवरती काचा गं! by प्रमोद देव
बरोबर, वाच्यता होते आहे हे चांगले आहे!
In reply to वाटेवरती काचा गं! by प्रमोद देव
मलाही हेच
भयंकर
In reply to भयंकर by कपिल काळे
+१
पाळी
आई गं !!
एखाद्या
In reply to एखाद्या by विसोबा खेचर
अगदी बरोबर
प्रतिक्रिया तरी काय द्याल यावर?
In reply to प्रतिक्रिया तरी काय द्याल यावर? by ललिता
अशक्य वाईट आहे.
In reply to प्रतिक्रिया तरी काय द्याल यावर? by ललिता
बापरे.. हे
साला एक
>>>जनावरापा
वासनांध लांडगा
विकृती, मानसिक आजार
प्रभू सून्न करणारा विषय
In reply to प्रभू सून्न करणारा विषय by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वेळ
सुन्न झालो
संताप
अवाक झालो आहे
अशा विकृत
हो
In reply to हो by विनायक प्रभू
ताईही विकृत
सुन्न
त्या भ**
ताईच्या संमतीने अगदी तिच्यादेखत.
वेडा कुंभार
सुन्न..
आता?
बालकदिनाच्या दिवशी
In reply to बालकदिनाच्या दिवशी by रामदास
छे:
In reply to बालकदिनाच्या दिवशी by रामदास
ह्यान चुक
चूक
शिवरायांन
खरोखरच..